वैश्विक आहवाने पलणारी नारी शक्ती ची तिटवे तील शहिद शिक्षण परिवार ही भविष्यात महाराष्ट्राची अनुकरणीय ओळख ठरावीच – लेखक लक्ष्मीकांत देशमुख
तिटवे / गारगोटी /प्रतिनिधी : ग्रामीण भागातील सृजनशील नारी शक्ती ला बदलत्या संदर्भाने सक्षम करणाऱ्या तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाची आगामी काळात महाराष्ट्रातील एक अनुकरणीय शैक्षणिक उपक्रम ओळख म्हणून होईलच ‘ अशा शब्दात आपल्या शुभेच्छा निवृत्त सनदी अधिकारी लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिल्या . अभुतपूर्व उत्साहात – युवती सहभागाच्या पांरपारिक लेझीम – ढोल ताशे च्या निनादात निघालेल्या मिरवणुकीसह पहिलाच पदवीदान सोहळा टिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविघालयात अभुतपूर्व उत्साही वातावारणात संपन्न झाला आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे हे होते .प्रारंभी पसायदान आणि एसएनडीटी विद्यापीठ गीताने या सोहळ्यास प्रारंभ झाला . गत तीन वर्षातील विविध विविध शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेत प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सर्वांचे स्वागत केले . प्रमुख मार्गदर्शक नॅक सल्लागार डॉ . जगन्नाथ पाटील यांनी आपल्या भाषणात ‘ कोल्हापूर जिल्ह्यास विविध पैलूनी शैक्षणिक परंपरा मोठी आहे , आजच्या माहिती विस्फोट आणि ग्लोबल व्हिलेज संदर्भाने ही परपंरा वैश्विक स्तरावर अधिक विकसित करण्यासाठी आमची शिक्षण संस्था नक्कीच प्रयत्न करत राहील आणि भविष्यात याचा दखलपात्र असा महामार्ग होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत स्त्री – पुरुष समानतेसाठी निव्वळ भाषणापेक्षा कृतीशीलपणे विविध उपक्रमातून व्यक्त होण्यासाठीच आम्ही कार्यरत राहू असा निर्धार ही व्यक्त केला . लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘ आगामी काळ हा विविध क्षेत्रात स्थानिक ते वैश्विक पातळीवर नारी शक्ती च्या नेतृत्वाचा राहणार आहे , हा महत्वाचा केंद्रीत बदल लक्षात घेवून शहीद शिक्षण परिवाराची वाटचाल विस्तारत जावी ‘ अश्या शब्दात त्यांनी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या . अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात एनएनडीटी चे माजी प्र – कुलगुरू डॉ. व्ही . ए . मगरे यांनी ‘ पुरोगामी प्रतिमेच्या महाराष्ट्रातील स्त्री – पुरुष जन्मदरातील वाढती दरी हा विषय सर्वासाठीच चिंताजनक आसला तरी ही त्या वर नक्कीच मात करता येते हा विश्वास आज च्या पहिल्याच पदवीदान सोहळयातून शाहिद शिक्षण प्रसारक मंडळाने दाखवून दिला आहे , ही सकारात्मकता लाख मोलाची असून सर्वच तालुका स्तरावर त्यांचा विस्तार झाला पाहिजे ‘ असे ठामपणे नमूद केले .
या सोहळ्यात संस्थापिका वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समुपदेशिका भावना चौधरी आणि शिशु आधार केंद्र संस्थापिका – डॉ. प्रेमिला जरग यांना “वीर नारी पुरस्कार 2022” ने गौरव पत्र देवून सन्मानित करण्यात आले . तसेच मान्यवर पाहुण्या च्या हस्ते संगणक व पत्रकारितेच्या प्रथम पदवी विध्यार्थिनी ना पदवी प्रदान करण्यात आल्या आणि इन्फोसिस – टीसीएस – कॅपजेमिनी, टी इ कनेक्टिव्हिटी, टी सिस्टिमसह आदि विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यात निवड झालेल्या विधार्थिनी चा गौरव करण्यात आला . सत्कारमूर्ती भावना चौधरी यांनी आगामी काळात समुपदेशन संदर्भाने आपण आपल्या शिक्षण संस्थेशी संलग्न राहू असे अभिवचन दिले तर कोल्हापूर सह मुंबईत वेळोवेळी मदत करण्यास तत्पर असल्याचे डॉ. प्रमीला जरग यांनी सांगितले . शेवटी आभार सुधीर कुलकर्णी यांनी मानले तर सुत्र संचलन प्रा दिग्वीजय कुंभार व शुभांगी वैघ यांनी केले . या सोहळ्याला आजी माजी विद्यार्थिनी, हितचिंतक पालक आणि शैक्षणिक – माध्यम – सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते .