वाहन चोरणाऱ्या टोळीला अटक करून ३१ गाड्या जप्त,कोल्हापूर पोलिसांची आजपर्यंतची देशपातळीवरील सर्वात मोठी कारवाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज मोठी कारवाई करत चार चाकी वाहन चोरणाऱ्या दिल्ली येथील तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींनी देशभरातील विविध ठिकाणच्या महागड्या गाड्यांची चोरी ही केली आहे.त्यांच्याकडून ५ कोटी ५ लाख रुपये किंमतीच्या तब्बल ३१ गाड्या जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेची आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. जाहिरअब्बास दुकानदार,यश देसाई, खालिदमहंमद सारवाण (तिघेही रा. बेळगाव ) अशी आरोपीची नावे आहेत. चोरी केलेल्या गाडीमध्ये फॉरच्यूनर-०३, इनोव्हा-०९, किया सेल्टॉस-०३, हुंडाई क्रेटा-०७, इरटीगा-०१, स्कॉर्पियो-०१, ब्रीझा-०२, स्विफ्ट डिझायर-०५ अशा गाडींचा समावेश आहे. सदरच्या टोळीने या सर्व गाड्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कागदपत्र अभावी विक्री केल्या आहेत.कोल्हापूर पोलिसांची हो देशपातळीवरील मोठी कामगिरी असून या तिघा आरोपिकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.