श्री.दत्त जयंतीनिमित्त नेहरुनगर येथे श्री.दत्त मंदिरात १० ते १८ डिसेंबर दरम्यान श्री.दत्त जयंती उत्सवाचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे कोल्हापूर येथील नेहरूनगर परिसरात असणाऱ्या दत्त मंदिर येथे १० डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीमध्ये दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे श्री.दत्त जयंती निमित्त हा उत्सव आयोजित करण्यात आल्या असून या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक १० डिसेंबर रोजी रात्री ८ ते १० मराठी भक्ती गीत कराओके शेखर आयरेकर मित्रपरिवार यांचा कार्यक्रम होणार आहे ११ डिसेंबर रोजी श्री.जयवंत कुलकर्णी प्रस्तुत अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे.तर १२ डिसेंबर रोजी स्वानंद जाधव उत्तरेश्वर पेठ यांचा भक्ती गंध कार्यक्रम होणार आहे १३ डिसेंबर रोजी अवधूतचिंतन भक्त परिवार यांचा कार्यक्रम होणार आहे तर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ ओम मंडळी शिवशक्ती सेवा संस्थेचा ओम महामंत्र उच्चारण कार्यक्रम होणार आहे आणि रात्री ८ ते १० निशा मगदूम यांचा अभंगवाणी कार्यक्रम होणार आहे. १५ डिसेंबर रोजी संगम लोककला सांस्कृतिक कला प्रतिष्ठानचा कार्यक्रम होत आहे
तर १६ डिसेंबर रोजी श्री.दत्त माऊली महिला भजनी मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे १७ डिसेंबर रोजी सायंकाळी स्वर माऊली हसुर दुमाला प्रस्तुत भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम होणार आहे १८ रोजी ४ वाजता दत्तात्रयांची पालखी सोहळा आणि ६ वाजता दत्त जन्मकाळ सोहळा आणि प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. उत्सव काळात प्रत्येक दिवशी सकाळी ७ वाजता अभिषेक व रात्री ७.३० वाजता नित्यनेमाने आरती केली जाणार आहे.