Sunday, December 22, 2024
Home ताज्या भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे - जयंत...

भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे – जयंत पाटील

भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे – जयंत पाटील

महाराष्ट्र बंदच्या घोषणेमुळे सहन न झाल्याने भाजपकडून ही कारवाई

मुंबई /प्रतिनिधी : आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं कारस्थान भाजपाने सुरू केलं असून भाजपाने राष्ट्रवादीचा धसका का घेतला आहे हे विचार करण्यासारखं आहे अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. आमचा कायद्यावर विश्वास आहे. छगन भुजबळ यांनाही असाच त्रास देण्याचा प्रयत्न झाला मात्र ते निर्दोष सुटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते निर्दोष आहेत. कोणताही गैरव्यवहार त्यांच्याकडून झालेला नाही तरीही त्यांना बदनाम करणं हाच यामागचा हेतू आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

आजपासून राज्यातली धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली गेली असून सकाळी मुंबईतील सिध्दीविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. धाड टाकली जाणार किंवा कारवाई केली जाणार हे भाजपच्या नेत्यांना आधी कळतं त्यामुळे या देशातल्या सर्व तपास यंत्रणा भाजप चालवत आहे यावर आता जनतेचा विश्वास बसला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
अजित पवारांनी कशाचीच कागदपत्रं कधी दडवली नाहीत. मग जाहीर करण्याचा प्रश्च येत नाही. त्यामुळे अजित पवारांना दडवण्यासारखं काहीच नाही. ते कधीही दडवत नाहीत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. लखीमपूर येथे ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. जालियनवाला बागेपेक्षा क्रूर कृत्य तिथे केले गेले होते. या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळत आहे. भाजपला हे सहन झाले नसेल म्हणून ही कारवाई करण्यात आली असेल असाही आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments