Friday, December 20, 2024
Home ताज्या मेघोली धरणफुटीची सखोल चौकशी करा - भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची...

मेघोली धरणफुटीची सखोल चौकशी करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

  • मेघोली धरणफुटीची सखोल चौकशी करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
    कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु प्रकल्प १ सप्टेंबरला रात्री फुटला. प्रकल्पाच्या भिंतीला गळती लागल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून मेघोली परिसरातील शेकडो हेक्टर शेती जमीनदोस्त झाली आहे. दिनांक १० रोजी सदर ठिकाणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी धरणासारख्या संवेदनशील परिसरासाठी प्रशासनाच्यावतीने हलगर्जीपणाचे चित्र दिसून आले आहे. ४ वर्षांपासून तलावाच्या जॅकवेलसह विरुद्ध बाजूलाही गळती सुरू असून गेल्या २ ते ३ महिन्यापासून देखरेखीसाठी साधा वॉचमनही याठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळे धरण परिसर क्षेत्रात कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
    हे धरण कोणत्या कारणाने फुटले याची सखोल चौकशी व्हावी, या धरणावर गेले कित्येक दिवस चौकीदार नव्हता हा चौकीदार कोठे होता याची देखील चौकशी व्हावी, भविष्यातील पाण्याची उपयुक्तता लक्षात घेऊन पुन्हा नव्याने धरण बांधणीसाठी प्लॅन तयार करून संबंधित विभागाकडे त्वरित मंजुरीसाठी पाठवावा, सदर ठिकाणी शेतजमीन नापीक झाली असून अशी जमीन पुन्हा उपयोगात आणण्यासाठी सरकारकडून एकरी १ लाख अनुदान मिळावे, धरण परिसरातील नागरीकांचे नुकसान झाल्यामुळे लाईट बिल माफ करण्यात यावे, या धरण फुटीमुळे शेतातील मोटर व पाईपलाईन वाहून गेली असल्यामुळे शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी.
    याविषयात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना इमेल द्वारे निवेदन सादर करून वरील विषयात आपण गांभीर्याने लक्ष घालून यातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणून यात झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित करून या भागातील शेतक-यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments