राजारामपुरी कुटुंब कल्याण केंद्रास
महापौरांची भेट – पूर्वतयारीचा घेतला आढावा
कोल्हापूर /प्रतिनिधी : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहीम दि.15 सप्टेंबर 2020 पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेविका सौ. भाग्यश्री शेटके यांनी राजारामपुरीतील कुटुंब कल्याण केंद्रास भेट देऊन मोहिमेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.
कुटुंब कल्याण केंद्र क्रं.3 राजारामपुरी येथे प्रभाग क्र.42 येथे असून या केंद्रांतर्गत 13 हजार 654 घरे तर 59 हजार लोकसंख्या येते. या केंद्रांतर्गत सर्व्हेक्षणाच्या कामाकरिता 20 पथके तैनात केली असून 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती या केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ. शोभा दाभाडे यानी मान्यवरांना दिली.
यावेळी महापौर तसेच आयुक्तांबरोबरच अन्य मान्यवरांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबतच्या पूर्व तयारीची माहिती घेतली, व मार्गदर्शक सूचना केल्या. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत आणि घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचून ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, आरोग्य शिक्षण व संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याची कार्यवाही प्राधान्यक्रमाने करण्यची सूचना महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेटटी यांनी केली.
यानंतर महापौर, आयुक्त् व पदाधिकारी यांनी 9 नंबर शाळेच्याजवळ सुरु असलेल्या राजारामपूरी येथील टाकीचे बांधकामाची पाहणीही केली. यावेळी ठेकेदाराला सदरच्या टाकीच्या बांधकामाच्या कामाला लवकरात लवकर गती देऊन ते पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
त्याचबरोबर मोरे माने नगर कुटूंब कल्याण केद्राअंतर्गत येणा-या प्रभागातील सदस्यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबतच्या पूर्व तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी नगरसेवक राजू दिंर्डोले, वैद्वयकीय अधिकरी डॉ.सौ.सुशिला पावरा, नोडल अधिकरी मोहन सुर्यवंशी, मुख्याध्यापक गायकवाड व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.