१८ वर्षाखालील मुलांच्या नोंदणीला सुरुवात
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे योग्य नियोजन करण्यासाठी १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांची माहिती संकलन करणे आवश्यक आहे. सदरची माहिती संकलन झाल्यानंतर महापालिकेला तिसरी लाट रोखण्यासाठी व लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून बचाव होण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. यातून मुलांची निश्चित अशी संख्या मिळेल. त्यामुळे बालकांवर उपचार करणेसाठी आवश्यक ती तयारी महापालिकेला करता येईल. यासाठी महापालिकेच्यावतीने गुगलवरhttps://forms.gle/m4Txi1wdQoA5yE547 या लिंकवर ऑनलाईन फॉर्म प्रसिध्द केलेला आहे. तरी शहरातील पालकांनी आपल्या १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांची माहिती ऑनलाईन भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोवीडच्या पहिल्या डोसचे लसीकरण न झालेल्या नागरीकांची माहिती पुढील लसीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेस प्राप्त होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या घरातील व परिचयातील ६० पेक्षा जास्त वय असलेल्या व पहिल्या डोस न घेतलेल्या नागरीकांची माहितीhttps://forms.gle/hZfGyT4tRuwGTR3x7 या ऑनलाईन लिंकवर भरावी असेही आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.