Tuesday, October 15, 2024
Home ताज्या १८ वर्षाखालील मुलांच्या नोंदणीला सुरुवात

१८ वर्षाखालील मुलांच्या नोंदणीला सुरुवात

१८ वर्षाखालील मुलांच्या नोंदणीला सुरुवात

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे योग्य नियोजन करण्यासाठी १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांची माहिती संकलन करणे आवश्यक आहे. सदरची माहिती संकलन झाल्यानंतर महापालिकेला तिसरी लाट रोखण्यासाठी व लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून बचाव होण्यासाठी हा उपक्रम राबविला आहे. यातून मुलांची निश्चित अशी संख्या मिळेल. त्यामुळे बालकांवर उपचार करणेसाठी आवश्यक ती तयारी महापालिकेला करता येईल. यासाठी महापालिकेच्यावतीने गुगलवरhttps://forms.gle/m4Txi1wdQoA5yE547 या लिंकवर ऑनलाईन फॉर्म प्रसिध्द केलेला आहे. तरी शहरातील पालकांनी आपल्या १८ पेक्षा कमी वयाच्या बालकांची माहिती ऑनलाईन भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कोवीडच्या पहिल्या डोसचे लसीकरण न झालेल्या नागरीकांची माहिती पुढील लसीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेस प्राप्त होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या घरातील व परिचयातील ६० पेक्षा जास्त वय असलेल्या व पहिल्या डोस न घेतलेल्या नागरीकांची माहितीhttps://forms.gle/hZfGyT4tRuwGTR3x7 या ऑनलाईन लिंकवर भरावी असेही आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments