ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत घेतली कोरोनाची लस
कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मुंबई येथे जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही लस अत्यंत सुरक्षित आहे. राज्यातील नागरिकांना आवाहन करतो की, लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या नागरिकांनी लसीकरण जरूर करून घ्यावे. लसीकरण व कोविडमुक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार.