जोतिबा डोंगर येथे कर्पूरा-रान -सबजा तुळस याची लागवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री बाळू मामा वृक्षारोपण संकल्पना केरली द्वारा वृक्षमित्र पंडित माने व नवनाथ माने जोतिबा डोगर या ठिकाणी कर्पूरा तुळस, रान तुळस ,सबजा तुळस याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्या ठिकाणी मोठ्या वृक्षांना कंपोसट खत घातले. यावेळी भाविक भक्तांना कर्पूरा तुळस, रान तुळस सबजा तुळस यांचे बियाणे वाटप केले. भाविक भक्तांच्या मार्फत हि बियाणे नाशिक, पुणे, मुंबई, कराड, सातारा , सांगली , कोल्हापूर, पन्हाळा या ठिकाणी पाठवले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जोतिबा देवस्थान समितीचे कामगार, कर्मचारी, जोतिबा पोलिस डिविजन जोतिबा पुजारी भाविक भक्त दत्ता धडेल , विनोद चिखलकर दिलीप लोंढे यांचे सहकार्य लाभले.