Sunday, December 22, 2024
Home ताज्या कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खाजगी हॉस्पीटलसाठी पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची...

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खाजगी हॉस्पीटलसाठी पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खाजगी हॉस्पीटलसाठी
पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती
सांगली/(जि.मा.का.) : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पाहता ज्या खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा आहे असे खाजगी हॉस्पीटल कोविड-१९ विषाणूबाधित रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. उपलब्ध केलेल्या हॉस्पीटलमध्ये दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रूग्णांना योग्य पध्दतीने दाखल करून घेणे, त्या ठिकाणी रूग्णवाहिका तसेच शववाहिकेची आवश्यकता असल्यास संबंधित शासकीय विभागाशी समन्वय साधून त्याची पूर्तता करून घेणे, हॉस्पीटलमधील रूग्णांच्या तक्रारींचे निराकरण करणे तसेच शासन निर्णयानुसार योग्य कार्यवाही होण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ७ खाजगी हॉस्पीटलकरीता  ४ पर्यवेक्षीय अधिकारी व १४ प्रशासकीय अधिकारी यांची दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी पासून नियुक्ती केली आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना दि. ३१ मार्च पासून कामकाज पहाण्याचे आदेश दिले आहेत.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली व मिरज चेस्ट सेंटर मिरज करीता पर्यवेक्षीय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे (मो.नं.९१५८६८६१२३) यांची नियुक्ती केली आहे. वाळवेकर हॉस्पीटल सांगली व विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज करीता जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एन. बी. कोळेकर (मो.नं.९९६०६८७४९२) यांची तसेच मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली करीता जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे व वॉन्लेस हॉस्पिटल मिरज करीता जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख किशोर जाधव (मो.नं.९४२२५३२६३६) यांची नियुक्ती केली आहे.
हॉस्पीटलनिहाय नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पुढीलप्रमाणे. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी नायब तहसिलदार गणेश लव्हे (मो.नं.९६८९७४२४८४) व रात्री १० ते सकाळी १० या वेळेसाठी पंचायत समिती मिरज छोटे पाटबंधारे उपविभागाचे शाखा अभियंता ए. जी. चव्हाण (मो.नं.९४०५५५३९५३), कुल्लोळी हॉस्पीटल सांगली – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिक्षक संजय राऊत (मो.नं.९०७५३७७००१) व रात्री १० ते सकाळी १० या वेळेसाठी मंडल कृषि अधिकारी तासगाव दिपक कांबळे (मो.नं.९४०५२९२३८६),  मिरज चेस्ट सेंटर मिरज – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी पंचायत समिती मिरज चे विस्तार अधिकारी (कृषी) अमोल कोळी (मो.नं.९४०३९६४२५३), रात्री १०ते सकाळी १० या वेळेसाठी सहायक संचालक नगररचना सांगली कार्यालयाचे रचना सहायक सौरभ आवटी (मो.नं.९६३७४५५५८५). वाळवेकर हॉस्पीटल सांगली – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सहायक अभियंता श्रेणी-२ एस. जी. पाटील (मो.नं.९४०४८७९८१२) व रात्री १० ते सकाळी १० या वेळेसाठी महाराष्ट्र व प्रदुषक यंत्रणा सांगली चे क्षेत्र अधिकारी रोहिदास मातकर (मो.नं.९५५२९६६७९९), विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी वन परिक्षण अधिकारी प्रकाश सुतार (मो.नं. ७७२२०१५९९९) व रात्री १० ते सकाळी १० या वेळेसाठी पंचायत समिती मिरज शिक्षण विभागाचे अधिक्षक विजयकुमार सोनवणे (मो.नं. ९०२९०३०४९०), मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी समाजकल्याण अधिकारी सचिन साळे (मो.नं. ७९७२२२१७२१) व रात्री १० ते सकाळी १० या वेळेसाठी जिल्हा परिषद गा्रमीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जे. बी. वरूटे (मो.नं. 9689711777),  वॉन्लेस हॉस्पिटल मिरज – सकाळी १० ते रात्री १० या वेळेसाठी नायब तहसिलदार उमेश कोळी (मो.नं. ९७६४८०३०९८) व रात्री १० ते सकाळी १० या वेळेसाठी पाटबंधारे उपविभाग मिरजचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहायक अभियंता श्रेणी-1 जावेद शेख (मो.नं. ९९७५२९७८०६) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.      पर्यवेक्षीय अधिकारी यांनी रूग्णांचा प्रवेश व डिस्चार्ज याबाबतीत पर्यवेक्षण करणे, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्ययावत करून घेणे, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा अधिकाधिक रूग्णांना फायदा करून देण्याबाबत कामकाज करणे, रूग्णालयांचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देणे हे कामकाज करावयाचे आहे.
प्रशासकीय अधिकारी यांनी रूग्णालयातील बेड संख्येच्या उपलब्धतेप्रमाणे रूग्णांना दाखल करून घेतले जाते अगर कसे याबाबत तसेच प्रशासकीय सर्व कामकाज पाहणे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम या प्रणालीमध्ये हॉस्पिटलमधील बेड संदर्भातील दैनंदिन माहिती भरण्याचे कामकाज करावयाचे आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांनी दर सोमवारी आपआपसात शिप्ट बदलावी. नेमून दिलेल्या कामकाजामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments