Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यागोकुळ दूध संघासाठी नवीद मुश्रीफ यांनी भरला उमेदवारी अर्ज

गोकुळ दूध संघासाठी नवीद मुश्रीफ यांनी भरला उमेदवारी अर्ज

गोकुळ दूध संघासाठी नवीद मुश्रीफ यांनी भरला उमेदवारी अर्ज

शेणा-मुतात राबणाऱ्याच्या कष्टाला न्याय देणार – नवीद मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापुर/प्रतिनिधी : संसार नेटका व्हावा म्हणून पोराबाळांच्या तोंडचे दूध काढून शेतकरी गोकुळ दूध संघाला दूध घालत आहे. अशा शेणा- मुतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या निवडणूक रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रतिपादन नवीद मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापुरात गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्री. मुश्रीफ करवीर प्रांत कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.यावेळी बोलताना नवीद मुश्रीफ पुढे म्हणाले, सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी दूध उत्पादक परिवर्तनाची वाट पहात आहेत.
“हाच आमचा जाहीरनामा”
नवीद मुश्रीफ म्हणाले, संस्थापक कै. आनंदरावजी पाटील – चुयेकर यांच्या आशीर्वादाने राजर्षी शाहू आघाडीकडून रिंगणात येण्यासाठी मी इच्छुक आहे. आमच्या सत्तेत प्रतिलिटरला दोन ते चार रुपये दूध दरवाढ देऊ. वासाचे दूध निघाल्यानंतर संबंधित संस्थांना योग्य तो मोबदला देऊ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गोकुळ दूध संघाचा लौकिक वाढवू.अर्ज भरण्यापूर्वी नवीद मुश्रीफ यांनी सहकाऱ्यांसह लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवत श्री. हनुमान, श्री. क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री. हालसिद्धनाथ, कागल येथील श्री. लक्ष्मी देवी, श्री. गणेश मंदिर व श्री. गहिनीनाथ गैबीपीर देव या देवतांचे दर्शन घेतले.
यावेळी गणपतराव फराकटे, भैय्या माने, प्रवीणसिंह पाटील, प्रकाशराव गाडेकर, शशिकांत खोत, आर. व्ही. पाटील, एम. एस. पाटील, मनोजभाऊ फराकटे, बाळासाहेब तुरंबे, वसंतराव धुरे, सतीश पाटील, सदाशिव तुकान, प्रविणसिंह भोसले, नारायण पाटील, विकास पाटील, देवानंद पाटील, दत्ता पाटील, रणजित सुर्यवंशी,  तसेच कागल,  मुरगुड व  व गडहिग्लज नगरपालिकेचे नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments