Wednesday, January 15, 2025
Home ताज्या सोनी सबवरील मालिका 'मॅडम सर'मध्‍ये अमित मिस्‍त्री व उर्मिला तिवारी साकारणार लहानशी...

सोनी सबवरील मालिका ‘मॅडम सर’मध्‍ये अमित मिस्‍त्री व उर्मिला तिवारी साकारणार लहानशी भूमिका

सोनी सबवरील मालिका मॅडम सरमध्‍ये अत्‍यंत प्रतिभावान कलाकार अमित मिस्‍त्री व उर्मिला तिवारी यांचा प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. ते विवादित जोडपे विजय व अनिताची भूमिका साकारणार आहेत. हे नवीन पात्र मॅडम मलिक (गुल्‍की जोशी) व तिच्‍या टीमसाठी एक अनोखी केस सादर करणार आहेत. सोनी सबवरील मालिका मॅडम सर चार डायनॅमिक महिला पोलिस अधिकारींच्‍या दृष्टिकोनातून सामाजिक समस्‍यांना दाखवते. मालिका हलका-फुलका कन्‍टेन्‍ट व कलाकारांच्‍या उत्तम अभिनयासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

अत्‍यंत प्रतिभावान कलाकार अमित मिस्‍त्री वर्कहोलिक स्‍टॉकब्रोकर विजयच्‍या भूमिकेत, तर उर्मिला तिवारी त्‍याची पत्‍नी अनिताची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनिताला वैवाहिक जीवनामध्‍ये कमी लेखले जात असल्‍यासारखे वाटते. अनिता त्‍यांच्‍या वैवाहिक जीवनात पुन्‍हा प्रेमाचा अंकुर बहरण्‍यासाठी एका रंगरसिया बाबाने दिलेले लाडू विजयला खाण्‍यासाठी दबाव टाकते आणि तेथूनच समस्‍या सुरू होतात. पत्‍नीचा एका फोनीबाबावर असलेला विश्‍वास पाहून विजयला अधिक राग येतो. तो ढोंगी बाबा लाडू देण्‍याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍या पत्‍नीचे सोन्‍याचे दागिने घेतो. बाबाला धडा शिकवण्‍यासाठी विजय मॅडम मलिक व तिच्‍या टीमकडे मदत मागण्‍यासाठी जातो.

हसीना मलिक व तिची टीम फोनीबाबाकडून या जोडप्‍याची होत असलेली फसवणूक कशाप्रकारे थांबवतील? या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी टीम कोणती नवीन युक्‍ती अंमलात आणतील?

विजयच्‍या भूमिकेत मालिकेमध्‍ये प्रवेश करण्‍याबाबत आनंदित असलेला अमित मिस्‍त्री म्‍हणाला,”माझे सोनी सबसोबत दीर्घकाळापासून नाते जुडलेले आहे. मॅडम सर या प्रेरणादायी मालिकेचा भाग होण्‍याचा आनंद होत आहे. आगामी एपिसोडमधील माझी भूमिका एका महत्त्वाच्या समस्‍येवर प्रकाश टाकेल. आपल्‍यापैकी अनेकांनी अवतीभोवती ही समस्‍या पाहिली असावी. माझी भूमिका विजयला त्‍याच्‍या पत्‍नीचा कंटाळा आला आहे. त्‍याच्‍या पत्‍नीची एका बाबाकडून फसवणूक होते. तो बाबा जोडप्‍याचे वैवाहिक जीवन आनंदमय करण्‍याचे सांगत तिला जादुई लाडू देतो आणि बदल्‍यात तिच्‍याकडून सोन्‍याचे दागिने घेतो. तो स्‍वत:हून या समस्‍येचे निराकरण करण्‍याचे ठरवतो. विजयच्‍या या समस्‍येसाठी या चार डायनॅमिक महिला पोलिस अधिकारी अंमलात आणणारा उपाय पाहणे रोमांचक असणार आहे. मी या सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगदरम्‍यान खूप धमाल केली. मला खात्री आहे की, प्रेक्षक या नवीन केसबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतील.

अनिताची भूमिका साकारणारी उर्मिला तिवारी म्‍हणाली,”माझी भूमिका अनिता ही शिक्षित तरूण महिला आहे. ती अत्‍यंत समर्पित व आशावादी पत्‍नी आहे. वर्कहोलिक पतीकडून होणारे दुर्लक्ष आणि त्‍यांच्‍यामधील प्रेम कमी होत असल्‍याचे जाणवल्‍यानंतर ती त्‍यांचे नाते आनंदमय करण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये रंगरसिया बाबा व त्‍याच्या कृत्‍यांना बळी पडते. तिला आशा व विश्‍वास आहे की, बाबाने दिलेले लाडू तिच्‍या वैवाहिक जीवनात जादू निर्माण करेल. मॅडम सरचे आगामी एपिसोड्स प्रेक्षकांना या तरूण जोडप्‍याचे जीवन व त्‍यांच्‍यामधील संघर्षांना दाखवेल.

अधिक जाणण्‍यासाठी पाहत राहा मॅडम सर दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्‍त सोनी सबवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments