प.प. कालिकानंदतीर्थ स्वामी समाधिस्थळाचे कल्लोळ येथे भूमिपूजन उत्साहात
कोल्हापूर/प्रतिनिधी : प.प. कालिकानंदतीर्थ स्वामी समाधिस्थळाचे भूमिपूजन कल्लोळ मोठ्या उत्साहात पार पडले.प.प. कालिकानंदतीर्थ स्वामी सिद्धयोग न्यासच्या वतीने स्वामींच्या समाधिस्थळाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कल्लोळ (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथे रवींद्र शंकर मिरजे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी न्यासाचे विश्वस्त सौ. मयुरी देसाई (बडोदा), समीर किणरे (जयसिंगपूर), रवी हवालदार, एच. आर. कुलकर्णी, बाबासाहेब खाडे, शिवस्वरूप भेंडे (कोल्हापूर), युवराज व विश्वास चौगुले (कुडुत्री), विजय वैद्य (संगमेश्वर), रवींद्र मिरजे, वकील प्रवीण जोशी, आशाल जोशी (कल्लोळ), अभय मानवी (निपाणी) आदी उपस्थित होते. दरम्यान, येथे समाधिस्थळाबरोबरच ध्यानमंदिर, भक्तनिवास अशा विविध सुविधा भक्तांसाठी उभारण्यात येणार असल्याचे सौ. देसाई यांनी यावेळी सांगितले.