Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूचे वास्तूसौंदर्य व ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी काय...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूचे वास्तूसौंदर्य व ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार खा.छत्रपती संभाजीराजे यांची विचारणा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूचे वास्तूसौंदर्य व ऐतिहासिक मूल्य जपण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार खा.छत्रपती संभाजीराजे यांची विचारणा

कोल्हापूर/प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या वतीने सार्वजनिक खासगी भागीदारी ( Public Private Partnership ) अंतर्गत देशातील रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’चे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे.  या पार्श्वभूमीवर याठिकाणी विकासात्मक कामे करीत असताना ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूचे वास्तूसौंदर्य व ऐतिहासिक मूल्य जपले जावे, या विषयी काय तरतूद केली जाणार आहे, याबाबत आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पुरवणी प्रश्न मांडला.

यास उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री श्री पियुष गोयल यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ भारतीय रेल्वेची शान आहे, असे प्रतिपादन करीत या टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूसौंदर्यास कोणत्याही प्रकारे बाधा न पोहोचविता स्थानिक मूल्यांची दखल घेत, या टर्मिनसचे महत्त्व आणखी वाढविण्याच्या दृष्टीने याठिकाणी विकासात्मक कामे करण्यात येणार असल्याचे खासदार संभाजीराजेंच्या प्रश्नास उत्तर देताना सांगितले. तसेच, पुण्यामधील शिवाजीनगर येथील रेल्वेस्थानक सुध्दा या उपक्रमा अतंर्गत विकसित करण्याचे प्रस्तावित होते, परंतु ते काम अजूनही प्रलंबित असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, याबाबत नवीन डि.पी.आर. तयार केला असून त्यानुसार लवकरच काम सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments