Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यापोलीसांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी - जिल्हाधिकारी दौलत देसाई           

पोलीसांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी – जिल्हाधिकारी दौलत देसाई           

पोलीसांनी प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावावी – जिल्हाधिकारी दौलत देसाई
          

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : तपासावरील प्रलंबित प्रकरणे पोलीसांनी तात्काळ मार्गी लावावीत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा लवकरात-लवकर होण्यासाठी पोलीसांनी कागदपत्रे समाज कल्याण विभागाला सादर करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, महिला व बाल विकासचे निरीक्षक बी.जी.काटकर आदी उपस्थित होते.
सहायक आयुक्त श्री. लोंढे यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. त्यानंतर त्यांनी सविस्तर आढावा सांगितला. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध १९८९) ॲट्रॉसिटी अंतर्गत व नागरी हक्क संरक्षण अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या सद्यस्थितीबाबत समावेश होता. जानेवारी महिन्यात एकुण १२ प्रकरणांपैकी ६ मंजूर असून पोलीसांकडील कागदपत्रांअभावी  ६ प्रलंबित प्रकरणे आहेत. फेब्रुवारीमधील प्राप्त ९ प्रकरणे कागदपत्राअभावी प्रलंबित असल्याचे ते म्हणाले.  जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी  एकूण २१ प्रकरणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता तपासावर प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलीस विभागाने लवकरात लवकर मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments