Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापुरात शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापुरात शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापुरात शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे शुक्रवार दिनांक २६ व शनिवार दिनांक २७ मार्च २०२१ रोजी.कोल्हापूर जिल्हा खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.  या स्पर्धेत फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बुद्धिबळपटूच भाग घेऊ शकतात.करोनाच्या प्रादुर्भावामुळे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या परवानगीनुसार फक्त पहिल्या चाळीस बुद्धिबळपटूनाच या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.यामध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकनप्राप्त बुद्धिबळपटूना प्रथम प्राधान्य देण्यात येईल..
या स्पर्धेतून प्रथम येणाऱ्या दोन खेळाडूंची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येईल. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये राज्य स्पर्धा खेळून आल्यानंतर देण्यात येईल. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी आपली नावे प्रवेश फी सह २५ मार्चपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बुद्धिबळ संघटनेच्या हॉलमध्ये नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भरत चौगुले ९८५०६५३१६० उत्कर्ष लोमटे ९८२३०५८१४९ किंवा मनीष मारुलकर ९९२२९६५१७३ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धास्थळी मास्क सँनिटायझर, हॅन्ड ग्लोज व सुरक्षित अंतर राखणेचे सर्वांना बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments