Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्याहोळी लहान करा, शेणी दान करा - प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

होळी लहान करा, शेणी दान करा – प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे

कोल्हापूर/प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे शहरात मोठया प्रमाणात होळी पोर्णिमा सण साजरा केला जातो. यावर्षी होळी पोर्णिमा रविवार, दि. २८ मार्च २०२१ रोजी येत आहे. ही होळी पोर्णिमा पर्यावरणपुरक साजरी करावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी शहरवासीयांना केले आहे.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी होळीचा सण आनंदाने साजरा करुन पर्यावरणाचे संरक्षण करा. यामध्ये होळी लहान करुन आपले डांबरी रस्ते खराब होणार नाहीत याची दक्षता घ्या. तसेच होळी लहान करुन वाचलेल्या शेणी महापालिकेच्या स्मशानभुमीस दान करा असे आवाहन केले आहे. यासाठी या फोन नंबर ०२३१ – २५४०४३६,२५४०२९ यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments