महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांना अभिवादन
कोल्हापूर/प्रतिनिधी : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांची आज १०८ वी जयंती. त्यानिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याला मनोभावे अभिवादन केले.यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्यात औद्योगिक क्रांतीसह कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी घातला. राजसत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, या भूमिकेतून त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय पद्धत आणली. गावपातळीसह तालुका व जिल्हा पातळीवर घडलेल्या गावागावातील नेतृत्वानी राज्याच्या विकासात योगदान द्यावं, हा त्यांचा विचार होता.