Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यापुण्याच्या भाग्यश्री मनीष पात्रीकर यांचा मिसेस मोस्ट डिलिजंट पुरस्काराने गौरव

पुण्याच्या भाग्यश्री मनीष पात्रीकर यांचा मिसेस मोस्ट डिलिजंट पुरस्काराने गौरव

पुण्याच्या भाग्यश्री मनीष पात्रीकर यांचा
मिसेस मोस्ट डिलिजंट पुरस्काराने गौरव

कोल्हापूर/प्रतिनिधी : व्हीपीआर इव्हेंटसच्या वतीने आयोजित अखिल भारतीय सौंदर्यवती स्पर्धांमध्ये पुणे येथील भाग्यश्री मनीष पात्रीकर यांचा मिसेस मोस्ट डिलिजंट पुरस्कारने गौरव करण्यात आला.अहमदाबाद येथील व्हीपीआर इव्हेंटसतर्फे दरवर्षी महिलांसाठी सौंदर्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये सौभाग्यवतींसोबत घटस्फोटित आणि विधवा महिलांनाही संधी देण्यात येते. देशामध्ये सर्व शहरांमधून वेगवेगळ्या राऊंडमधून ४२ सौंदर्यवतींची निवड करण्यात आली. यातून अंतिम निवड अहमदाबादमध्ये होऊन त्यामध्ये भाग्यश्री यांची निवड झाली. दोन मुलांच्या आई असणाऱ्या भाग्यश्री या अमरावती येथून विज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांना स्त्री आणि स्त्री शक्तीला आत्मनिर्भर करण्याच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यानेच या स्पर्धेत भाग घेतला. त्यांच्या यशामध्ये पती मनीष पात्रीकर यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments