Saturday, December 21, 2024
Home ताज्या जुन्नरमध्ये १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन - सांस्कृतिक...

जुन्नरमध्ये १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन – सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाची असणार मेजवानी

जुन्नरमध्ये १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सवाचे आयोजन – सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाची असणार मेजवानी

जुन्नर/प्रतिनिधी : शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक आणि खाद्यमहोत्सव, कृषी पर्यटन या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
या ऐतिहासिक शहरात द्राक्ष महोत्सावाचे हे पाचवे वर्ष आहे. वर्षा गणिक या महोत्सवाची लोकप्रियता वाढत असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक महोत्सवाला भेट देतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होत असल्यामुळे याद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कलाकुसर करणारे कारागीर, बचतगट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून महोत्सवाची सुरवात होईल. या महोत्सवात विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेले विविध खाद्यपदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे.
या महोत्सवात पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्यात येईल. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था केली जाईल, जेथे पर्यटक आपल्या मित्रपरिवारासोबत मजेशीर खेळ खेळून चांगला वेळ घालवू शकतील.
२० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या प्रसिद्ध शिवनेरी किल्ल्याची सफर आयोजित केली जाणार आहे. जुन्नर येथील देवराईंमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येईल. त्यानंतर कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेट दिली जाईल. सुप्रिया करमरकर, उपसंचालक ( डेप्युटी डायरेक्टर ), पर्यटन संचालनालय पुणे या कार्यक्रमाबाबत आपली मतं मांडताना त्या सांगतात की, “इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे, कारण ते इथे येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही वाईन कशी बनते याची प्रक्रिया डोळ्यादेखत पाहून ती वाईन खरेदी करू शकणार आहात. आमच्याकडे बेदाणे, मनुके आणि द्राक्षांचा ताजा रस यांचा तुम्ही मधुर आस्वाद घेऊ शकता. त्याचसोबत वेलीला लगडलेली द्राक्ष काढून तुम्ही ती विकत घेऊ शकता, त्यामुळे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फळ तुम्ही आपल्या आरोग्याच्या करंडीत समाविष्ट करू शकणार आहात.
“या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही जसे एक जागरूक ग्राहक या दृष्टीने सकारात्मक पावलं उचलत आहात तसेच द्राक्षांची लागवड आणि शेतीसाठी या उपक्रमाअंतर्गत खूप चांगला पाठिंबा दर्शविला जाणार आहे. कारण एका ठिकाणी पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्टया उचलेले अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे. ज्यांना हा अमूल्य अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंकवर जाऊन क्लिक करून तुमचा सहभाग नोंदवू शकता.” शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी हडपसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी , ताम्हाणे संग्रहालय, लेणाद्री गणपती आदींचे दर्शन घेता येणार आहे तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील लोकांना पदार्थ-वस्तू पाहता आणि खरेदी करता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments