फेरीवाल्यांचा प्रश्न समन्वयाने तोडगा काढून मिटवा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. अंबाबाई मंदिर परिसरात आमदार चंद्रकांत जाधव, महापालिकेचे अधिकारी आणि फेरीवाल्यांनी जाऊन २
२५ मीटरवर रेषा मारा. त्या रेषेच्या बाहेर फेरीवाल्यांना व्यवसायाची च्या परवानगी द्या आणि फेरीवाल्यांचा प्रश्न समन्वयातून तोडगा काढून मिटवा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांवर सुरू केलेल्या कारवाई प्रश्नी आज कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, महापालिकेच्या वतीने आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी व सर्वपक्षीय फेरीवाले कृती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महापालिकेच्यावतीने आयुक्त सौ. कादंबरी बलकवडे यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर फेरीवाल्यांच्या वतीने माजी महापौर आर. के. पोवार व कृती समितीच्या प्रमुखांनी बाजू मांडली. नंतर आमदार चंद्रकांत जाधव यांनी समझोत्याच्या भूमिकेतून वाहतूकही सुरळीत झाली पाहिजे आणि फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली.यावेळी कॉम्रेड दिलीप पोवार, नंदकुमार वळंजू, किसन घाडगे, मोहम्मदशरीफ शेख यांनी फेरीवाल्यांच्या भूमिका मांडल्या. अशोक भंडारी, रियाज कागदी, सुरेश जरग आदी प्रमुखांसह फेरीवाले मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
चौकट……
कोण काय म्हणाले……. मंत्री मुश्रीफ म्हणाले, फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहही झाला पाहिजे, तसेच वाहतुकीला अडथळा न येता शिस्तही टिकली पाहिजे.महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे म्हणाल्या, फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना त्रास देणे हा आमचा उद्देश नाही. परंतु; शहर स्वच्छ व सुंदर राहून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाली पाहिजे, ही महापालिका प्रशासनाची भूमिका आहे.माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, शहरातील पाच हजार सहाशे फेरीवाल्यांच्या कुटुंबांच्या जगण्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे; एकदाचा हॉकर्स झोन कराच.