पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांच्याशी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची ग्रेट-भेट
मुंबई/प्रतिनिधी : आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची विविध विषयावर चर्चा झाली.राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विचाराची युवक संघटना चांगली बांधली गेली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे असंख्य तरुण आव्हानात्मक काळामध्ये पक्षाच्या मागे उभे करून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक वाड्या वस्ती पर्यंत शाखा उभारणी करून राष्ट्रवादी काँग्रेस बळकटीसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. मा हसन मुश्रीफ फाउंडेशन च्या वतीने संजय गांधी निराधार परितक्त्या आणि विधवा पेन्शन योजना प्रभावीपणे राबवून निराधारांना आधार देण्याचे काम करीत आहे. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून महाराष्ट्र राज्यातील मोठ्या कंपन्या बोलून रोजगार मेळावा घेण्यात आला होता याचीही माहिती यावेळी नवीद मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे साहेब यांना दिली.मंत्री धनंजय मुंडे यांनी नवीद मुश्रीफ यांच्या कामाची दखल घेत महाविकासआघाडी च्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देवून व सामाजिक शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बळकट करावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या.