वडरगे गावचे युवा कार्यकर्ते महादेव मोरे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहिर प्रवेश
गडहिंग्लज/प्रतिनिधी : आज ग्रामविकास मंञी हसनसो मुश्रीफ साहेब गडहिंग्लज दौरावर असताना महादेव मोरे यांनी मुश्रीफ साहेबांची पक्ष कार्यालयात भेट घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मफलर व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.राजेश गोरुले,शरद मोरे,मारुती पोटे,ओंकार मोरे,ओंकार गोरुले,दीपक चव्हाण,नागेश गायकवाड,ऋतिक हजारे,अभिजित आडावकर,सुहास पाटील,शशिकांत पोटे,मारुती गायकवाड,सुकेश रक्ताडे,संदिप यादव यांनी पक्षात प्रवेश केला यावेळी सुभाष पोटे उपस्थित होते.