Friday, December 20, 2024
Home ताज्या शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले - विरोधी पक्ष नेते...

शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा राजू शेट्टी यांना प्रतिटोला

शेतकरी चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा राजू शेट्टी यांना प्रतिटोला

 

सातारा/प्रतिनिधी : स्वत:ला शेतक-यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना आव्हान देण्याची विनाकारण भाषा करु नये. कारण निवडणुकांपूर्वी शेतक-यांच्या बांधावर जाऊन ज्या उध्दव ठाकरे यांनी शेतक-यांना कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी २५,००० रुपये देण्याचे व बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी ५०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्या वचनाचे काय झाले. शेतक-यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याचे जे वचन दिले होते त्या वचनाचे काय झाले याचेही उत्तर जनतेला द्या असा सणसणीत प्रतिटोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज शेट्टी यांना दिला. ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष आहात त्यांनी उध्दव ठाकरे यांनाच प्रश्न विचारावा की, गेल्या वर्षभरात फक्त खोटी आश्वासने देण्याएवजी शेतक-यांच्या हितासाठी काय केले याचा लेखा जोखा जाहिर करावा असेही दरेकर यांनी ठामपणे सांगितले.
रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर किसान यात्राच्या निमित्ताने आयोजित सभेत देरकर यांनी खोटी आश्वासने देणा-या महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठविली. याप्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडाळकर, माजी आमदर सुरेश हळवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतक-यांचे नेते म्हणवून घेणा-यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा करु नये. कारण देवेंद्रजी यांनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना न्याय देण्याचं काम केले आहे. शेतक-यांच्या सर्वागीण विकासासाठी, वेगवेगळ्या योजना आणून शेतकरी त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम कसा होईल याचा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्रजी यांनी केला असेही दरेकर यांनी ठणकावून सांगितले.
शेतकरी नेते शरद जोशी यांचा विचार शेतक-यांना आता पटला असेल. शरद जोशी नेहमी सांगायचे, ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या निघतील त्या दिवशी शेतकरी सुखी होईल. तेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अबलंबिले आहे. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, राजू शेट्टी बोलतात, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगावे फडणवीस यांच्या सरकारने काय भाव दिला. पण राजू शेट्टी तुमच्यामध्ये हिंमत असेल तर आव्हानाची भाषा करण्याएवजी शेतक-यांचे जे प्रश्न आहेत ते दूर करा व ते आव्हान स्वीकारा. एका विधानपरिषदेच्या तुकड्यासाठी अस्मिता गहाण ठेवणा-यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये तुमची जागा नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गोष्टी आम्हाला करतात, पण शिवराच्या माध्यमातून अख्खा भारतीय जनता पार्टी शेतक-यांच्या बांधावर जाऊन संवाद साधत होता. आम्ही सांगलीला शेतकऱ्यांसाठी अभियान सुरु केले, त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या बांधावर जायची भीती नाही, शेतकरी आमचा आहे, जे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते व नंतर आपलेच वचन विसरेल, त्यांना आधी विचारा असा टोलाही दरेकर यांनी लगाविला.
देशामध्ये शेतकऱ्यांच्या मनात कृषि कायदयाविषयी शंका निर्माण केली जात आहे. जो कायदा या देशाच्या, राज्याच्या शेतक-यांसाठी हिताचा आहे तो कायदा कसा चुकीचा आहे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात ज्या शंका असतील त्यांचे निरसन करण्याचा व कायद्याची नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचे प्रबोधन करण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी या आत्मनिर्भर यात्रेचे आयोजन केले आहे व कृषी कायदयाची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर मांडली त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो असेही दरेकर यांनी सांगितले.
दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर काही मूठभर दलाल शेतक-यांच्या नावावर आंदोलन उभे केले. देशातील एखाद- दुसरे राज्य सोडले तर या आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग नाही. महाराष्ट्रामध्ये काही नेत्यांनी शेतकऱ्यांना चिथविण्याचा प्रयत्न केला. हा कृषी कायदा कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माहित आहे, जेव्हापासून नरेंद्र मोदी देशाचं नेतृत्व करत आहे. तेव्हापासून मोदी यांचे सरकार सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहे, हा विश्वास देशातील जनतेमध्ये व राज्यातील शेतक-यांच्या मनात आहे. महाराष्ट्रातून या आंदेलनाला प्रतिसाद मिळाला नाही, काही नेते दिल्लीत गेले, दिल्लीची परिस्थिती पहिली तेव्हा तेथेही प्रतिसाद मिळाला नाही. प्रसिध्दी माध्यमांच्या मार्फत या आंदोलनाचे खरे रुप आपण पाहिले आहे. आंदेलक म्हणविणारे काही जण एसी बसमध्ये आंदोलक बसले होते, त्यांच्यासाठी खाण्याची निवा-याची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे हे आंदोलन पुरस्कृत असल्याचे चित्र आपण पाहिले आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
दरेकर यांनी आपल्या भाषणात कृषी कायद्याची वस्तुस्थिती उपस्थितांसमोर मांडली. विनाकारण काहीजण या कायद्यावरुन भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले की, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) व्यवस्था बंद होणार असा गैरसमज पसरविला जाज आहे. पण एमएसपी व्यवस्था बंद होणार नाही. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केल्या जाणार नीहत.तसेच कंत्राटी शेतीमध्ये फक्त पिकांचा करार होणार आहे. जमिनीचा होणार नाही व विक्री भाडेतत्व व तारण अशा कुठल्याहीप्रकारे जमिनीचे हस्तांतरण होणार नाही. शेतकरी कुठलाही दंड न भरता कधीही करार रद्द करु शकतो. तसेच नवीन कायद्यामुळे अडत्यांची दलाली रद्द होईल. शेतक-यांना आपला माल एपीएमसीच्या बाहेरही विकता येईल. शेतक-यांना कोणतीही कपात न होता थेट विक्री किंमत हाती पडेल. अश्या सोप्या शब्दात दरेकर यांनी वस्तुस्थिती सभेत मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments