Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्यामहसूल जत्रेत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले होण्यास सुरुवात सामंजस्याने रस्ते खुले...

महसूल जत्रेत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले होण्यास सुरुवात सामंजस्याने रस्ते खुले करण्यासाठी ग्रामस्थांनी संपर्क आणि सहकार्य करावे -जिल्हाधिकारी दौलत देसाई

महसूल जत्रेत पाणंद व वहिवाटीचे रस्ते खुले होण्यास सुरुवात सामंजस्याने रस्ते खुले करण्यासाठी ग्रामस्थांनी संपर्क आणि सहकार्य करावे -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 

कोल्हापूर, दि.२४ (जिल्हा माहिती कार्यालय)- जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या महसूल जत्रेत ज्या ज्या गावांमध्ये सध्या निवडणुका आहेत, ती गावे वगळून उर्वरीत गावांमधील पाणंद रस्ते वहिवाटीसाठी खुले करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राधानगरी तालुक्यातील हडकुळी पाणंद, भुदरगड तालुक्यातील नाझरे वसाहत दरम्यानचा ७०० मीटर पाणंद रस्ता आणि पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी सामंजस्याने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
जिल्ह्यात महसूल जत्रा सुरु करण्यात आली आहे. या जत्रे अंतर्गत १२२५ गावांमध्ये किमान एका गावातील अतिक्रमण काढून पाणंद रस्ता वहिवाटीस खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यानुसार गावांमधील पाणंद रस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने, सर्वसंमतीने आणि सामंजस्याने खुले करण्यात येत आहेत.कसबा वाळवे मंडळातील मौजे माजगाव ता राधानगरी मधील हडकुळी पाणंद रस्ता खुला करण्यात आला आहे.
मौजे मानवळे तालुका भुदरगड येथील भांडेबांबर पैकी नाझरे वसाहत ते सुतार शेत नदीकाठ एकूण सातशे मीटर पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना खुला करुन दिला आहे.
पन्हाळा तालुक्यातील कसबा कोडोली येथील सराफ रोड पाणंद रस्ता ऊस वाहतुकीसाठी खुला करुन दिला.दुसऱ्या टप्यात १५ जानेवारीनंतर ऊर्वरीत गावांमधील अतिक्रमणे काढून पाणंद रस्ते खुले करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांनी सामंजस्याने आणि सर्वसंमतीने पाणंद व रस्ते खुले करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा आणि या कामात सहकार्य करावे, असे आवाहन करुन ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभारही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments