Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeमाय मराठीडीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची 'क्यू स्पायडर्स' मध्ये निवड

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

डीवायपी साळोखेनगर अभियंत्रिकीच्या २० विद्यार्थ्यांची ‘क्यू स्पायडर्स’ मध्ये निवड

साळोखेनगर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग साळोखेनगर येथील २० विद्यार्थ्यांची “क्यू स्पयडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” या नामवंत बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना ४ लाख ते ६ लाख रुपये वार्षिक पॅकेज ऑफर मिळाली आहे. “क्यू स्पायडर टेस्ट यात्रा सॉफ्टवेअर सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड” ही आयटी क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि आघाडीची कंपनी आहे. या कंपनीच्यावतीने महाविद्यालयात झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.यामध्ये संगणक विभागाच्या १० विद्यार्थ्यांची सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर तर डाटा सायनाच्या १० विद्यार्थ्यांची पॉवर बीआयसह डेटा अनालिसिस्ट म्हणून निवड झाली आहे.
यावेळी बोलताना कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच आणि सॉफ्ट स्किल्स, प्रात्यक्षिक, मुलाखतीचे प्रशिक्षण यावर भर दिला जातो. याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना झाला. या मोठ्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची झालेली निवड संस्थेसाठी व विद्यार्थ्यांसाठी गौरवाची बाब आहे. प्राचार्य डॉ. सुरेश माने म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सातत्याने करिअर विषयक मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि ध्येय निश्चित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे.
यशस्वी निवदिसती कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. शिवानी काळे, डाटा सायन्स विभाग प्रमुख रोहीत राऊत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. प्रीती भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments