Friday, October 24, 2025
spot_img
Homeग्लोबल‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्याची गर्दी पाहून गणेशोत्सवाचा उद्देश सार्थकी - मंत्री...

‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्याची गर्दी पाहून गणेशोत्सवाचा उद्देश सार्थकी – मंत्री डॉ. उदय सामंत

‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्याची गर्दी पाहून गणेशोत्सवाचा उद्देश सार्थकी – मंत्री डॉ. उदय सामंत

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची, भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे.‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना २०१२ मध्ये मंत्री. डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरु झाली. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमुर्ती गोल सर्कल मंडळाला दिली आणि त्या माध्यमातूनच ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना प्रत्यक्षात सुरु झाली. आज (२० जुलै) ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉ. उदय सामंत सहभागी झाले. त्यांनी श्री गणरायाचं पूजन करुन दर्शन घेत मनोभावे आशीर्वाद घेतले. यावेळी गोल सर्कल मंडळाच्यावतीने मंत्री डॉ. उदय सामंत यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित गणेशभक्तांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. गणेशभक्तांची गर्दी पाहून समाधान वाटले. ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु करण्यात आला होता, तो उद्देश सार्थकी लागल्याचे पाहून मनोमन समाधान मिळाले. कोल्हापूरच्या राजाचं आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता आणि संस्कृतीचा मोठा उत्सव असल्याची प्रतिक्रिया डॉ. सामंत यांनी दिली. मंत्री डॉ. उदय सामंत यांच्याच पुढाकारातून पहिल्यांदा ‘रत्नागिरीचा राजा’ आणि त्यानंतर कोल्हापूरचा राजा ही परंपरा सुरु करण्यात आली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, पुष्कराज क्षीरसागर, गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील, उपाध्यक्ष गौरव यादव, सतीश नलगे, रूपेश बागल, गणेश पाटील, नेताजी पाटील, रूपेश पाटील, सचिन पाटील, भारत पन्हाळकर, शुभम लाड, आदित्य दाते, शिवम पोवार यांच्यासह मोठ्या संख्येने कोल्हापूरवासिय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments