Tuesday, July 8, 2025
spot_img
Homeग्लोबलपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैला

पन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैला

पन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैला

कोल्हापूर/प्रतिनिधी : पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी शिवराष्ट्र परिवार – महाराष्ट्रतर्फे १२ ते १४ जुलै रोजी ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या देशव्यापी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या मोहिमेचे ३२ वे वर्ष असून यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पानिपतकार विश्वास पाटील, नरवीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सरसेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे, तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे, सरदार पिलाजी सनस यांचे वंशज बाळासाहेब सनस यांचा मोहिमेत विशेष सहभाग असणार आहे.
शनिवारी, १२ जुलै २०२५ रोजी वीर बाजीप्रभू देशपांडे पुतळा, पन्हाळगड येथे सकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते वीरांचे पूजन होऊन मोहिमेस सुरुवात होईल. १४ जुलै रोजी पावनखिंडमध्ये सकाळी १० वाजता मोहिमेचा समारोप होईल.
शनिवारी (दि. १२) रोजी खोतवाडी येथे पावनखिंड रणसंग्राम हा माहितीपट मोठ्या पडद्यावर दाखविला जाईल, त्यानंतर इतिहास व्याख्याते दिपकराव कर्पे यांचे व्याख्यान होईल. सोमवारी (दि. १४) इतिहास अभ्यासक भुपाल शेळके यांचे पावनखिंडीत व्याख्यान होईल.
मोहिमेचे प्रवेश शुल्क १२०० रुपये असून यामध्ये पाच जेवण, तीन नाष्टा, पाच चहा, मुक्काम, बॅग वाहून नेण्याची व्यवस्था, पावनखिंड माहितीपटचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी मोहीम प्रमुख ऋतुराज चौगुले (मो.९८९०१९११५४), विनायक जाधव (मो.९५५२०७५९९३ ), हॉटेल वूडहाऊस, जुने गायन देवल क्लब समोर, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवराष्ट्र परिवारचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments