श्री.अमर पाटील आणि सौ.सविता पाटील यांनी यांनी वटपौर्णिमेदिवशी आलेल्या लग्नाचा वाढदिवस
श्री.अमर पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. सविता यांच्या लग्नाचा वाढदिवस ११ जून रोजी म्हणजेच वटपौर्णिमा दिवशीच होता योगायोगाने आज वटपौर्णिमाही आहे. या दिवशी सर्वत्र वडाच्या झाडाचे पूजन करण्यात येते. सर्व महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सात जन्मी हाच पती लाभावा यासाठी प्रार्थना करतात. अमर पाटील यांच्या सहचारिणी सविता यांनीही वटसावित्रीची पूजा केली व त्याचबरोबर भुये गावच्या भैरोबा माळावर एक वडाचे झाड लावले, जेणेकरून त्याची पूजा आयुष्यभर करता येईल व हा दिवस कायम लक्षात राहील.
आजच्या दिवशी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. आमचे बंधू बाजीराव पाटील दादा, पांडुरंग पाटील व विठ्ठल पाटील यांच्या हस्ते भुये गावच्या मैदानाभोवती पिंपळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. उन्हाळ्यात मैदानावर खेळणाऱ्या मुलांना सावली मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रसंगी आमचे चिरंजीव पार्थ पाटील, केदार पाटील, आमची भाची अमोली देशमुख, ओम पाटील, विश्वजीत पाटील, तसेच भुये गावातील ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







