जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उत्सव पुनर्चक्रीकरणाचा उपक्रमाचे ५ ते ८ जून चार दिवस आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : ५ जून हा दिवस संपूर्ण जगात पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सर्वत्र पर्यावरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट घटकाबाबत विविध उपक्रम घेतले जातात.याचाच एक भाग म्हणून पुनर्चक्रीकरणांमध्ये वैज्ञानिक प्रक्रियेसाठी कचरा विलगीकरण केंद्र स्थापन करून त्यात विभागानुसार कचऱ्याचे वर्गीकरण होणे कायद्यानुसार अपेक्षित आहे परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.त्यामुळे पुनर्चक्रीकरण योग्य होत नाही. कचरा ही रस्त्यावर तसेच डम्पिंग ग्राउंड वर सहज नष्ट होत आहे. पुनरचक्रीकरण करण्यात प्रत्येक वस्तूला विशिष्ट किंमत व मूल्य आहे. ती जबाबदारी फक्त कचरा वेचकांची नसून सर्व नागरिकांची आहे याची जाणीव जागृती व्हावी म्हणून अवनि संस्था व किर्लोस्कर ऑइल इंजिन्स पुढाकाराने तसेच इतर सामाजिक संस्थेच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा चार दिवस ५ जून ते ८ जून साजरा करण्यात येणार आहे..अशी माहिती अवनीच्या अनुराधा भोसले आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे
शरद आजगेकर,अनिल चौगुले यांनी पत्रकार बैठकीत दिली.
त्यात कचरावेचक बचत गट सामाजिक संस्था यांचा सहभाग पुनर्चक्रीकरण उत्सवा मध्ये होणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री शाहू स्मारक भवनच्या कलादालनामध्ये असणार आहे यातून बचत गटाने पुनर्चक्रीकरणाच्या वस्तू निर्मिती व विक्रीची संधी उपलब्ध होणार आहे त्यात कागदी फुले,पिशव्या औषधी वनस्पती,बॉटल आर्ट घोंगडी,गोधड्या यांचे प्रदर्शन व विक्री केली जाईल.यातून स्थानिक कचरावेचकांना रोजगार मिळणार आहे. किमान ३५ बचत गट सहभागी होणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी सकाळी ११.०० वाजता ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. जय सामंत डॉ. मधुकर बाचुळकर डॉ.मंजुळा पिशवीकर यांचे
पुनर्चक्रीकरणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन होईल. तसेच आंतरराष्ट्रीय कचरावेचक आघाडीच्या उपाध्यक्ष सुशीला साबळे यांच्या उपस्थितीत पुनर्चक्रीकरणांमध्ये उत्सवाचे उद्घाटन केले जाईल. दिनांक ५ ते ८ जून दरम्यान शाहू स्मारकाच्या बाहेरील बाजूस पुनर्चक्रीकरण होऊ शकणाऱ्या वस्तूंची भिंत उभारली जाईल . नागरिकांनी येताना सोबत घरातील रिसायकलिंग होणाऱ्या योग्य वस्तू त्या देणगी म्हणून द्याव्यात असे आवाहन करण्यात येणार आहे. चार दिवस चालणाऱ्या पुनर्चक्रीकरण उत्सवात किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, निसर्ग मित्र, गार्डन्स क्लब, संग्राम संस्था, स्त्रीमुक्ती संघटना सेंटर फोर रेनॉसा,जीवन मुक्ती सेवा संस्था, वसुधा कचरावेचक संघटना, अर्थ वॉरियर्स, इशरे कोल्हापूर चॅप्टर, इकोस्वास्थ्य, स्त्री मुक्ती संघटना, डॉ.व्ही टी.पाटील फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर, महिला दक्षता समिती, जाणीव संस्था शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभाग,रोटरी क्लब ऑफ गार्गीज, वर्ल्ड फॉर नेचर,
संपूर्णअर्थ लाईव्हलिवुड फाउंडेशन,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ अशा विविध संस्था संघटना सहभागी असणार आहेत तसेच चार दिवस दररोज सायंकाळी ३ ते ६ या वेळेत टेरेस वरील परसबाग, घरातील ओल्या कचऱ्यापासून खत तयार करणे,पर्यावरण पत्रावळी रानभाज्याचे महत्व, टाकाऊ नैसर्गिक पदार्थ पासून बायो एंजाइन्स बनविणे यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अवनि संस्था गेले पंधरा वर्षे कचरा वेचकांच्या प्रश्नावर कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १२३०कचरा वेचकांचे संघटन करण्यात आले आहे. तर सांगली येथे ४२० व सातारा जिल्ह्यात ५५० कचरा वेचकांचे संघटन करण्यात आले आहे. कचरा वेचक भगिनी ह्या उदरनिर्वाहसाठी विक्री योग्य प्लास्टिक व लोखंड रस्त्यावरून फिरून गोळा करतात व विक्री करून कुटुंब चालवतात. त्याच्या या कामाचा फायदा त्याच्यापेक्षा जास्त पर्यावरणाला होतो.
रस्त्यावरून तसेच कोंढाळ्यातून कचरा गोळा करताना फक्त पुनर्चक्रीकरण होणारा व योग्यच कचरा उचलला जातो.
कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक त्यांच्या रोजच्या कामातून रोजचे किमान ८ टन प्लास्टिक डम्पिंग ग्राउंड वर जाण्यापासून वाचविले जाते.
त्यांना यातून जमतेम रोजी रोटी मिळते परंतु यातून जमा झालेल्या वस्तूचे शंभर टक्के पुनर्चक्रीकरण होते. त्यामुळे कचरा वेचकांचे पुनर्चक्रीकरणांमध्ये योगदान असल्यामुळे सरकारने २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यात त्यांचा समावेश केला आहे. त्यांना ओळखपत्र म.न.पा व जिल्हा परिषदेने दिले पाहिजे. त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेतले पाहिजे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट निर्देश आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने आपले शहर आणि संपूर्ण जिल्हाभर कचऱ्याचे ढीग आढळतात. तसेच नागरिकांनी घंटागाडी कडे ओला सुका कचरा वेगळा करून द्यायचा आहे परंतु तेही होताना दिसून येत नाही.
पत्रकार बैठकीस अनुराधा भोसले, शरद आजगेकर, रघुनाथ पाटील, अनिल चौगुले , शिवानी गजबर, वनिता कांबळे,साताप्पा मोहिते, भारती कोळी अक्काताई गोसावी,सारिका भोरे, संगीता लोंढे यांची उपस्थिती होती.







