Friday, October 24, 2025
spot_img
Homeग्लोबलसंशोधक घडवताना: डॉ. जिरगे यांचे संपादकीय आणि वैज्ञानिक नेतृत्व – अँसपायर २०२५...

संशोधक घडवताना: डॉ. जिरगे यांचे संपादकीय आणि वैज्ञानिक नेतृत्व – अँसपायर २०२५ सिंगापूरमध्ये भारताची प्रेरणादायी उपस्थिती

संशोधक घडवताना: डॉ. जिरगे यांचे संपादकीय आणि वैज्ञानिक नेतृत्व – अँसपायर २०२५ सिंगापूरमध्ये भारताची प्रेरणादायी उपस्थिती

सिंगापूर /प्रतिनिधी : प्रजनन विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचा दबदबा अधिक बळकट करत, अँसपायर संस्थेच्या अधिकृत शास्त्रीय जर्नल Fertility and Reproduction च्या कार्यवाह संपादक डॉ. पद्मा रेखा जिरगे यांचा अँसपायर २०२५ या वार्षिक परिषदेत मानाचा सहभाग असून, ही परिषद १ ते ५ मे २०२५ दरम्यान सिंगापूरमध्ये होत आहे.
ही परिषद महिला आणि पुरुष वंध्यत्वाच्या विविध पैलूंवर केंद्रित असून, उपचार प्रक्रियेत वैद्यकीय तसंच भावनिक व सामाजिक अडचणींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी नविन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नैतिक दृष्टिकोन कसा उपयोगी पडतो, यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.
या परिषदेत डॉ. जिरगे एक विशेष कार्यशाळा घेणार असून, ती शास्त्रीय लेखनातील गुणवत्ता सुधारणा आणि संशोधन जर्नल्ससाठी सक्षम समिक्षक (peer reviewers) घडवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या उपक्रमामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील संशोधक आणि नवोदित लेखकांना व्यावहारिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच डॉ. जिरगे दोन महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सत्रांचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, ‘Young Awardees’ या विशेष सत्राचेही संचालन करतील. या सत्रातून उदयोन्मुख संशोधकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.डॉ. जिरगे यांची भूमिका केवळ संपादकीय नेतृत्वापुरती मर्यादित नसून, प्रजनन शास्त्र क्षेत्राला वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टिकोनातून दिशा देणारी ठरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments