परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत : शिवरूप सूर्यकांत गायकवाड
नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेल्या सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत गायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमौरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांचा करण्यात आला सन्मान
कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या करविर नगरीचे तीन सुपूत्र १२३ दिवसात पायी ३५०० किलोमिटरची नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले आहेत. या मध्ये सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत मायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमौरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांनीही परिक्रमा पूर्ण केली आहे. तसेच यापूर्वी नर्मदा परिक्रमा पुर्ण केलेल्या इतर परिक्रमावासीयांचा सहज सेवा ट्रस्टच्या वतीने आज परिक्रमा पुर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला. आहे.
१८ नोव्हेंबर २०२४ रोजी ही नर्मदा परिक्रमा यात्रा या तिघांनी सुरू केली होती. या परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून सुरू झाली पुन्हा ती ओंकारेश्वर येथे संपली तर दक्षिण तट आणि उत्तर तट अशा दोन विभागात ही परिक्रमा करण्यात आली. या परिक्रमेचा शुल पाणी जंगल हा भाग लांब अंतराचा होता. हे तिघे दररोज २० किलोमीटर पायी चालत होते.
कार्यक्रमाची सुरुवात कन्यापूजनाने करण्यात आली.त्याच वेळी वरील परिक्रमावासी त्यांचे अनुभव ही कथन करणार आहेत.सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त शिवरूप सुर्यकांत गायकवाड व त्यांच्या बरोबर श्री. हरिश बिलीमोरीया व प्रा. गिरीश अभ्यंकर यांनी आपले अनुभव यावेळी उपस्थितांना सांगितले.
यावेळी शिवरूप सूर्यकांत गायकवाड यांनी आपले अनुभव सांगताना असे सांगितले की, नर्मदे हर चा जयघोष करवासा वाटला कारण अजूनही नर्मदा मैय्या डोळया समोरन जात नाही. जिचं प्रथम दर्शन, तिच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही तटावर असणारे गावे, मंदिरे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कथा… शूलपाणी जंगलातील पायी सफर, दाट अरण्यातील अनुभव, वाटेत भेटलेले परिक्रमावासी… या सगळ्याच आठवणींचा एक कोलाज मनामध्ये भरुन गेला आहे. चार महिन्याच्या परिक्रमेत आलेले अनुभव असे सांगत बसलो तर किती रात्री आणि किती दिवस असे जातील याची मोजदाद नाही. परिक्रमा उचलताना मनात दाटलेले भाव आणि परिक्रमा पूर्ण केल्यानंतर मनात दाटलेले भाव पार अंतरगं बदलून टकणारे आहेत. मैय्याची पवित्रता मनातील अहंकार धुवुन टाकणारी आहे. याची जाणिव प्रत्येक वळणावर होत होती. पाठीवरच सामान, हातात काठी, अंगावर श्वेत वस्त्र लेवून फक्त चालत रहायचं. मुक्कामाच्या ठिक़ाणी कधी जेवण मिळायचं कधी स्वत:ला बनवावं लागायचं… बालभोग अर्थात नाष्ता बहुतेकदा मिळायचा. पण जेव्हा मिळायचा नाही तेव्हा कुणी ना कुणीतरी, कठल्या ना कूठल्या ना कुठल्या रुपात येवून नाष्ता द्यायचा. हे सगळे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. नर्मदा परिक्रमेचा हा पायी ३२०० किलोमीटरचा प्रवास माझ्याकडून मैय्या ने करुन घेतला असा अनुभव शिवरूप सूर्यकांत गायकवाड यांनी कथन करताना सांगितले.
यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे यांनी बोलताना सूर्यकांत गायकवाड हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. परिक्रमा पूर्ण करून गप्प बसणार नाही संघटनेची व्याप्ती वाढवेल आणि इतरांनाही मार्गदर्शन करेल असे उद्गार सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे यांनी सूर्यकांत गायकवाड यांच्या विषयी काढले. यावेळी मिरजे यांनी बोलताना त्यांच्यासोबत केलेल्या यात्रांचा अनुभव सांगितला.ही परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे एक पार भक्ती आणि श्रद्धा आवश्यक आहे. या जोरावरच त्यांनीही परिक्रमा पूर्ण केली आहे.असेही
सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मती मिरजे म्हणाले.
यावेळी चंद्रकांत कडोलकर,सिद्धु लकार, बंडोपंत चव्हाण अविनाश बोकील, डॉ. प्रदीप कुलकर्णी, धैर्यशील पाटील,श्री. वसंत घाडगे, गजानन कापरे संजय जोशी, माणिक जोशी, बाळासाहेब निपाणीकर, ज्योत्स्ना डासाळकर, रवींद्र कुलकर्णी, रोहिणी कापरे, दिनेश लिंगारे, ललिता पाटील, ओंकार गाडगीळ, विश्वास माळी, अविनाश कळंत्रे, उदय कुलकर्णी, सुनिता नकाते. आदी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
यावेळी सहज सेवा ट्रस्टचे विश्वस्त सन्मत्ति मिरजे,प्रमोद पाटील,किरण शहा,अरविंद परमार यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.वसंतराव चौगुले पतसंस्थेचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.प्रसन्न मालिकेर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रास्ताविक निर्मिती ॲड एजन्सीचे अनंत खासबागदार यांनी केले.आभार प्रमोद पाटील यांनी मानले.मा.नर्मदेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली