कोल्हापूरमध्ये मराठी चेवर ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने २० मार्च ते २४ मार्च महाराष्ट्र लापारी पेठचे आयोजन
कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ ही संस्था गेली ४५ बर्ष मराठी उद्योजक आणि व्यापात्यांच्या उत्कर्षासाठी निस्वार्य बुद्धीने अहोरात्र कार्य करत आहे.
‘महाराष्ट्र आपारी पेठ’ हा आमचा मराठी उद्योजक, लघु उद्योजकांसाठी विशेषतः महिला उद्योजकांसाठीचा एक विशेष उपक्रम आहे.’महाराष्ट्र व्यापारी पेठ’ द्वारे उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिलं गेलं आहे.कोल्हापुरात पहिल्यांदाच दिनांक २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये सदर ‘महाराष्ट्र लापारी पेठचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री.बाबा खोडवे आणि कार्याध्यक्ष श्री.मनोहर पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९८९ सालापासून ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’चं आयोजन मराठी चेवर ऑफ कॉमर्स’ या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. गेली ३५ वर्ष मुंबईमधील दादरच्या डिसिल्वा हायस्कूलमध्ये सलग ६८ दिवसांची व्यापारी पेठ आयोजित केली जात आहे.
२०२५ मध्ये राज्याच्या विविध महानगरांमध्ये, शहरांमध्ये आम्ही ‘महाराष्ट्र आापारी पेठ’चं आयोजन करणार आहोत. कोल्हापूर मध्ये २० मार्च ते २४ मार्च यादरम्यान राजारामपुरी येथील डॉक्टर व्हि.. टी. पाटील हॉलमध्ये ही व्यापार पेठ होत आहे.याद्वारे कोल्हापूर मधील लघुउद्योजक, महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या हा आमचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.