उद्योजक आण्णासाहेब चकोते याची ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफैक्चरिंग असोशिएशनच्या “सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग आठव्यांदा फेरनिवड
जयसिंगपूर/नांदणी/प्रतिनिधी : चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफैक्चरिंग असोशिएशन नवी दिल्ली या संस्थेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर सलग आठव्यांदा फेरनिवड करण्यात आली. नवी दिल्ली मधील प्रगती मैदान येथे दि ७ मार्च २०२५ रोजी आयोजीत केलेल्या संस्थेच्या ३९ व्या वार्षिक संमेलनामध्ये सर्वानुमते ही निवड करण्यात आली.
परफेक्ट ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. एच.के. बत्रा यांची असोशिएशनचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली. यावेळी संपुर्ण भारतातील सर्व सन्माननिय सदस्य उपस्थित होते,
श्री.गणेश बेकरी नांदणी प्रा. लि. व चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांच्या औद्योगीक व सामाजीक क्षेत्रातील योगदानाबद्दल यावेळी त्यांचा विशेष सन्मान करणेत आला.यावेळी बोलताना चकोते यांनी सलग आठव्यांदा या पदावर फेरनिवड करून आपल्यावर विश्वास दाखविला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून असोसिएशनच्या माध्यमातून बेकरी व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.ऑल इंडीया ब्रेड मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणूण आण्णासाहेब चकोते यांनी देशभरातील बेकरी उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीने,एक समन्वयक म्हणूण मोलाची भुमिका बजावली आहे, उद्योगव्यापी सुधारणांचा त्यांचा अथक पाठपुरावा व अभ्यासपूर्ण माहितीचा बेकरी व्यवसायाला फार मोलाचे पाठबळ मिळाले आहे.
चकोते यांनी व्यवसायापलीकडे जाऊन सामाजिक कार्यात सतत नवनवीन उपक्रम राबवून सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कामामुळे हजारो लोकाच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाले आहे. व असंख्य लोकांना रोजगार मिळवून दिला आहे.
यावेळी गणेश बेकरी नांदणीच्या संचालिका आण्णासाहेब चकोते यांच्या कन्या ऋतुजा चकोते यांनी या वार्षिक संमेलनामध्ये ‘गणेश बेकरी नांदणी कडून प्रतिनिधीत्व केले. त्या व्यवसायात नव्या पिढीचे ते नेतृत्व करीत आहेत. अल्पावधीतच त्यांनी आपली चिकीत्सक वृत्ती व सखोल अभ्यास यामुळे या बेकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.संमेलनामध्ये बेकरी व्यवसाय वाढीसाठी विविध विषयावर मंथन करणेत आले. नवीन टेक्नॉलॉजी, जागतिक स्पर्धा, शासनाचे विविध नियम, भारतीय बाजारपेठेमधील बेकरी उत्पादनाविषयी ग्राहकांच्या मध्ये जागरुकता निर्माण करणे आदी विषयावर विचार विनिमय करण्यात आले.यावेळी भारतीय बेकरी उद्योगामधील बहूमोल योगदानाबद्दल रत्ना मशिन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री नजाकत हुसेन यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय गहू पिक उत्पादक सोसायटीचे चेअरमन श्री अजय गोयल व विशेष अतिथी म्हणून वजन मापन,ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय,भारत सरकारचे संचालक श्री आशुतोष अग्रवाल हे उपस्थित होते.
यावेळी ऑल इंडीया ब्रेड मैन्युफॅक्चरींग असोशिएशनचे माजी अध्यक्ष रमेश मागो (किट्टी ब्रेड) नवनिर्वाचीत अध्यक्ष एच. के. बत्रा ( परफेक्ट ब्रेड) उपाध्यक्ष अरविंद सिंघल (ब्रिटानिया इंडस्ट्रीज) शिवकुमार गुप्ता ( आशाराम & सन्स ) ट्रेझरर संदीप आहुजा ( मिल्कमेड) आदी मान्यवर व देशभरातील बेकरी व्यवसायीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.