“भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ” फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन” स्पर्धा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर येथे गुरूवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलच्या अंतगर्त डिप्लोमा व बी. फार्म विद्यार्थ्यांच्यासाठी “फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन” स्पर्धे चे आयोजन करण्यात आले, ही स्पर्धा विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सवर आधारित होती.
या स्पर्धेचे उदद्याटन महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे सर, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया सर, आयसीसी प्रेसिडेन्ट प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, प्रा. विशिन पाटील, प्रा. पुजा केनवडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
डॉ. एच. एन मोरे सर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व सांगीतले की, विज्ञानाच्या फायद्यांबददल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी विज्ञान दिवस साजरा केला जातो. ही स्पर्धा रिसर्चसाठी व कौशल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांनी उपयोग करावा. एकविसावे शतक हे डिजिटलायझेशन आणि संशोधनावर भर देणारे आहे.
या स्पर्धेसाठी ११० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यकमाचे परिक्षक म्हणून डॉ. राहुल अडनाईक उपप्राचार्य, आनंदी कॉलेज कळे, डॉ. अभिनंदन पाटील असोसिएट प्रोपेसर, डॉ. डि. वाय. पाटील कॉलेज कोल्हापूर यांनी काम पाहीले फार्मइनव्हेन्शीया २०२५ नॅशनल लेव्हल मॉडेल प्रेझेन्टेशन स्पर्धेच्या डिप्लोमा विभागातून प्रथम कमांकाच्या मानकरी कु. राजनंदिनी पाटील आनंदी कॉलेज कोल्हापूर व कु. निकीता नाले काळंबे ट्रर्फ कळे व डिप्लोमा व्दीतीय विजेती कु. श्रेया पवार व दिक्षा पाटील भारती विद्यापीठ डिप्लोमा कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर शाखेच्या विद्यार्थीनी तर बी. फार्म स्पर्धेच्या प्रथम कमांकाची विजेती कु. सानिका जाधव आप्पासाहेव बिरनाळे कॉलेज सांगली, व्दीतीय विजेती कु. साक्षी सुर्यवंशी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी पलुस, उत्तेजनार्थ कु सुप्रीया तळकर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर शाखेची विद्यार्थीनी.
कार्यकमाचे मुख्य समन्वयक म्हणून प्राध्यापक सौ विशिन पाटील व कार्यकमाचे सह समन्वयक म्हणून प्रा.पी.बी. केनवडे यांनी काम पाहीले, कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे सर, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटीया, प्रा. आर. जे. जरग, प्रा.डॉ. डी. ए. भागवत, डॉ. एफ.ए. तांबोळी, प्रा.पी. पी. चौधरी, प्रा. विशिन पाटील, कार्यलयीन अधिक्षक श्री. सचिन पाटील, श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, श्री. किशोर हराळे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.