८ मार्च जागतिक महिला दिनी कोल्हापुरात परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज येणार
गांधी मैदान येथे महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र तर्फे राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन,पार पडणार कुंकूमार्चन सोहळा
कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय महिला दिनी शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात आले आहे या संमेलनासाठी योगऋषी परम पूज्य श्रद्धेय रामदेव स्वामीजी महाराज तसेच मातृ शक्तीच्या प्रेरणास्थान महिला मुख्य केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रियाजी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला वरिष्ठ महिला राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ.अरुंधती महाडिक , सन्मती मिरजे, पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रभारी चंद्रशेखर खापणे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष छाया पाटील,प्रमोद पाटील अध्यक्ष, हिल रायडर्स आदी उपस्थित होते.करवीर नगरीमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी या राज्यस्तरीय महासंमेलनाची सुरुवात कुंकूमार्चनाने सकाळी ९ वाजता होणार आहे. यानंतर गांधी मैदान येथे योगऋषी परमपूज्य श्रद्धेय स्वामीजी रामदेव महाराज
आजच्या धकाधकीच्या काळात महिलांच्या अनेक समस्या आहेत. महिला याच मुख्य मातृशक्ती आहेत. परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज व पूज्य साध्वी देवप्रियाजी, या भारतीय संस्कृती, भारतीय शिक्षण पद्धती, आरोग्य निरोगी राहण्यासाठी योग अशा विविध गोष्टीवर मार्गदर्शन करणार आहेत.
स्वामीजींनी योग आयुर्वेद स्वदेशीकांतील स्वदेशी क्रांती, स्वदेशी शिक्षा, गुरुकुल शिक्षण, स्वदेशी चिकित्सा, शिक्षणप्रसार १४५ कोटी भारत वासिंना तसेच जगातील दोनशे देशातील करोडो कोकांना स्वस्त, समृद्ध, आध्यात्मिक जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. हेच मार्गदर्शन स्वामीजी कोल्हापूर या महासंमेलनामध्ये करणार आहेत.
कुंकू मार्चना बरोबर सांकृतिक कार्यक्रम, महिलांच्या रणरागिणी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा, संस्थांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण महाराष्ट्रातून दहा हजार महिला सहभागी होतील असा अंदाज आहे. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महिला योग समितीच्या १०० योगशिक्षिका स्वयंसेवक म्हणून कार्यरत राहणार आहेत.सदरचा कार्यक्रम योग शिक्षका बरोबर सर्व माता भगिनींसाठी खुला असून महिलांसाठी भोजनाची ही व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांसह सर्वांनी या महासंमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन महिलांनीच मिळून केलेले आहे.हे महासंमेलन सर्वांसाठी मोफत आहे. यावेळी पत्रकार परिषदेला दीप्ती कदम, मंगल वैद्य,अनिल जोशी, अनिता जोशी, स्नेहल कुलकर्णी,अनुपमा गोरे,नीता राजपूत, कल्पना ठोकळ आदी महिला संयोजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.