Sunday, December 22, 2024
Home ताज्या डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान - संजय घोडावत विद्यापीठाची...

डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान – संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान – संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

 

अतिग्रे/प्रतिनिधी :अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ. पवार यांनी २०२० पासून सलग पाच वर्षे, हे स्थान कायम राखले आहे. या प्रतिष्ठेच्या यशामुळे संजय घोडावत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर अधिक उजळले आहे.
डॉ. पवार यांनी आधुनिक पदार्थ विज्ञान आणि अ‍ॅप्लाइड फिजिक्स या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले असून, जागतिक पातळीवरील ३०४,७३८ संशोधकांमध्ये ३०४१वा क्रमांक मिळवला आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि अथक परिश्रमांचे प्रतीक आहे.
याव्यतिरिक्त, भारत सरकारकडून डॉ.पवार यांना एक विशेष प्रकल्प मिळाला आहे, ज्यात कार्बन डाय-ऑक्साइडचे इंधन (इथेनॉल, मिथेनॉल) तयार करण्यासाठी वापर करण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे जागतिक ऊर्जा संकटावर मात करण्यात भारताच्या प्रयत्नांना नवा आयाम मिळणार आहे.डॉ. पवार यांनी सुपरकॅपेसिटर, पाण्याचे विघटन, सौरघट, आणि ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञान या क्षेत्रांत भरीव संशोधन केले आहे, ज्यामुळे अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांच्या विकासात मोलाची भर पडली आहे.विश्वस्थ विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनीही डॉ. पवार यांचे अभिनंदन केले आहे.

चौकट

संजय घोडावत यांनी डॉ. पवार यांचे अभिनंदन करताना सांगितले,डॉ. पवार यांचे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य सतत पुढे जात आहे, आणि त्यांचे यश आमच्या शैक्षणिक व संशोधन कार्यात भरीव योगदान देत आहे.

चौकट

कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, डॉ. पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य अधिक गतीने पुढे जाईल आणि नव्या वैज्ञानिक शोधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.डॉ. पवार यांचे हे यश त्यांचे अथक परिश्रम आणि संशोधनातील निष्ठेचे फलित आहे. त्यांचे यश नव्या संशोधकांना प्रेरणा देणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments