Thursday, June 26, 2025
spot_img
Homeताज्याएस जी यु आयडॉल २०२४ चा निखिल मधाळे मानकरी घोडावत विद्यापीठाकडून राष्ट्रीय...

एस जी यु आयडॉल २०२४ चा निखिल मधाळे मानकरी घोडावत विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेची उत्साहात सांगता

एस जी यु आयडॉल २०२४ चा निखिल मधाळे मानकरी
घोडावत विद्यापीठाकडून राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेची उत्साहात सांगता

जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठ व इंटरनॅशनल स्कूल मुळशी,पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या एस जी यु आयडॉल २०२४ या राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेची सांगता 1 मे रोजी जयसिंगपूर येथील यड्रावकर सभागृहात झाली. या स्पर्धेत निखिल मधाळे एस जी यु आयडॉल चा पहिला मानकरी ठरला.तर शर्वरी कुलकर्णी, सागर चंदगडकर उपविजेता ठरले.संजय घोडावत यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रातील युवा गायकांच्या गायन कौशल्याला व्यासपीठ मिळावे या हेतूने एस जी यु आयडॉल २०२४ या राष्ट्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा राज्यातून ५,००० गायकांमधून ४२ स्पर्धकांची सेमी फायनल साठी निवड करण्यात आली होती. यातून १६ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.
जयसिंगपूर येथील सहकार महर्षी श्री शामराव पाटील यड्रावकर सभागृहात पार पडलेल्या अंतिम स्पर्धेत निसरी,गडहिंग्लज येथील निखिल मधाळे यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले.यावेळी त्यांना ५१,५५५ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कोल्हापूर येथील शर्वरी कुलकर्णी यांना २५,५५५ रू.व सन्मान चिन्ह, तृतीय पारितोषिक बेळगावी कर्नाटक येथील सागर चंदगडकर यांना १५,५५५ रू.व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी चार गायकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना विश्वस्त भोसले म्हणाले की विद्यार्थी व युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संजय घोडावत शैक्षणिक संकुल नेहमीच पुढाकार घेत असते.दरवर्षी आम्ही या स्पर्धेचे आयोजन करून, राष्ट्रीय स्तरावर युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली. या स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक म्हणून प्रल्हाद जाधव, शिवाजी पाटील, आणि संज्योती जगदाळे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश बापट यांनी केले. तर व्यवस्थापन मल्हार इव्हेंट्स यांनी केले. यासाठी स्वरांजली ऑर्केस्ट्रा यांनी संगीत साथ दिली. तर समन्वयक एस एम डिसूजा यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला सांगली,कोल्हापूर, गोवा,कर्नाटक येथील रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments