Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत आरोग्यवर्धिनी समितीच्या माध्यमातून आरोग्य सेवांवर थेट देखरेख — आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

Thumbnail

View All
माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Tile List

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी

गोकुळच्या बदनामी विरोधात डॉ. युवराज येडूरे यांच्या आत्मक्लेश आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी महिला सहभागी कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हयातील शेतकरी परिवाराची आर्थिक सह सर्वागीण प्रगती साठी मोलाचे योगदान…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

द इंडिया स्टोरी’च्या नव्या पोस्टरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा लोकांच्या रोषाशी सामना

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए विद्यार्थ्यांचा आयआयएम तिरुचिरापल्ली येथे डोमेस्टिक इमर्शन प्रोग्राम संपन्न

माय मराठी

गोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणार ​

Tile Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पेपरफुटी विरोधात शनिवारी काँग्रेसची धरणे आंदोलन व कॅन्डल मार्च,राजारामपुरीतून सायबर कॉलेजपर्यंत निघणार मार्च

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार

List Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरातून लाखो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देवू : आ.राजेश क्षीरसागर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना मिळावी विठुरायाला १३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सद्बुद्धी दिंडीने साकडे   कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यभरातून जोरदार विरोध…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

नवी दिल्ली येथे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या कलाकारांचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार

१५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणार्‍या कार्यक्रमात, कोल्हापुरातील श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनचे कलाकार सहभागी होणार, खासदार धनंजय महाडिक यांच्या…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया! - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ​ अजित पवार यांची जयंती…

Grid Posts

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

Thumbnail

View All
My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती…

माय मराठी

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु   कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी,…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती २३०० हून अधिक जागांची वाढ…

My Marathi महाराष्ट्र माय मराठी मुख्य मुंबई

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक कोल्हापूर/प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला…

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय पशु चिकीत्सा परिषद (VCI)) आणि केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय, मंत्रालयाचा पक्षू संवर्धन विभागाच्या अंतर्गत श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर यांना नुकतीच पशुवैद्यकीय महाविद्यालय २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून अधिकृत परवानगी मिळाली आहे.
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार राज्यात प्रथमच खाजगी तत्वावरील पशुवैद्यकीय महाविद्यालय चालवली जाणार आहेत. एकूण ५ खाजगी तत्वावरील पशुवैद्यकीय महाविद्यालायापैकी एक पशुवैद्यकीय महाविद्यालय कणेरी, कोल्हापूर येथे केंद्र सरकारच्या मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय विभागाच्या दिनांक २५ जून २०२६ च्या आदेशान्वये (Letter of Permission) मंजूर करण्यात आलेले आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा या भागातील विद्यार्थ्यांना ‘पशु वैद्यक’ बनण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
सदर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकूण ८० प्रवेश क्षमता असून नीट परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना गुणवतेनुसार प्रवेश देण्यात येईल. एकूण प्रवेश क्षमतेच्या पैकी ४० जागा व्यवस्थापन वर्गवारीत असतील. सदर पशूवैद्यकीय अभ्यास क्रमाचा कालावधी साडेपाच वर्षाचा राहील. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर येथे पशुवैद्यकीय शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. १२०० संख्येच्या वर असलेली प्रशस्त देशी प्रजातीमधील गोशाळा, जनावरांचे वंधत्व निवारण केंद्र, श्वान संगोपन केंद्र, अश्वशाळा, वराहपालन, कुकुटपालन, महाविद्यालयाची भव्य आकर्षक इमारत, सुसज्ज प्रयोग शाळा, प्रशस्त गोठे, जनावरांचे अद्यावत पशु चिकित्सालय, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, इत्यादि या महाविद्यालयाची ठळक वैशिष्ठे आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा, मंत्री. पशु संवर्धन मंत्रालय महाराष्ट्र सरकार, भारतीय पशु चिकित्सा परिषद (VCI) आणि मंत्स्यपालन, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्रालय, भारत सरकार, महाराष्ट्र पशु व मंत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. प. पू, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रेरनेतून व मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय महाविद्यालय पुढील महिन्यात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी गुणवत्ता, शुद्धता आणि ग्राहकांच्या विश्वासामुळे ४० दिवसात दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांना ग्राहकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, त्याचा सकारात्मक परिणाम दूध विक्रीवर होत आहे. सध्या गोकुळकडून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली तसेच कोकण विभागात दररोज सुमारे १६ ते १६.५० लाख लिटर दूध विक्री होत आहे. गेल्या सुमारे ४० दिवसांत दैनिक दूध विक्रीत सुमारे एक ते दीड लाख लिटरची वाढ झाली असून, ग्राहकांचा वाढता विश्वास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे.
गुणवत्ता म्हणजेच गोकुळ, अशी ओळख ग्राहकांच्या मनात निर्माण झाली आहे. दूध संकलनापासून प्रक्रिया, पॅकिंग आणि ग्राहकांपर्यंत वितरणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता व शुद्धतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गोकुळचे दूध तसेच तूप, लोणी, पनीर, दही, ताक, श्रीखंड, चीज, बासुंदी, गुलाबजाम, आईस्क्रीम आदी दुग्धजन्य पदार्थांना बाजारपेठेत सातत्याने चांगली मागणी आहे.
गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील म्हणाले, “गुणवत्ता हीच गोकुळची सर्वात मोठी ताकद आहे. ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य उत्पादने योग्य दरात उपलब्ध करून देण्यावर आमचा कायम भर असतो. दूध उत्पादकांनी विश्वासाने पुरविलेल्या दर्जेदार दुधावर अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता व शुद्धता कायम ठेवत सातत्यपूर्ण सेवेद्वारे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे ग्राहकांचा गोकुळवरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. याच विश्वासामुळे गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी सातत्याने वाढत असून, भविष्यातही गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
दूध उत्पादकांचा विश्वास, कर्मचारी, वितरक, केंद्र चालक, वाहतूकदार व हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य आणि ग्राहकांची पसंती यामुळे गोकुळच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गुणवत्ता हीच खरी ओळख जपत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत गोकुळची उत्पादने पोहोचविण्याचे काम पुढेही अधिक वेगाने सुरू राहणार आहे.

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना;पहिला पुरस्कार डॉ.कल्याण एम. गंगवाल यांना प्रदान

पुणे/प्रतिनिधी : संचेती हॉस्पिटल तर्फे डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. हा पुरस्कार मेडीजैन कम्युनिटीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर अर्थपूर्ण व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.नुकतेच झालेल्या राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त याअंतर्गत पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत पहिला पुरस्कार फिजिशियन डॉ. कल्याण मोतीलालजी गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. डॉ.कल्याण गंगवाल हे प्रतिष्ठित वैद्यकीय तज्ञ असून कॅरियम हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल आणि ससून हॉस्पिटल यांसारख्या नामांकित संस्थांशी त्यांची कारकीर्द जोडलेली आहे.
या पुरस्कार सोहळ्याला दर्शन आय केअर सेंटरचे संस्थापक व वरिष्ठ नेत्रशल्यचिकित्सक आणि मेडिजैनचे आश्रयदाता डॉ.जिग्नेश तसवाला, संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती, मेडिजैनचे आश्रयदाता व फॅमिली फिजिशियन डॉ.पराग जैन, मानद अध्यक्ष आणि कॉस्मेटोलॉजिस्ट व त्वचारोगतज्ञ डॉ.ज्योती संघवी, मानद सचिव व फॅमिली फिजिशियन डॉ.सोनल पालरेचा, मानद खजिनदार व वरिष्ठ दंतचिकित्सक आणि कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ.आरती भटेवरा आणि संचेती हॉस्पिटलच्या होम हेल्थकेअर व संपर्क विभागाच्या संचालिका रूपल संचेती,अर्चना संचेती, संचेती ॲडव्हान्स्ड आर्थोकेअर हॉस्पिटलचे प्रमुख यशवंत शिवण्णा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.
संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष डॉ. पराग के.संचेती म्हणाले की,माझ्या वडिलांनी संचेती हॉस्पिटलची स्थापना हीरुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या एका साध्या पण मोलाच्या विचारावर केली. त्यांनी आम्हाला नेहमीच हे शिकवले की, डॉक्टरांचे कर्तव्य हे केवळ रुग्णालयाच्या दारापर्यंत मर्यादित नसते.आजही ते रूग्णालयात येतात तेव्हा त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना करत असतात. ज्यांचे कार्य केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहे, अशा डॉक्टरांचा डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराने गौरव केला जातो. डॉ. कल्याण गंगवाल यांनी आपल्या कार्यातून उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून डॉ. कल्याण गंगवाल हे योग्य व्यक्ती आहेत,असा आमचा ठाम विश्वास आहे.
यावेळी मेडीजैनच्या अध्यक्ष डॉ. ज्योती संघवी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वैद्यकीय सेवेच्या पलीकडे जाऊन समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.के.एच.संचेती मेडी रत्न पुरस्काराची सुरूवात करून, समाजसेवा, करुणा आणि समर्पणातून वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण समाजाला प्रेरणा देणाऱ्या डॉक्टरांचा गौरव करण्याची प्रेरणादायी परंपरा निर्माण करण्याचा संचेती हॉस्पिटलचा उद्देश आहे.उत्कृष्ट वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. गंगवाल यांनी अनेक दशकांपासून शाकाहार, अहिंसा, प्राणी कल्याण, व्यसनमुक्ती जनजागृती आणि निरोगी जीवनशैली या मूल्यांचा प्रसार केला आहे.सार्वजनिक व्याख्याने, पुस्तके, प्रदर्शने आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी असंख्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला असून समाजसेवेप्रती असलेल्या त्यांच्या आजीवन बांधिलकीमुळे ते आजही समाजाला प्रेरणा देत आहेत.
प्रत्येक संस्थेची एक कहाणी असते. पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांच्या अथक कार्यातून संचेती हॉस्पिटलची कहाणी सुरू झाली. अस्थिरोग शास्त्रातील उत्कृष्ट सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि करुणामय आरोग्यसेवा याबाबत त्यांच्या अविरत योगदानामुळे भारतातील अत्यंत प्रतिष्ठित अस्थिरोग उपचार संस्थांपैकी एक अशी या संस्थेची ओळख निर्माण झाली.अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मानांनी गौरविलेला त्यांचा प्रेरणादायी प्रवास आरोग्यसेवा क्षेत्रातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. आजही तरूणांशी संवाद साधत ते नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत.

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगाव येथील न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाजी पेठ येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, तसेच प्रवेश संदर्भातील सर्व मदत विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. ही सुविधा पूर्णपणे निःशुल्क असून प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे. सोबत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यासाठी देखील मार्गदर्शन व मदत उपलब्ध केलेली आहे.
डिप्लोमा इन फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे. विद्यार्थ्यांच्या अर्ज, कागदपत्रे पडताळणी व पुष्टीकरणाची प्रक्रियाही अधिकृत सुविधा केंद्रावर केली जाणार आहे. दि. १७ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी व १८ ते २० जुलै पर्यंत हरकती नोंदवणे व २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे.प्रवेश प्रक्रियेबाबत तांत्रिक अडचणी, प्रवेश फेऱ्यांबाबत सर्व माहिती मार्गदर्शन येथे केले जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी सहज उपलब्ध होणे हा सुविधा केंद्राचा मुख्य उद्देश आहे. डी फार्मसी प्रवेशासाठी प्रवेशइच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी केले आहे.

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त एनआयटी कोल्हापूर येथे ‘विद्युत सुरक्षा’ विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ निमित्त एनआयटी, कोल्हापूरच्या इलेक्ट्रिकल विभागात विद्यार्थ्यांसाठी “विद्युत सुरक्षा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महावितरण, हुपरी उपविभागाचे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर श्री. रोहित कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षिततेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत श्री. कुलकर्णी यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला विजेच्या सुरक्षित वापराबाबत मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांकडून विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली तसेच महावितरणतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेले माहितीपत्रक व सादरीकरण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी कोल्हापूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजेचा शॉक लागून घडलेल्या दुर्दैवी घटनांचा आढावा घेण्यात आला. अशा घटना घडण्यामागील कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच विजेचा शॉक लागल्यानंतर तातडीने द्यावयाचे प्राथमिक उपचार याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
औद्योगिक तसेच घरगुती विद्युत वायरिंग, मीटर तपासणी, अर्थिंग यांची नियमित तपासणी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. याशिवाय वीज चोरी, वीज गळती, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी आवश्यक काळजी, तसेच ऊर्जा बचतीच्या विविध उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमधील पदविका व पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध सौरऊर्जा योजनांची माहिती देऊन सौरऊर्जा उपकरणांचे उत्पादन, वितरण आणि उद्योजकतेच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
ही कार्यशाळा महावितरण व एनआयटी, कोल्हापूर यांच्यातील शैक्षणिक करारांतर्गत आयोजित करण्यात आली. यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश काकडे सहाय्यक अभियंता संदीप काकडे आणि सहाय्यक अभियंता सचिन दळवी (उंचगाव, हुपरी उपविभाग) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा. बाजीराव राजिगरे यांनी तज्ज्ञांचा परिचय करून दिला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. स्वप्निल पाटील,श्री. ओमकार खोत, श्री. दिग्विजय शिंदे आणि श्री. मयूर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमास संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे तसेच अधिष्ठाता श्री. संदीप पंडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षांचे रोपण; पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग व डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या फुटबॉल मैदान परिसरात विद्यार्थी, प्राध्यापक, गार्डन विभागाचे प्रमुख तात्या देसाई आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने ३०० हून अधिक देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. भविष्यात हरित, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त परिसर घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी डॉ. विराट गिरी बोलताना म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. हीच भावी पिढीला दिलेली सर्वात मौल्यवान भेट ठरेल.”या उपक्रमाचे आयोजक प्रा. अजय कोंगे, इन्स्टिट्यूटच्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण, प्रा.रईसा मुल्ला, प्रा. वंदना शहा, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. स्वप्निल थिकने, प्रा. धीरज पाटील, प्रा. रणजीत शिरोडकर, प्रा. प्रतीक आवटी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
पर्यावरण संरक्षण, सामाजिक उत्तरदायित्व आणि हरित भारताच्या निर्मितीसाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूटने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणारा आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. या सामाजिक उपक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

शाळेतूनच अल्पवयीन विद्यार्थिंनीचे अपहरण;विनयभंग प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्त कारावास

कोल्हापूर/प्रतिनिधी : अल्पवयीन विद्यार्थिंनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत फूस लावून अपहरण केल्याप्रकरणी
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश
ए.एस.आय.पेरमपल्ली यांनी आरोपी विशाल मारुती कांबळे (वय २४.रा.मळगे ब्रु.ता.कागल) याला ७ वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
दि.२९ मार्च २०२२ रोजी कागल तालुक्यातील मळगे ब्रु.येथील विद्यालयात जात असताना आरोपीने विद्यार्थिंनीचा पाठलाग केला.तिच्या वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी अश्लिल वर्तन केले आणि पळवून नेल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाला.
तपासादरम्यान पीडित मुलगी व आरोपी सातारा जिल्ह्यातील भुईंज येथे आढ़ळले.मुरगूड पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे ॲड.एस.एस.इंगळे यांनी प्रभावी युक्तीवाद केला.
त्यांना या कामी मुरगूड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आर.ए.वाघमारे व पैरवी युवराज पाटील यांनी मदत केली.

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

महाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

२३०० हून अधिक जागांची वाढ
आठ जी. एन. एम. पदविका कॉलेजचे श्रेणीवर्धन बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयात

पाच बी. एस्सी नर्सिंग महाविद्यालयांची क्षमता प्रत्येकी ५० वरून १००

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील आरोग्यसेवेला बळकट करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यातील नर्सिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार असून, तब्बल २,३०० हून अधिक नवीन नर्सिंग जागांची वाढ होणार आहे. राज्यातील वैद्यकीय पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्यासाठी आणि आरोग्य सेवेतील प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ७ जुलै २०२६ रोजी एक क्रांतिकारी शासन निर्णय जारी केला आहे. या अंतर्गत राज्यात १० नवीन शासकीय नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. आठ जी. एन. एम. पदविका कॉलेजेसचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे आणि पाच कार्यरत महाविद्यालयांची प्रवेश क्षमता दुप्पट केली जाणार आहे.
​वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.
या संपूर्ण प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल ५५८.७१ कोटी रुपयांच्या अनावर्ती खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.शासन निर्णयातील तीन सर्वात मोठे बदल असे आहेत.यात दहा जिल्ह्यांत होणार नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग कॉलेजेस- राज्यातील दुर्गम आणि महत्त्वाच्या अशा चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अलिबाग (रायगड), रत्नागिरी, अमरावती, धाराशीव, गडचिरोली, पालघर आणि अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जातील. या नवीन १० कॉलेजेसमुळे राज्यात थेट १,००० नवीन जागा उपलब्ध होतील.आठ ‘जी.एन.एम. पदविका’ कॉलेजचे ‘बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालया’ मध्ये रुपांतर- राज्यात सध्या सुरू असलेल्या आठ शासकीय जी. एन. एम. नर्सिंग शाळांचे श्रेणीवर्धन करून त्या ठिकाणी प्रत्येकी १०० जागांची भव्य बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जातील. यामध्ये जी. टी. रुग्णालय – मुंबई, सेंट जॉर्जेस रुग्णालय- मुंबई, धुळे, सोलापूर, अंबाजोगाई, अकोला, नागपूर आणि सांगली या शहरांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत यासाठी प्रति महाविद्यालय सात कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.
पाच मोठ्या शहरांतील कॉलेजेसची क्षमता दुप्पट- मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नांदेड येथील सध्याच्या शासकीय बी. एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० वरून थेट १०० करण्यात आली आहे. म्हणजेच; येथे अतिरिक्त २५० जागा वाढणार आहेत. भव्य पायाभूत सुविधा आणि ५५८ कोटींचा निधी- या सर्व महाविद्यालयांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ‘इंडियन नर्सिंग कौन्सिल’च्या (INC) निकषांनुसार आधुनिक प्रयोगशाळा (Computer, Nutrition, Pre-Clinical Labs), सुसज्ज ग्रंथालय, मल्टिपर्पज हॉल आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वसतिगृहांचे बांधकाम केले जाईल. यासाठी शासनाने एकूण ५५८.७१ कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
रोजगाराची सुवर्णसंधी- नर्सिंग कॉलेजेस वाढल्यामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच फायदा होणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगाराची निर्मिती होणार आहे. प्रत्येक नवीन महाविद्यालयासाठी प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, ट्युटर, ग्रंथपाल यांच्यापासून ते कार्यालयीन कर्मचारी, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक अशा वर्ग १ ते वर्ग ४ मधील प्रत्येकी ८६ पदांच्या निर्मितीला अशा एकूण ८६० हून अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. ही पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने कंत्राटी आणि बाह्यस्त्रोतांद्वारे भरली जातील.

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापुरात ड्रग्ज माफियांना जबर धक्का! तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा ,एमडी आणि चरस आगीत खाक

कोल्हापूर/प्रतिनिधी : नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ देत कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैद्य टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे.जिल्ह्यातील १५ पोलिस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या ८९ गुन्हयांमधून जप्त करण्यात आलेले तब्बल ५१५ किलो ४७२ gm.गांजा,
एमडी आणि चरस न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आले.या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांच्या बेकायदेशीर जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ही नाश प्रक्रिया कसबा बावडा येथील जैववैद्यकीय कचरा निर्मलून प्रकल्पात पार पाडली.पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीच्या उपस्थित न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर पध्दतीने पूर्ण करण्यात आली.यावेळी वजन-माप विभाग,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच पंच उपस्थित होते.
लक्ष्मीपुरी,राजारामपुरी,करवीर ,शाहुपुरी ,गोकुळ शिरगाव ,हुपरी,
शाहुवाडी,आजरा ,शहापूर,भुदरगड ,गांधीनगर गावभाग,शिवाजीनगर,एमआयडीसी आणि इचलकरंजी परिसरातील विविध पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हयांमधील जप्त अंमली पदार्थांचा यात समावेश आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचारी ही नाश प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.१५ पोलिस ठाण्यातील ८९ गुन्हयांमधील अंमली पदार्थांचा नाश.५१५ किलो ४७२ gm गांजा,एमडी आणि चरस नष्ट.न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया.नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला कोल्हापूर पोलिसांची मोठी साथ मिळाली आणि यामुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.