Friday, October 24, 2025
spot_img
Home Blog Page 4

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील रु.१४३.९० कोटींच्या आराखड्यास शासनाची प्रशासकीय मान्यता : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

0

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील रु.१४३.९० कोटींच्या आराखड्यास शासनाची प्रशासकीय मान्यता : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

मुंबई/प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील रु.१४३.९० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. एकूण निधी पैकी पहिल्या टप्यातील सुमारे रु.१४३.९० कोटींच्या कामांसाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून शासन आदेशाद्वारे निधी मंजुरीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत तमाम कोल्हापूर वासीय आणि आई अंबाबाई भक्तांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे आभार मानतो. निधी मंजुरीमुळे लवकरच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा रूपये १४४५.९७ कोटी किमतीचा प्रस्ताव दि.१५.०७.२०२५ रोजी मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. त्यापैकी रुपये १४३.९० कोटीच्या प्रस्तावास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली. मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.०६.०५.२०२५ रोजी मौजे चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे झालेल्या मंत्रीपरिषदेच्या बैठकीसमोर रुपये १४४५.९७ कोटी किंमतीचा “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा” प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. सदर विकास आराखडा रुपये २५.०० कोटी पेक्षा जास्त किंमतीचा असल्याने व त्याची व्याप्ती व स्वरुप नियोजन विभागाच्या दि.०४.०६.२०१५ व दि.१९.०७.२०१६ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार असल्याने सदर आराखडा नियोजन विभागामार्फत राबविण्यास मंत्रीपरिषदेने मान्यता दिली. सदर बैठकीत “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या” प्रस्तावित रूपये १४४५.९७ कोटी किंमतीच्या विकास आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली व आराखड्याच्या कार्यवाहीचे टप्पे व कामांचा प्राधान्यक्रम याबाबत उच्चाधिकार समितीने छाननी करुन आराखडा अंतिम करण्यास मान्यता देण्यात आली. “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा” प्रस्ताव मंत्रिपरिषदेपुढे सादर करतेवेळी सदर आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता प्राप्त झाली नव्हती. दि.१५.०७.२०२५ रोजी उच्चाधिकार समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत उच्चाधिकार समितीने सद्यस्थितीत केवळ पहिल्या टप्प्यातील रुपये १४३.९० कोटींच्या पुरातत्वीय कामांना मान्यता दिली. भूसंपादनाचे धोरण/कार्यपद्धती ठरविण्यासाठी अपर मुख्य सचिव (नवि-१), नगर विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामांना मान्यता देण्याची कार्यवाही होईल असे निर्देश दिले. त्यास अनुसरून शासन निर्णयान्वये भूसंपादनाचे धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर भूसंपादन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित कामांना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल. सद्यस्थितीत “कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडयातील” रुपये १४३.९० कोटी किंमतीच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील रु.१४३.९० कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या पहिल्या टप्प्यात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार करणे व इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय मान्यतेबद्दल शिवसेनेच्यावतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव

0

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील प्रशासकीय मान्यतेबद्दल शिवसेनेच्यावतीने साखर पेढे वाटून आनंदोत्सव

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्यातील रु.१४३.९० कोटींच्या विकास कामांच्या आराखड्यास शासनाने आज प्रशासकीय मान्यता दिली याबद्दल शिवसेनेच्यावतीने श्री अंबाबाई मंदिर घाटी दरवाजा परिसरात भाविकांना वाद्याच्या गजरात साखरे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. याबाबत तमाम कोल्हापूर वासीय आणि आई अंबाबाई भक्तांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे आभार शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी मांडले.
यावेळी शहरप्रमुख रणजीत जाधव, महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, शहर समन्वयक सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, रणजीत मंडलिक, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, अनुसूचित जाती जमाती सेल जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, हर्षल सुर्वे, सचिन पाटील, अमित चव्हाण, टिंकू देशपांडे, क्षितीज जाधव, क्रांतीकुमार पाटील, सौरभ कुलकर्णी आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनं

0

विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खासगीकरण करु नका आमदार सतेज पाटील यांची पालकमंत्र्यांकडे विनंती

कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलमध्ये नेमबाजीचा सराव करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी असतात. येथील शुटिंग रेंज सर्वसामान्य घरातील खेळाडूंना परवडणारी आहे. त्यामुळे या शूटिंग रेंजचे खासगीकरण करु नका अशी विनंती काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात म्हंटले आहे की, विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजमध्ये अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने शासनाकडून नेमबाजी रेंजचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सध्या चालू असलेल्या शासकीय रेंजची फी सर्वसामान्य खेळाडूंना परवडणारी आहे. मात्र खाजगीकरण झाल्यास नवनवीन सोयींच्या नावाखाली भविष्यात फीमध्ये अनियमित वाढ होऊन त्यावर शासनाचे नियंत्रण राहणार नाही. विभागीय रेंजमधील ९५ टक्के लेन खाजगी अकॅडमीस दिल्यास कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांतील अनेक खेळाडूंचे मोठे नुकसान होईल. नेमबाजी हा वैयक्तिक खेळ असल्याने खेळाडूंना सराव, योगा, मेंटल ट्रेनिंग, सायकोलॉजी, फिजिकल ट्रेनिंग यामध्ये स्वतःच्या गरजेनुसार निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे. खाजगी अकॅडमीकडून यामध्ये सक्ती होऊन मानसिक व आर्थिक खच्चीकरण होण्याची भीती आहे.
त्यामुळे नेमबाजी खेळाडूंच्या हरकतींचा गांभीर्याने विचार करुन छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे खाजगीकरण करु नका अशी विनंती आमदार पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आमदार सतेज पाटील

0

राज्य सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आमदार सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीत कोल्हापुरपुरती अधिसूचना रद्द केली, ती वाटली, त्याचा उत्सव साजरा केला. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने कोल्हापुरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला असल्याची जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. याविरोधातील लढा तीव्र करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाबद्दलचा अध्यादेश शासनाने आज जारी केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यतील रेखांकनाबद्दलही उल्लेख आहे. महायुतीच्या नेत्यांनी, आमदारांनी निवडणुकीच्या आधी आम्ही हा महामार्ग रद्द करणार असा शब्द दिला होता. त्यांनीही शब्द फिरवल्याचे आजच्या अध्यादेशाद्वारे सिद्ध झाले आहे. मुद्दा क्रमांक तीनमध्ये ऑक्टोबरची अधिसूचना रद्द करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जी अधिसूचना मार्चमध्ये होती ती ऑक्टोबरमध्ये रद्द केली होती. कोल्हापुरापुरता महामार्ग रद्द केला होता ती अधिसूचना या अध्यादेशाद्वारे रद्द केली आहे. म्हणजे कोल्हापुरातून महामार्ग होणार हे या अध्यादेशाद्वारे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरकरांची तर फसवणूक झालीच आहे पण शेतकऱ्यांच्या पाठीतही सरकारने खंजीर खुपसला आहे.
बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा गरज नसेलेला महामार्ग नको आहे. शासन आधीच आर्थिक अडचणीत आहे. लाखो कोटी रुपयांची बिले दिलेली नाहीत अशी वास्तवता समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होईल की नाही अशी साशंकता आहे. त्यामुळे आम्ही शांत बसणार नाही, शक्तीपीठ महामार्गा विरोधात तीव्र आंदोलन करु, हा पैसा खर्च करायचा असेल तर नागपूर -रत्नागिरी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांना पाच हजार कोटी रुपये द्या अन रस्ते करा अशी मागणीही पाटील यांनी केली. मुंबईत लोकल ट्रेनमधून पडून रोज पाच जणांचा मृत्यू होतोय. ते मृत्यू थांबवण्यासाठी पैसे द्या, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, सरकारी नोकरभरती करा. एमपीएसीच्या मुलांना दिलासा द्या. परंतू गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करु नका. याविरोधात आता आमचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा सतेज पाटील यांनी दिला.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन

 

कोल्हापूर/ अतिग्रे /प्रतिनिधी : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे एआयसीटीई व डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षण आणि संशोधनात एआय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे” या विषयावर आधारित सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १ ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आयोजन केले आहे.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन व संशोधनातील वापर, तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून एआयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात एआयची ओळख, स्मार्ट टीचिंगसाठी एआय टूल्स, वैयक्तिक व सर्वसमावेशक शिक्षणासाठी एआय, संशोधनातील एआयचा वापर, नैतिकता, पक्षपातीपणा व जबाबदार एआय, कॅपस्टोन प्रोजेक्ट्स व पॅनल चर्चा, या कार्यक्रमाद्वारे शिक्षकांना एआय संशोधन पद्धती, एआय टूल्सचा वापर करून स्मार्ट टीचिंग, तसेच विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्याचे कौशल्य मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्राध्यापकांना एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग (ATAL) अकॅडमी तर्फे अधिकृत प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
कार्यक्रमात देशभरातील नामवंत उद्योगतज्ज्ञ, प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शन करणार असून, यामुळे सहभागी शिक्षकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व कौशल्य मिळणार आहे. या उपक्रमाबाबत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सर्व शिक्षक प्राध्यापकांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.

गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच : नामदार हसन मुश्रीफसो वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री

0

गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच
: नामदार हसन मुश्रीफसो वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री

गोकुळ दूध संघाची गडहिंग्लज तालुका संपर्क सभा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हा पूर जिल्हान सहकारी दूध उत्पाेदक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न गडहिंग्लज तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शनिवार दि.२३/०८/२०२५ इ.रोजी सूर्या मंगल कार्यालय, गडहिंग्लज येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्याा अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, गडहिंग्लज तालुक्यातून गोकुळला होणाऱ्या दूध पुरवठ्यामध्ये म्हैशीचे दूध ५४ % तर गाईचे दूध ४६ % आहे, ही बाब अभिमानास्पद असून तालुक्यातील सर्व दूध उत्पादकांचे हार्दिक अभिनंदन केले. गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच झाली असून गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या चार वर्षांत म्हैशीच्या दुधाला १२ रुपये व गाईच्या दुधाला ६ रुपये अशी महत्त्वपूर्ण दरवाढ करण्यात आली आहे. बाजारपेठेत गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला मोठी मागणी असून, यामुळे संघाची खरी ओळख ही म्हैशीच्या दुधामुळेच आहे.
गोकुळच्या दूध उत्पादन वाढीसाठी त्यांनी जातिवंत म्हैशी खरेदी करण्याचे आवाहन केले. तसेच,“लाडका सुपरवायझर योजना” राबवून फक्त दोन महिन्यांत जवळपास एक लाख जातिवंत म्हैशी खरेदी करण्याचा संकल्प घेण्यात आला असून, सुपरवायझरांनी यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. साहेबांनी पुढे नमूद केले की, वासाचे दूध, दुय्यम प्रत दूध आणि पशुखाद्याचा दर्जा यांचे वैज्ञानिक पद्धतीने निराकरण करणे ही संचालक मंडळाची जबाबदारी आहे.
“गोकुळच्या दुधाला मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढविणे हे काळाचे महत्त्वाचे आव्हान आहे. सर्व दूध उत्पादकांनी सहकार्य करून या प्रयत्नात सहभागी होणे आवश्यक आहे, तरच गोकुळचा ब्रँड देशात नंबर एक करण्याचे स्वप्न पूर्ण होईल,” असे नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गडहिंग्लज तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसायमध्ये युवकांचे प्रमाण समाधानकारक असून अजून अधिकाधिक तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे गोकुळच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन या क्षेत्रात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेतल्याबद्दल चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळाचे अभिनंदन ठरावाने करण्यात आले. तसेच किसान विमा पॉलिसीअंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत जनावरांच्या मालकांना विमा धनादेशांचे वाटपही करण्यात आले. यावेळी दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती सविस्त्र चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्याख प्रश्नां चे निरसन करण्यावत आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
यावेळी संघाचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांनी सभेस मार्गदर्शन केले. स्वागत व प्रस्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर तर आभार संचालक रणजितसिंह पाटील यांनी मानले.
या प्रसंगी याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठर संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन,संचालक,प्रतिनिधी,दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

0

डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्रांगणात कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी.डी.लोखंडे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली, प्राचार्य रुधिर बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व त्यानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी डॉ.संजय डी. पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी नशमुक्तीची शपथ घेतली. यानंतर एनसीसी विद्यार्थांनी संचलन करत मानवंदना दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, प्राचार्य डॉ.चंद्रप्रभू जंगमे, डॉ. अजित पाटील, डॉ. उमराणी जे, डॉ. अद्वैत राठोड, डॉ. अमृतकुवर रायजादे, डॉ. आर. एस. पाटील, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशिल इंगळे, जयदीप पाटील आदींसह विविध विभागाचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय

कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संजय पाटील यांनी भारतमाता व महापुरुषांच्या वेशभूषेत आलेल्या छोट्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थिताना त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अधिष्ठाता (स्टुडन्ट अफेअर) डॉ. आर. ए. पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, आणि ग्रुपच्या विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हॉटेल सयाजी

हॉटेल सयाजी येथे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ संजय डी.पाटील यांनी अधिकारी कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉटेल सयाजीचे जनरल मॅनेजर मुकेश रक्षीत, डेप्युटी जनरल मॅनेजर गौरव गौर, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस, यांच्यासह हॉटेल सयाजी, डीवायपी सिटी आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटॅलिटीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मलेशियात ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’ डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांचा सहभाग

0

मलेशियात ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’
डी.वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मलेशियाच्या युनिव्हर्सिटी केबांगसान मलेशिया (यूकेएम) यांच्यात ऐतिहासिक शैक्षणिक करार झाला आहे. याअंतर्गत महाविद्यालयातील १५ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक येत्या ८ ते १५ सप्टेंबर २०२५ दरम्यान मलेशियात होणाऱ्या ‘क्रॉस बॉर्डर ग्लोबल इंजिनिअरिंग प्रोग्राम’मध्ये सहभागी होणार आहेत.
यूकेएमचे अधिष्ठाता प्रा. डॉ. मोहम्मद स्युहामी अब रहमान (फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड बिल्ट एन्व्हायरमेंट) आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांच्या स्वाक्षऱ्यांनी हा करार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्थात्मक सहकार्य आणि जागतिक पातळीवरील अनुभव उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या सहकार्यातून संयुक्त संशोधन, विद्यार्थी-प्राध्यापक देवाणघेवाण आणि जागतिक आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यास गती मिळणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना चीन, जपान, तैवान आणि मलेशिया येथील समवयस्कांसह काम करण्याची संधी मिळणार आहे. इंडस्ट्री 4.0, आयओटी ऑटोमेशनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. यूकेएमच्या ‘पेमरकासान कॉम्पेटेन्सी अकॅडेमिक सिस्वा’ या संशोधन गटासोबत हेल्थकेअर, शिक्षण, उद्योग सुरक्षा आणि उत्पादकता वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्यावर भर दिला जात आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य प्रा. एस. डी. चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे डॉ. सनी मोहिते आणि डॉ. कीर्ती महाजन यांनी समन्वय साधला.

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विदयार्थी विजयी

0

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विदयार्थी विजयी

कोल्हापूर/प्रतिनिधी : १४ ऑगस्ट २०२५ रोजी हौसाबाई जयपाल मगदूम पब्लिक स्कूल व सहोदय कॉम्प्लेक्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच स्व. डॉ. जे.जे. मगदूम यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन विभागात विजेतेपद पटकावले.
राज्यभरातील एकूण २८ सीबीएसई शाळांनी या वादविवाद स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा गट अ (इ. ५ वी-६ वी), गट ब (इ. ७ वी-८ वी) आणि गट क (इ. ९ वी-१० वी) या तीन गटांमध्ये चार फेऱ्यांत पार पडल्या. गट अ मध्ये आरवी सौरभ मंत्री व रुही अरुण भंडारी (दोघीही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ) यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपदाची ट्रॉफी व रोख रक्कम पारितोषिक जिंकले.
तर गट ब मध्ये मोहम्मद अझलान बाशा व शर्वी चिंतामणी खरे (दोघेही संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ) द्वितीय क्रमांक पटकावून ट्रॉफी व रोख रक्कम पारितोषिक प्राप्त केले.
या यशामागे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्यासोबतच त्यांची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या यशाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य श्री अस्कर अली यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका निशा शर्मा व अदिती बॅनर्जी यांचे अभिनंदन व कौतुक केले.

कोल्हापुरचे सर्किट बेंचचे स्वप्न तुमच्यामुळे पूर्णत्वास गेले सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार

0

कोल्हापुरचे सर्किट बेंचचे स्वप्न तुमच्यामुळे पूर्णत्वास गेले
सतेज पाटील यांनी मानले सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आभार

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली,सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, पक्षकार व नागरिकांचा सर्किट बेंचसाठी लढा सुरु होता. मात्र, चार दशकांच्या या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे आज बघायला मिळाली या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रविवारी जाहीर आभार मानले. कोल्हापुरला सर्किट बेंच मंजूर केल्याबद्दल आमदार पाटील यांनी गवई यांचा सर्किट हाऊसवर सत्कार केला. यावेळी आमदार पाटील यांनी सर्किट बेंचसाठी कोल्हापुरसह सहाही जिल्ह्यांतील वकील, पक्षकार, नागरिक व विविध संघटनांनी उभारलेल्या लढ्याची माहिती दिली. कोल्हापुरसाठी सर्किट बेंच हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता. या बेंचमुळे सहाही जिल्ह्यातील पक्षकार व वकिलांचा वेळ, पैसा व शारीरिक त्रास वाचणार आहे. कोल्हापुरात सुरु झालेले सर्किट बेंच हा सुवर्णक्षण आहे, त्यामुळे प्रत्येक कोल्हापुरकर आणि सहाही जिल्ह्यांतील नागरिक हा क्षण विसरुच शकत नाही. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेली ही मागणी तुमच्या प्रयत्नामुळे शक्य झाली या शब्दांत आमदार पाटील यांनी भूषण गवई यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मकरंद कर्णिक उपस्थित होते.