Sunday, June 29, 2025
spot_img
Home Blog Page 327

अच्युत गोडबोलेंचे माय लॉर्ड पहिल्यांदा ऑडिओ बुक मध्येप्रकाशित

0

अच्युत गोडबोलेंचे माय लॉर्ड पहिल्यांदा ऑडिओ बुक मध्येप्रकाशित

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय न्याय व्यवस्था आणि कायदा या विषयावरील सुप्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले आणि  अ‍ॅड.माधुरी काजवे यांनी लिहिलेले माय लॉर्ड हे पुस्तक स्टोरीटेल या स्वीडीशऑडिओ बुक  अ‍ॅप   वर पहिल्यांदा ऑडिओबुकस्वरूपात प्रकाशित झाले.
कोविड १९च्या लॉकडाऊन काळानंतर मराठी प्रकाशन क्षेत्रात घडणारा हा मोठा बदल आहे. नव्या जगात डिजिटलचे महत्व वाढत चालल्यामुळे मराठी लेखक आणि प्रकाशकही ईबुक्स आणि ऑडिओबुक्सच्या माध्यमाचा वापर करू लागले आहेत. २०१७ साली स्टोरीटेलने मराठी ऑडिओबुक्स अ‍ॅप    भारतात आणले आणि अनेक मराठी लेखक ऑडिओबुक साठी लिहू लागले. अच्यूत गोडबोले हे मराठी साहित्यिकांमधील एक आघाडीचे नाव आहे. त्यांच्या मुसाफीर, किमयागार, अर्थाच, मनात, बोर्डरूम, कॅनव्हास सारख्या पुस्तकांनी विक्रीचे अनेक उच्चांक गाठले. ही सर्व पुस्तके स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत.
माय लॉर्ड हे नवे पुस्तक पहिल्यांदा ऑडिओबुकस्वरूपातप्रदर्शित करून नंतर छपाई स्वरूपात आणण्याचा पायंडा मराठीत पाडला जात आहे. माय लॉर्डमध्ये वकिली व न्यायव्यवस्था या विषयावरची खास अच्युत गोडबोले लेखनशैलीत रंजकपणे सांगितलेली सखोल माहिती आहे. अ‍ॅड.माधुरी काजवे यांच्यासह लिहिलेल्या पुस्तकात जागतिक पातळीवर न्यायव्यवस्था कशी उभी राहिली याचा आढावा घेताघेता जगातल्या सर्व महत्वाच्या देशांमधली न्यायवय्वस्था, वकिलांचे तसेच न्यायाधीशांचे किस्से, जगाचा दृष्टिकोन बदलणा-या किंवा कायदा बदलणा-या केसेस, भारतीय न्यायव्यवस्था व कायद्यांवर असलेला प्रभाव, तसेच भारतीय व जागतिक न्यायव्यवस्थेचा इतिहास, सर्वसामान्य माणसांना कोणते कायदे माहिती असायलाच हवेत याची माहिती आणि महत्वाच्या चित्रपट आणि पुस्तकांचे संदर्भ असे हे अतिशय रंजक पण सखोल ज्ञान देणारे पुस्तक आहे.
न्याय व्यवस्थेशी संबंधित वकील, न्यायाधीश, अशील, पक्षकार आदींना हे ऑडिओबुक उपयोगी आहेच पण सर्वसामान्य विद्यार्थी आणि वाचकांनाही महत्वाचे वाटेल व पुन्हा पुन्हा ऐकता येईल असे हे ऑडिओबुक झाले आहे. संदीप कर्णिक यांनी माय लॉर्डचेअभिवाचन केले आहे.

डॉ. देशमुख व पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचा सन्मान

0

डॉ. देशमुख व पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचा सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात काळे धंदे मोडून काढून संघटीत गुन्हेगारांचेवर मोकांतर्गत कारवाई करून सात राज्यातील मटका मोडीत काढलेले मावळते पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना सन्मानीत केले.
तसेच राजस्थान राज्यात जवळपास 32 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे व राजस्थान सहित बाजूच्या राज्यात दहशत पसरवून राजस्थान पोलिसांना खुल्ले आव्हान देणारे कुख्यात गँगस्टर ” 007 बिष्णोई” गँगचा गँग लिडर श्यामलाल पुनिया व त्याच्या इतर दोन साथीदाराने किणी टोल नाका येथे पोलिसांवर केलेल्या फायरिंग दरम्यान पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गजबजलेल्या ठिकाणी आबालवृद्ध प्रवाशांची व आपल्या सहकाऱ्यांचे तसेच स्वताचे प्राण वाचविण्यासाठी प्रतिउत्तरा दाखल केलेल्या फायरिंमध्ये गँग लिडर श्यामलाल पुनिया व त्याच्या साथीदारास जखमी करून जेरबंद केले.या कामगिरीनिमित्त पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी पोलीस दलात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना “सन्मान खा की वर्दीचा ” हा कार्यक्रम आयोजीत २० सप्टेंबर २०२० रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी माजी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास उर्वरीत महावैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापिक संपादक दैनिक पुढारी मा.योगेश जाधव साहेब ,एबीपी माझा मुख्य संपादक मा.राजीव खांडेकर साहेब,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे
मा.किरण जोशी व इतर मान्यवारांची उपस्थिती होती.

महापालिकेच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी

0

कोल्हापूर ता.22 :- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास महापौर सौ.निलोफर आजरेकर  उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नागिमे, दिलीप पोवार, रा.छ.शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरेश साळूंखे, उपप्राचार्य राजाराम डुबल, नंदिनी साळुंखे, प्राचार्य संजय साठे, विलास किल्लेदार, सुरेश पाटील, मिलींद पाटील, समाधान पवार, जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर अध्यक्ष प्रदिप घाटगे, कर्मचार  नागरिक संख्येने उपस्थित होते.

विद्यापीठ हायस्कूलच्या  1993 बॅचकडून  पंचगंगा स्मशानभूमिस 10 हजार शेणीदान

0

कोल्हापूर ता. 22 : येथील विद्यापीठ हायस्कूलच्या  1993 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी  आज 10 हजार शेणी उपमहापौर संजय मोहिते च्यांच्या उपस्थितीत पंचगंगा  स्मशानभूमिस  दान केल्या.यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, चेतन चव्हाण,  सुमंत कुलकर्णी, महेश पाटील, अमर माने, विश्वनाथ तेली, शरद कोथळकर, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे,  कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यापूर्वी  वीस हजार व आज दहा हजार एकूण तीस हजार शेणी या बॅचने पंचगंगा  स्मशानभूमिस  दिल्या असल्याचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी सांगितले. आज दिलेल्या या दहा हजार शेणी कसबा बावडा स्मशानभूमीसाठी रवाना करण्यात आल्या.

पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमिसाठी 11 हजार शेणीदान

0

कोल्हापूर ता. 21 : येथील पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमिस 11 हजार शेणी बॅकेचे अध्यक्ष  राजाराम शिपुगडे यांनी  महापालिकेचे आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे यांच्याकडे सुपूर्द  केल्या.यावेळी चेअरमन राजाराम शिपुगडे यांच्यासह उपाध्यक्ष राहूल भोसले, संचालक संदिप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक फडणीस, सरव्यवस्थापक सुशिल कुलकर्णी, मार्केटींग मॅनेजर दिपक गाणू आणि सुभाष बोधे आदिजण उपस्थित होते.

रिअलमी ने तरुण खेळाडूंसाठी नार्झो २० स्मार्टफोन मालिका सुरू 

0

रिअलमी,जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा स्मार्टफोन ब्रँड, भारतभरातील थ्रील शोधणाऱ्या तरुण खेळाडूंसाठी नार्झो २० मालिका बहुप्रतिक्षित, कामगिरीवर आधारित स्मार्टफोन मालिका सुरू केली आहे. नार्झो २० मालिकेत तीन ट्रेल-ब्लेझिंग स्मार्टफोन – नर्झो २० प्रो – सर्वात शक्तिशाली ६५ डब्ल्यू चार्जिंग स्मार्टफोन आहे; नार्झो २० – गेमिंग उत्साहीसाठी सर्वोत्कृष्ट मध्यम-श्रेणी स्मार्टफोन; आणि नार्झो २० ए – प्रवेश-स्तर गेमिंग किंग. या व्यतिरिक्त सेगमेंट प्रोसेसर, फास्ट चार्ज आणि नार्झो २० सीरीजसह मेगा बॅटरीमध्ये सर्वोत्कृष्ट ऑफर करण्याशिवाय रिअलमी ने जनरल झेड वापरकर्त्यांसाठी निर्बंध क्रिएटिव्हिटी, सामाजिक आणि उत्पादकता कोटियन्ट्सवर केंद्रीत करून, अपग्रेड केलेल्या रिअलमी यूआय २.० चे अनावरण केले आहे.नार्झो २० मालिकेच्या प्रारंभावर भाष्य करताना श्री. माधव शेठ, प्रदेशाध्यक्ष, रिअलमी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रिअलमी इंडिया आणि युरोप म्हणाले, नार्झो १० मालिकेने आमच्या पॉवर मीट स्टाईल या जनुकाला मूर्त स्वरुप दिले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद व कौतुक मिळाले. आम्ही अल्पावधीतच १ दशलक्ष नार्झो वापरकर्त्यांचा टप्पा गाठला. नार्झो मालिकेच्या नवीन पिढीच्या लाँचिंगमुळे युवा खेळाडूंसाठी शक्ती, कामगिरी आणि मनोरंजनाचे उत्कृष्ट संयोजन घडवून आणण्याच्या आमचे डेअर टू लीप दृष्टी सुधारते. विविध किंमतींचे मुद्दे व्यापून, नार्झो २० मालिका लाखो इच्छुक स्मार्टफोन खरेदीदारांमधील आमची पोहोच आणखी वाढविणारी युवा ब्रँड म्हणून क्षेत्रातील स्थान निश्चित करेल. नार्झो मालिकेला एक वेगळी ओळख आणि रुची देण्यासाठी, आम्ही शक्तिशाली आणि उत्कृष्ट मालकीचा अनुभव घेणार्‍या वापरकर्त्यांमध्ये एक मजबूत प्रतिध्वनी निर्माण करण्यासाठी आम्ही एक शक्तिशाली, विजयी डिझाइनसह ब्रँड लोगो तयार केला आहे.नार्झो २० प्रो एक अतुलनीय चार्जिंग अनुभवासाठी ६५ डब्ल्यू सुपरडार्ट चार्जसह अखंड कामगिरी प्रदान करते जे केवळ ३८ मिनिटांत भव्य ४५०० एमएएच बॅटरीच्या १०० टक्के  चार्ज करते, जे आपल्या विभागातील सर्वात शक्तिशाली ६५ डब्ल्यू चार्जिंग स्मार्टफोन बनवते. पण जास्त गेमिंग क्रियाकलाप असल्यामुळे, बॅटरी फक्त ३० मिनिटांत ४७ टक्के पर्यंत आकारली जाऊ शकते. नार्झो २० प्रो मध्ये ३००,०००+ अँटू टू बेंचमार्कसह नवीनतम मीडियाटेक हेलियो जी ९५ एसओसी सह आहे आणि हे केवळ एका अविश्वसनीय स्मार्टफोन गेमिंग अनुभवाच्या मूळतेसाठी डिझाइन केलेले आहे. फोनची कार्यक्षमता संरेखित ठेवून ते ८.६% पर्यंत थंड होऊ शकणार्‍या अत्याधुनिक कार्बन फायबर कूलिंग सिस्टमसह सुसज्ज आहे. ६.५ इंचाचा ९० हर्ट्झ अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले एक उत्कृष्ट ९०.५ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह एक अखंड व्हिज्युअल अनुभव प्रदान करतो. नार्झो २० प्रो मध्ये अल्ट्रा ४८ एमपी मुख्य कॅमेरा, ८ एमपी ११९°अल्ट्रा-वाईड-एंगल, एक मॅक्रो लेन्स आणि बी अँडडब्ल्यू पोर्ट्रेट लेन्सचा समावेश असलेला अल्ट्रा-क्लिअर क्वाड कॅमेरा सेट अप देखील देण्यात आला आहे. व्हाइट नाइट आणि ब्लॅक निन्जाच्या गूढ रंगांमध्ये उपलब्ध, नार्झो २० प्रो दोन रूपांमध्ये उपलब्ध आहे – १४९९९  किंमत ६जीबी + ६४जीबी आणि १६९९९ किंमत ८जीबी + १२८जीबी.नार्झो २०, ६००० एमएएच मेगा बॅटरी, मीडियाटेक हेलियो जी ८५ गेमिंग प्रोसेसर आणि फ्लॅगशिप ४८ एमपी एआय ट्रिपल कॅमेरासह पॉवरची खरी वाढ प्रदान करते. रिअलमी लॅबच्या चाचण्यांनुसार, प्रचंड ६००० एमएएच बॅटरी वापरकर्त्यांना स्टॅन्डबाई मोडमध्ये नॉन स्टॉप ४५ दिवस वापराचा आनंद घेण्यास सक्षम करते. विशेष ओटीजी रिव्हर्स चार्जसह, नार्झो २० आपला बॅटरी लाइफ सेव्हर देखील बनू शकतो. नार्झो २०,१८ डब्ल्यू फास्ट चार्जसह सुसज्ज आहे, ते २९ टक्के चार्ज  होण्यासाठी ३० मिनिटे घेते. अँटू टू बेंचमार्कमध्ये २००,०००+ सह शक्तिशाली हेलिओ जी ८५ प्रोसेसर, नार्झो २० ला त्याच्या विभागात योग्य गेमिंग सहकारी बनवितो. नार्झो २० ला एआय ट्रिपल कॅमेर्‍यासह श्रेणीसुधारित केले गेले आहे ज्यात ४८ एमपी प्राइमरी कॅमेरा, ८ एमपीचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि अल्ट्रा-मॅक्रो लेन्स वापरण्यात येणारे वापरकर्ते ४ सेमी शूटिंग अंतरासह सूक्ष्म जगाचे सौंदर्य शोधू शकतील. नार्झो २० विक्ट्री ब्लू आणि ग्लोरी सिल्व्हरमध्ये उपलब्ध आहे, ४जीबी + ६४जीबी व्हेरिएंटसाठी १०४९९  आणि ४जीबी + १२८जीबी व्हेरिएंटसाठी ११४९९

मुश्रीफसाहेब, लवकर बरं व्हा….मुरगूडच्या माता भगिनींचे अंबाबाईला साकडं        

0

मुश्रीफसाहेब, लवकर बरं व्हा….मुरगूडच्या माता भगिनींचे अंबाबाईला साकडं
कोल्हापूर/मुरगूड/प्रतिनिधी :
मुश्रीफसाहेब, लवकर बरं व्हा आणि सुखरूप परत या, असे म्हणत मुरगूड ता कागल येथील माता-भगिनीनी ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला साकड घातलं. येथील महिलांनी डोकीवर पाण्याने भरलेले कलश घेऊन ग्रामदैवताला ज्याला जलाभिषेक केला. सकाळी नऊच्या सुमाराला मुरगूडच्या गावभागातून या महिला मिरवणुकीने मंदिरापर्यंत आल्या.
कलश मिरवणुकीच्या अग्रभागी मंत्री मुश्रीफ यांच्या फोटोसह , ‘साहेब, लवकर बरं व्हा’ हे वाक्य लिहिलेला डिजिटल फरक लक्ष वेधून घेत होता
यावेळी माजी उपनगराध्यक्ष माया सुनिल चौगले, नगरसेवक संगीता प्रकाश चौगले, कल्पना सुनील डवरी, मालुताई लक्ष्मण मांगोरे, पुष्पा अशोक चौगले, आक्काताई लक्ष्मण चौगले, कलावती नितीन कांबळे, नीता निवृत्ती हसबे, शुभांगी सुखदेव चौगले, नंदा किरण चौगले आधी प्रमुख महिलांसह इतर महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट-…..
आमच्या बंधुरायाला चांगलं आरोग्य लाभू दे…..
यावेळी उपस्थित महिलांनी ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीला साकडे घातलं की, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांचे कैवारी आणि आम्हा माता -भगिनींचे बंधुराया आहेत. आमच्या या बंधुरायाची कोरोना आजारातून लवकरच मुक्ती होऊन त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे. पुन्हा नेहमीप्रमाणे त्याला दिवस-रात्र जनसेवा करण्यासाठी सुखरूप ठेव.

सिद्धगिरी भक्त-निवास कोविड-१९ विलगीकरण कक्ष,कणेरी मठ येथे सुरू

0

सिद्धगिरी भक्त-निवास कोविड-१९ विलगीकरण कक्ष,कणेरी मठ येथे सुरू

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : प.पू.श्री. ”अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या” “रुग्ण सेवा हीच ईश सेवा” ह्या उद्देशाने स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना उपचार देण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात व मठाच्या पावनभूमीमध्ये अगदी अत्यल्प दरात व सर्व सुविधांनी युक्त असे सिद्धगिरी भक्त-निवास,कणेरी मठ.येथे कोविड-१९ विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेले आहे.
याठिकाणी “प.पू.श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या” “रुग्ण सेवा हीच ईश सेवा” ह्या उद्धेशाने फक्त २५०० रूपयामध्ये Covid-19 विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे तर दिवसातून दोनवेळेस सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची भेट. (सकाळी ९ ते १२ व संध्याकाळ ५ ते ६)
सुसज्य रूम्स आणि आवश्यक साधनांची उपलब्धता. आवश्यक वैद्यकीय साधने. शुद्ध हवेने युक्त असा सिद्धगिरी निसर्गरम्य परिसर. सकाळी एकवेळस सिद्धगिरी आयुर्वेदिक काढा,दिवसातून दोनवेळेस चहा,एकवेळ नाश्ता,दोनवेळच्या जेवणात सिद्धगिरी सेंद्रिय शेतीतील पालेभाज्यांचा समावेश,दिवसातून एकवेळेस सेंद्रिय फळे.
दिवसातून चार ते पाच वेळा वाफ घेणेसाठी वाफेचे मशिन.
पिण्यास शुद्ध पाणी तसेच पिण्यास व अंघोळीस गरम पाण्याची सुविधा उपलब्ध. सिद्धगिरी हॉस्पिटल मधील औषधे आणि सर्व तपासण्या(पँथोलोजी) नियम व अटींसह उपलब्ध. ऑक्सिजनची गरज पडल्यास उपलब्धतेनुसार सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन आणि बेड ची सुविधा उपलब्ध. २४/७ नर्सिंग/रुग्णसेवा स्टाफ उपलब्ध  २४/७ अत्यावश्यक अंब्यूलन्स सेवा उपलबद्ध करण्यात आल्या आहेत.

आयपीजीए नॉलेज सीरीज सादर करत आहे खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनार

0
शुक्रवार १८ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ५ वाजता
 पेरणी, वातावरणाचा परिणाम, यंदाचा मॉन्सून हंगाम, अपेक्षित उत्पन्न, मागणी व पुरवठा त्याचबरोबर उडीद, मूग आणि तुर या खरीपातील डाळींच्या किमतींची सद्यस्थिती यावर सखोल चर्चा होणार
 उडीद आणि मूग डाळी लवकरच बाजारात येतील, तुरीचे पिक सध्या तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रश्न असा आहे की यंदाचा चांगला मान्सून आणि लागवडीत झालेल्या वाढीमुळे यावर्षी भारतात खरीपाचे विक्रमी उत्पादन होईल की पावसामुळे सगळे धुवून जाईल?
मुंबई, १० सप्टेंबर २०२०: भारतातील डाळींचे व्यवहार व उद्योग क्षेत्रातील प्रमुख संस्था भारतीय डाळी व तृणधान्य संघटनेने (आयपीजीए) खरीप पिकांची सद्यस्थिती या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे. ‘द आयपीजीए नॉलेज सीरिज’ या मालिकेअंतर्गत आयोजित हा वेबिनार शुक्रवारी १८ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी ५ वाजता होणार आहे. आयपीजीए नॉलेज सीरिजअंतर्गत विविध विषयांवरील वेबिनार आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये सरकारी, बाजारपेठेतील आणि उद्योगातील मान्यवर तज्ज्ञांनी भारतातील डाळींचा व्यवसाय या क्षेत्राची देशातील व आंतरराष्ट्रीय परिस्थिती याबाबत आपली मते मांडली आहेत.
खरीप पिकांची सद्यस्थिती या वेबिनारमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवर वक्त्यांमध्ये केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग, जीजीएन रिसर्चचे व्यवस्थापकीय भागीदार निरव देसाई, चेन्नईच्या फोर-पी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. कृष्णमूर्ती, अग्रोप्युअर कॅपिटल फूड्सचे (जीपीए कॅपिटल फूड्स) संचालक अनिश गोयल, कलंत्री फुड प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कलंत्री यांचा समावेश आहे. या वेबिनारचे सूत्रसंचालन कमॉडिटीतील तज्ज्ञ आणि टीव्ही निवेदिका, सीएनबीसी टीव्ही१८ च्या कमॉडिटिज व करन्सीज विषयाच्या संपादक मनीषा गुप्ता करणार आहेत.
 आयपीजीएचे अध्यक्ष जितू बेहडा म्हणाले, ‘’सध्या वर्षातला तो काळ आहे जेव्हा भारतात आणि परदेशांतही सगळ्यांचे लक्ष खरीप हंगामाकडे आणि किती पिक येणार याकडे लागलेले असते. अशावेळी विविध विषयांतील तज्ज्ञांना एकत्र आणून यावर्षीच्या खरीप हंगामातून काय अपेक्षा आहेत याबद्दल एक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.’’
खरीप वेबिनारबद्दल आयपीजीएचे उपाध्यक्ष बिमल कोठारी म्हणाले, ‘’अति किंवा कमी पावसाची सर्वत्र असलेली शक्यता या घडीला तज्ज्ञांना अपेक्षित असलेल्या प्रत्यक्ष खरीप उत्पादनाच्या अंदाजाला आव्हान देऊ शकते. यात कोविड-१९ महामारीला गृहित धरलेली नाही. पेरणी, अपेक्षित उत्पन्न, मागणी व पुरवठा, किंमती त्याचबरोबर पावसाचे प्रमाण, या वर्षाअखेरीपर्यंतचे हवामान, डाळी काढणीला येईपर्यंत त्यावर होणारा हवामानाचा परिणाम, विशेषत: वर्षाअखेरीला निघणाऱ्या तुरीच्या डाळीबाबतचा अंदाज, डाळी साठवणूक, उडीद, मूग, तुर डाळीच्या उत्पादनावर होणारा कोविड महामारीचा परिणाम या महत्त्वाच्या विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा केली जाणार आहे.’’
सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या काळात मिलिंग क्षेत्रासमोर असलेली आव्हाने आणि मिलिंग मार्जिन वाढवण्यासाठी मिलर्सनी आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी योजलेले उपाय याबाबतही तज्ज्ञ चर्चा करणार आहेत.
आयपीजीए विषयी:
भारतातील डाळी आणि धान्य व्यापार व तत्संबंधी उद्योगांची मध्यवर्ती संस्था असलेल्या इंडियान पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे (आयपीजीए) ४०० हून अधिक थेट व अप्रत्यक्ष सभासद आहेत, ज्यांत व्यक्ती, कॉर्पोरेट्स तसेच स्थानिक डाळ व्यापारी आणि प्रोसेसर्सच्या संघटनांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून ही संघटना डाळींचे उत्पादन, प्रक्रिया, धान्यसाठवणूक आणि आयात उद्योग अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा भाग असलेल्या १०,००० लाभार्थींशी जोडली गेली आहे.
भारतीय डाळी आणि धान्य उद्योग व व्यापार जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यास सक्षम बनावा, व हे ध्येय साध्य करताना भारताच्या अन्न व पोषण सुरक्षेलाही बळ मिळावे हे आयपीजीएचे लक्ष्य आहे. आयपीजीए स्थानिक कृषी-व्यापार क्षेत्रामध्ये नेतृत्वाची भूमिका साकारण्याची व भारतीय बाजारपेठेत सहभागी घटकांमध्ये तसेच भारत व त्यांच्या परदेशातील सहका-यांमध्ये सुदृढ नातेसंबंधांची जोपासना करण्यासाठी जागतिक स्तरावर अधिक सक्रिय भूमिका निभावण्याची जबाबदारी आयपीजीएने आपल्या शिरावर घेतली आहे.

राजारामपुरी कुटुंब कल्याण केंद्रास महापौरांची भेट – पूर्वतयारीचा घेतला आढावा

0

राजारामपुरी कुटुंब कल्याण केंद्रास
महापौरांची भेट – पूर्वतयारीचा घेतला आढावा

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ही मोहीम दि.15 सप्टेंबर 2020 पासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेविका सौ. भाग्यश्री शेटके यांनी राजारामपुरीतील कुटुंब कल्याण केंद्रास भेट देऊन मोहिमेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.
कुटुंब कल्याण केंद्र क्रं.3 राजारामपुरी येथे प्रभाग क्र.42 येथे असून या केंद्रांतर्गत 13 हजार 654 घरे तर 59 हजार लोकसंख्या येते. या केंद्रांतर्गत सर्व्हेक्षणाच्या कामाकरिता 20 पथके तैनात केली असून 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती या केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ. शोभा दाभाडे यानी मान्यवरांना दिली.
यावेळी महापौर तसेच आयुक्तांबरोबरच अन्य मान्यवरांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबतच्या पूर्व तयारीची माहिती घेतली, व मार्गदर्शक सूचना केल्या. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत आणि घरातील प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचून ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, आरोग्य शिक्षण व संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच व्याधिग्रस्त व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याची कार्यवाही प्राधान्यक्रमाने करण्यची सूचना महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेटटी यांनी केली.
यानंतर महापौर, आयुक्त् व पदाधिकारी यांनी 9 नंबर शाळेच्याजवळ सुरु असलेल्या राजारामपूरी येथील टाकीचे बांधकामाची पाहणीही केली. यावेळी ठेकेदाराला सदरच्या टाकीच्या बांधकामाच्या कामाला लवकरात लवकर गती देऊन ते पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
त्याचबरोबर मोरे माने नगर कुटूंब कल्याण केद्राअंतर्गत येणा-या प्रभागातील सदस्यांना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबतच्या पूर्व तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी नगरसेवक राजू दिंर्डोले, वैद्वयकीय अधिकरी डॉ.सौ.सुशिला पावरा, नोडल अधिकरी मोहन सुर्यवंशी, मुख्याध्यापक गायकवाड व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.