Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeमाय मराठीसिद्धगिरी भक्त-निवास कोविड-१९ विलगीकरण कक्ष,कणेरी मठ येथे सुरू

सिद्धगिरी भक्त-निवास कोविड-१९ विलगीकरण कक्ष,कणेरी मठ येथे सुरू

सिद्धगिरी भक्त-निवास कोविड-१९ विलगीकरण कक्ष,कणेरी मठ येथे सुरू

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : प.पू.श्री. ”अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या” “रुग्ण सेवा हीच ईश सेवा” ह्या उद्देशाने स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना उपचार देण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात व मठाच्या पावनभूमीमध्ये अगदी अत्यल्प दरात व सर्व सुविधांनी युक्त असे सिद्धगिरी भक्त-निवास,कणेरी मठ.येथे कोविड-१९ विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेले आहे.
याठिकाणी “प.पू.श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या” “रुग्ण सेवा हीच ईश सेवा” ह्या उद्धेशाने फक्त २५०० रूपयामध्ये Covid-19 विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे तर दिवसातून दोनवेळेस सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची भेट. (सकाळी ९ ते १२ व संध्याकाळ ५ ते ६)
सुसज्य रूम्स आणि आवश्यक साधनांची उपलब्धता. आवश्यक वैद्यकीय साधने. शुद्ध हवेने युक्त असा सिद्धगिरी निसर्गरम्य परिसर. सकाळी एकवेळस सिद्धगिरी आयुर्वेदिक काढा,दिवसातून दोनवेळेस चहा,एकवेळ नाश्ता,दोनवेळच्या जेवणात सिद्धगिरी सेंद्रिय शेतीतील पालेभाज्यांचा समावेश,दिवसातून एकवेळेस सेंद्रिय फळे.
दिवसातून चार ते पाच वेळा वाफ घेणेसाठी वाफेचे मशिन.
पिण्यास शुद्ध पाणी तसेच पिण्यास व अंघोळीस गरम पाण्याची सुविधा उपलब्ध. सिद्धगिरी हॉस्पिटल मधील औषधे आणि सर्व तपासण्या(पँथोलोजी) नियम व अटींसह उपलब्ध. ऑक्सिजनची गरज पडल्यास उपलब्धतेनुसार सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन आणि बेड ची सुविधा उपलब्ध. २४/७ नर्सिंग/रुग्णसेवा स्टाफ उपलब्ध  २४/७ अत्यावश्यक अंब्यूलन्स सेवा उपलबद्ध करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments