Tuesday, July 1, 2025
spot_img
Home Blog Page 320

नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या प्रदेश सचिव पदी कोल्हापुरच्या रुपाली बोचगेरी यांची निवड

0

नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या प्रदेश सचिव पदी कोल्हापुरच्या रुपाली बोचगेरी यांची निवड

कोल्हापुर/प्रतिनिधी : पुणे येथे नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या झालेल्या बैठकीत कोल्हापुर च्या रुपाली बोचगेरी यांची पक्षाच्या राज्य सचिव पदी निवड करण्यात आली. रुपाली बोचगेरी यांनी बहुजन चळवळीत अनेक समाजप्रबोधनपर कामे केली असुन कोल्हापुर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.
नॅशनल सोशालिस्ट पार्टी हा लोकांनी लोकांकरीता चालवलेला लोकांचा पक्ष या टॅगलाईन खाली काम करत असुन अल्पावधीतच पक्षाला मोठा जनाधार मिळु लागलेला आहे. लाखोंचे मोर्चे काढणा-या मराठा समाजाचा एकही चेहरा एकाही राजकीय पक्षाने जाणिवपुर्वक पुढे येऊ दिला नसताना नॅशनल सोशालिस्ट पार्टीने मराठा समाजाला राजकीय चेहरा देऊन ऐतिहासीक पाऊल उचलल्यामुळे सत्ताधारी महाविकास आधाडीने कोल्हापुरमधील मराठा आंदोलन दडपण्यासाठी हजारावर पोलीसफाटा लावला यातुनच नॅशनल सोशालिस्ट पार्टी च्या आक्रमकतेचा धसका राज्य सरकार ने घेतल्याचे पहायला मिळाले. रुपाली बोचगेरी ह्या बहुजन चळवळीतला चेहरा देऊन नॅशनल सोशालिस्ट ने आणखी एक मास्टर स्ट्रोक टाकला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीपजी हराळे व राज्य संपर्कप्रमुख हेमंत केळकर यांनी रुपाली बोचगेरी यांना शुभेच्छा दिल्या.

सावली फौंडेशन, कोल्हापूर तर्फे महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी ‘ज्ञान-सावली’ हा उपक्रम

0

सावली फौंडेशन, कोल्हापूर तर्फे महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी ‘ज्ञान-सावली’ हा उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या शाळांची आणि शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी ‘ज्ञान-सावली’ हा उपक्रम सावली फौंडेशन, कोल्हापूर तर्फे हाती घेण्यात आला आहे. सावली फौंडेशनच्या ५व्या वर्धापनदिनानिमित्ताने महानगर पालिकेच्या ‘पाच’ शाळांमध्ये फौंडेशन तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पालिकेच्या शाळा आणि शिक्षण पद्धतीवर नगरिकांचा विश्वास वाढला पाहिजे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली पाहिजे, गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत हाच या उपक्रमचा मुख्य हेतू आहे. या साठी शाळांची स्वछता, रंगरंगोटी, सजावट याच बरोबर विविध शैक्षणीक उपक्रम घेतले जाणार आहेत.                                    या उपक्रमाची सुरुवात म्हणून फुलेवाडी रिंगरोड परिसरातील ‘रावबहादूर विचारे विद्यामंदिर, या शाळेच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते अभिजित देठे यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विनोदकुमार भोंग सर यांनी रावबहादूर विचारे यांची इतिहासातील कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली.                          या उपक्रमात सावली फौंडेशनचे निखिल पोतदार, प्रथमेश सूर्यवंशी, सुमित बिरंबोळे, सारिका बकरे, शुभम सोनार, विनायक कालेकर, अनिकेत जुगदार, सागर बकरे, अमृत पाटील, सुरज डांगे, तुषार पाटील, कृष्णात कुंभार व भागातील नागरिक उपस्थित होते.                             सावली फौंडेशन ही सामाजिक संस्था नोंदणीकृत असून गेल्या पाच वर्षात संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. महानगर पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी नागरिकांचा सहभाग देखील महत्वाचा असून या उपक्रमाला नागरिकांनी सढळ हाताने आर्थिक, वस्तुरूप सहाय्य करण्याचे आवाहन सावली चे संस्थापक निखिल कोळी यांनी केलं आहे.

सिद्धगिरी अँडव्हान्सड न्युरो-सायन्स सेंटर अँण्ड रिसर्च युनिट, कणेरी मठ कोल्हापूर

0

सिद्धगिरी अँडव्हान्सड न्युरो-सायन्स सेंटर अँण्ड रिसर्च युनिट, कणेरी मठ कोल्हापूर

कोल्हापूर/प्रतिनिधी : २९ ऑक्टोबर २०२० जागतिक स्ट्रोक दिन. दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी लोकांना ‘स्ट्रोक’ विषयी जागरूक करण्यासाठी ‘वर्ल्ड स्ट्रोक डे’ साजरा केला जातो. भारतीयांमध्ये दरवर्षी ब्रेन स्ट्रोक हा आजाराला जवळपास १५ लाख लोक ह्या आजाराला बळी पडताना दिसत आहेत. त्यामध्ये जवळपास ८५ ते ९० टक्के लोक वेळेत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न पोहोचल्याने त्यांना एकतर आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबून जीवन जगाव लागते. तर दुसरीकडे वेळेत न पोहोचल्याने मृत्यू.ब्रेन स्ट्रोक ह्या आजाराचे प्रमाण पाहता प्रत्येक ६ पुरुषांमध्ये १ तर प्रत्येक ५ स्त्रियांमध्ये १ असे आहे. ह्यामध्ये मग एकतर व्यसन असणारे स्त्री-पुरुष असो किंव्हा ५५ वयाच्या पुढील व्यक्ती असो पक्षाघात आजाराला बळी पडताना आपल्याला दिसत आहेत.लोकांना उच्चरक्तदाब, उच्चकोलेस्ट्रॉल आणि धूम्रपान यांमुळे स्ट्रोकची समस्या जास्त सतावत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.काही तद्न्य डॉक्टरांच्या मते जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या रक्ताभिसरण यंत्रणेवर नियंत्रण ठेवले तर हा भयानक रोग टाळता येवू शकतो. कारण अशा प्रकारचा स्ट्रोक कोणत्याही व्यक्तीस होऊ शकतो. डॉक्टरांच्यामते, मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या पेशींमध्ये योग्य रक्ताभिसरण नसल्यामुळे पक्षाघात घडतो.                                                      जेव्हा या पेशींना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळणे थांबते. तेव्हा मानवाला अशा प्रकारचा पक्षाघात होत असतो. स्ट्रोक हा पक्षाघात झालेल्या मेंदूशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्याचा बळी कोणीही, कोठेही पडला जाऊ शकतो. वेळेत उपचार न केल्यास एखादी व्यक्ती आजीवन अपंगहि होऊ शकते. वर्ल्ड स्ट्रोक मोहिमेच्या अहवालानुसार, दरवर्षी जगभरात सुमारे दीड कोटी लोक पक्षाघात होण्याने अर्धांगवायू बनतात. यापैकी सुमारे 5.5 दशलक्ष लोक या गंभीर आजारामुळे दगावतात. पण ह्या रोगाचे योग्य निदान केले गेले आणि त्यावर उपचार केले गेले तर रुग्णदेखील बरा होऊ शकतो. म्हणून त्याची लक्षणे जाणून घेत त्वरित उपचार करणे फार महत्वाचे आहे.
जागतिक स्ट्रोक दिन आजच्या दिनी जगभरात साजरा केला जातो. तसेच ह्या रोगाचे वाढते रुग्ण आणि त्याची तीव्रता याबद्दल जनजागृती करणे हा त्यामागील हेतू आहे जेणे करुन लोकांना या रोगाबद्दलची गंभीरता आणि माहिती व्हावी. स्ट्रोक कसा बसतो किंव्हा त्याची कारणे कोणती आहेत हे माहित असणे खूप गरजेचे आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणाने अडथळा निर्माण होवून मेंदूला पक्षाघात होतो. तेव्हा त्याला स्ट्रोक, कधीकधी ब्रेन अटॅक असे म्हणतात. जेव्हा असे घडते तेव्हा मेंदूच्या पेशीना काम करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन आणि पोषण मिळत नसल्यामुळे मरण पावतात. पर्यायी रुग्णाच्या ठराविक अवयवावर त्याचा परिणाम दिसून येतो. उदा. तोंड वक्र होणे, हातापायाना संवेदना नसणे, काहीवेळेस हातपायाची संपूर्ण ताकद जाणे, जीभ जड होणे, बोलता न येणे. तर रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असू शकतो. अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून येतात.                                अशा अवस्थेत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि लवकरात लवकर उपचार घेणे हा एकमेव पर्याय आहे. कारण उपचारासाठी सुद्धा एक गोल्डन पिरीअड असतो. त्या ठराविक वेळेतच जर रुग्णाचे निदान आणि उपचार झाले तर रुग्ण बरा होवू शकतो. काहीवेळेस उपचाराला उशीर झाल्याने रुग्णाला कायमचे अपंगत्व येवू शकते.
सिद्धगिरी आरोग्यधामच्या “संस्कार” ह्या मेंदू आणि मणका विभागामध्ये गेल्या ४ वर्षापासून स्ट्रोक ह्या आजारावर डॉ.मरजक्के आणि त्यांच्या टीमने यशस्वीरीत्या उपचार केले आहेत. कारण अशाप्रकारचा ब्रेन स्ट्रोक झाला असेल तर उपचारासाठी एक तद्न्य डॉक्टरांची टीम, अड्व्हान्स तंत्रज्ञान, योग्य सुविधांची जोड असणे खूप गरजेचे असते. जे प.पू.श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या रुग्ण सेवा हीच ईश सेवा ह्या तत्वाने उपचार आणि सुविधा सिद्धगिरी आरोग्यधाम मध्ये उपलब्ध आहेत.

मंथरा बचतगटाने बनविले दहा हजार मास्क

0

मंथरा बचतगटाने बनविले दहा हजार मास्क

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोनाना संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या 10 हजार कापडी मास्कची निर्मिती कसबा बावडा येथील मंथरा बचत गटाने करुन ते शासकीय कर्मचारी तसेच गरजूंना उपलब्ध करुन दिले.कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात बाजारात मास्कची कमी असलेली उपलब्धी आणि उपलब्ध मास्कची चढयादराने होणारी विक्री या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका दिनदयाळ अंत्योदय राष्टीय नागरी उपजिविका अभियांनांतर्गत कसबा बावडा येथील मंथरा बचत गटाने कोरोना विरुध्दच्या लढयात आघाडी घेतली. कोरोनापासून बचावासाठी लागणारे 10 हजार कापडी मास्कची निर्मिती करुन ते ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर पोलीस,आरोग्य, बँक कर्मचारी तसेच महापाकलकेच्या निवारा केंद्रातील महिलांना उपलब्ध करुन दिले. मंथरा बचत गटाची ही कामगिरी कोरोनाच्या संकट काळात महत्वाची ठरली.                                                         दिनदयाळ अंत्योदय राष्टीय नागरी उपजिविका अभियांनांतर्गत कोल्हापूर महापालिका आणि माविमच्या सहकार्यातून बचतगट चळवळीला प्रोत्साहन देऊन गटातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याचे मोठे काम शहरात झाले आहे. याच चळवळीतील कसबा बावडा येथील मंथरा बचत गट ! या बचतगटाने कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात प्रभावी व परिणामकारक जनजागृती करुन कोरोना संसर्ग रोखण्यास सहायभूत होण्याची भूमीका बजावली, असल्याचे या गटाच्या अध्यक्षा सविता रायकर आणि सचिव वैशाली भोगले यानी सांगितले.                                    कोरोनावर प्रतिबंध हाच उपाय असल्याने मास्क निर्मिती तसेच सॅनिटायझरसाठी स्टॅड याबाबी उपलब्ध करुन देण्याचा निर्धार मंथरा बचत गटाने करुन सुरुवातीलाच गटातील सर्व महिला सदस्यांच्या सहकार्याने 10 हजार कापडी मास्कची निर्मिती करुन ते ना नफा ना तोटा तत्वावर पोलीस, आरोग्य, बँक कर्मचारी तसेच महापालकेच्या निवारा केंद्रातील महिलांना दिले. याबरोबरच सॅनिटायझर स्टॅडही युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, महिला आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापुर महानगरपालिका तसेच अन्य शासकीय कार्यालयांना उपलब्ध करुन दिले. नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घरी थांबूनच कोरोनाविरुध्दच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन मंथर बचतगटामार्फत करुन प्रभावी जनजागृतीही केली.                                        कोल्हापूर महानगरपालिकेने शहरातील महिला बचतगटांना खेळते भांडवल देण्याबरोबरच कर्जाचे व्याज अनुदान, वैयक्तिक कर्ज बँकामार्फत मिळवून देण्यासह मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्राधान्य दिले. यापुढील काळातही कोल्हापूर शहरातील बचत गटांची चळवळ अधिक सक्षम करुन महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यावर महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अधिक भर दिला आहे.

 

शाहु स्मारक येथे महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र सुरु,कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास ‍मिळणार दिलासा-महापौर

0

शाहु स्मारक येथे महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र सुरु,कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास ‍मिळणार दिलासा-महापौर

कोल्हापूर/प्रतिनिधी  : महानगरपालिकेच्यावतीने सुरु केलेल्या पोस्ट कोव्हिड केंद्राचे उदघाटन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले.येथील शाहु स्मारक भवन येथे सुरु केलेल्या या पोस्ट कोव्हिड केंद्रांच्या उदघाटन कार्यक्रमास महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते राहुल चव्हाण, उपायुक्त निखिल मोरे, युवराज दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने, डॉ. रमेश जाधव, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर आदि मान्यवर उपस्थित होते.                    कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास महानगरपालिकेच्यावतीने सुरु केलेल्या पोस्ट कोव्हिड केंद्रामध्ये त्यांच्यासाठी उपचाराच्या व समुपदेशनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे सांगून महापौर सौ. निलोफर आजरेकर म्हणाल्या, या केंद्रामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यासाठी तपासणी, उपचार आणि संदर्भ सेवा देण्याबरोबरच फिजिओथेरपी तसेच मानसिक आधारासाठी समुपदेशनाचे कामही केले जाणार आहे. या केंद्रामध्ये नागरिकांसाठी रुग्ण नोंदणी कक्ष, नसिंग कक्ष, औषध कक्ष, डॉक्टर कक्ष, तपासणी कक्ष आणि प्रतिक्षा कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

पोस्ट कोव्हिड केंद्रासाठी सर्व सुविधा प्राधान्याने … आयुक्त डॉ. बलकवडे

कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी व दिलासा देण्यासाठी महापालिकेचे पोस्ट कोव्हिड केंद्र उपयुक्त ठरेल, असे सांगून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, या केंद्रासाठी सर्वत्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सद्या कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपायोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, कोराना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी कायम मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, कोठेही न थुंकणे, सॅनिटायझर वापरणे, गर्दीत जाणे टाळणे आणि कोरोनाची लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करुन घेण्याचा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला आहे.केंद्र स. 8 ते रात्री 8 पर्यंत सुरु : दु. 1 ते 3 तज्ञ डॉक्टरांचा सल्ला कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शाहु स्मारक भवन येथे सुरु केलेले पोस्ट कोव्हिड केंद्र रविवार वगळता आठवडयाचे सातही दिवस सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कार्यरत राहील. दररोज दुपारी 1 ते 3 यावेळात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे उपायुक्त निखिल मोरे यांनी सांगितले. या केंद्रामध्ये डॉक्टर्स, फिजिओथेरपी,समुपदेशन, नर्सिंग स्टाफ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पोस्ट कोव्हिड केंद्रांची मदत घेण्यसाठी नागरिकांनी 0231-2542601 या दुरध्वनीवरुन कोव्हिड वॉर रुमशी संपर्क साधावा.

पोस्ट कोव्हिड केंद्रात बाहय रुग्णसेवा

पोस्ट कोव्हिड केंद्रामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी बाहय रुग्णसेवा मिळणार असून आवश्यकतेनुसार सीपीआरमध्ये संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल माने यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोना होऊन गेल्यानंतर रुग्णांना काही त्रास होऊ लागल्यास या केंद्रात मोफत तपासणी, उपचार, समुपदेशन, मार्गदर्शन आणि सीपीआरची संदर्भ सेवा याबाबत कार्यवाही केली जाणारआहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, जनेआजारांनी उग्र स्वरुप धारण करणे, अनाहूत भिडी, दडपण येणे, मानसिकदृष्टया खचणे, दम लागणे, छातीत धडधड वाढणे, हदयाचे आजार, साखरेचे आजार, निद्रानाश, चव जाणे, वास न येणे, एकाग्रता भंग अशा त्रासांबाबत तपासणी, उपचार, समुपदेशन आणि संदर्भ सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.                                          यावेळी महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी या केंद्राची पाहणी करुन दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. या कार्यक्रमास आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शाहु स्मारक भवनचे युवराज कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हेाते.न्यु कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून 8 लाखाचे वैद्यकीय साहित्य येथील न्यु कॉलेजच्या (सायन्स) 1990 ते 1992 च्या बॅचमधील 80 विद्यार्थ्यांच्या ग्रुपने शाहु स्मारक भवन येथील कोरोना केअर सेंटरसाठी 8 लाखाचे वैद्यकीय साहित्य उपलबध करुन दिले आहे. यामध्ये 23 बेड, अंथरुण, पांघरुण तसेच ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठीची लाईनचा समावेश आहे. याही कक्षाची महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पाहणी करुन देणगीदारांचे आभार व्यक्त केले.                         न्यु कॉलेजच्या (सायन्स) 1990 ते 1992 च्या बॅचमधील 80 विद्यार्थ्यांचा ग्रुपमधील अनेक विद्यार्थी परदेशातही कार्यरत असून आज डॉ. संदीप पाटील, डॉ. हरिष नागरे, डॉ. कानडे, राजेंद्र पाटील (कतार), रवी सातपुते (अबुधाबी), हसिना कक्कर (दुबई), नितीन कवडे, प्रताप इंदुलकर, डॉ. संदीप पाटील, डॉ.अभया नरुटे, सौ. शितल पाटील, सर्जेराव पाटील (ऑस्टेलिया), किशोर अतिग्रे (अमेरिका), मनोज दिक्षित, अनघा घोटणे, सागर शिरगुप्पे (बेंगलोर), कविराज शिंदे तसेच अन्य सर्व ग्रुपचे सहकार्य लाभल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी सांगितले.

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावीत सर्वपक्षीय संघटनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

0

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावीत सर्वपक्षीय संघटनेने
महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावीत, या मागणीसाठी सर्व पक्षीय संघटनेने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. शहरातील तारबाई पार्क येथील मुख्य महावितरण कार्यालयाबाहेर पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. तसेच वीजबिल माफीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला.
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावीत, या मागणीसाठी सर्व पक्षीय संघटनेने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. शहरातील तारबाई पार्क येथील मुख्य महावितरण कार्यालयाबाहेर पोलीस व आंदोलकांमध्ये झटापट झाली. तसेच वीजबिल माफीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सामान्य माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशावेळी राज्य शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन काळातील 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांची तीन महिन्यांची बिले राज्य शासनाने भरावीत, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनच्यावतीने राज्य शासनाकडे केली आहे.
शेजारील केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिलांमध्ये सवलत दिलेली आहे. महाराष्ट्रातही वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले होते. पण त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. शासनाने त्याची अंमलबजावणी केली नसल्यामुळे काही संघटनांनी एकत्र येत ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयाला टाळे ठोकले.
यात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर सर्व नागरी कृती समिती यांचा समावेश होता. घटनास्थळी आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली.

पर्यटन क्षेत्रात ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल: सचिन चव्हाण स्वीटकॉर्न हॉलिडेज चे शानदार उद्घाटन

0

पर्यटन क्षेत्रात ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल: सचिन चव्हाण
स्वीटकॉर्न हॉलिडेज चे शानदार उद्घाटन

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढत आहेत. त्याद्वारे विशेषता: अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटन हे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून उभारीस येत आहे. तिर्थटनाच्या माध्यमातून होणारे धार्मिक पर्यटन याला सरकारही चालना देत आहे. पण आता पर्यटन हे आधुनिक पर्यटन बनले असून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांचे व्यवस्थापन व नियोजन हा मुद्दा समोर आल्याने नवनवीन संकल्पना विकसित करून पर्यटन व्यवसायाला बहुआयामी बनवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तुमच्या इच्छित स्थळी जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे व्यवस्थापन व नियोजन पर्यटन-संस्था करून देत असतात. त्यामध्ये ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल, असा विश्वास माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात मंगळवार पेठ येथे नव्याने सुरू झालेल्या ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लॉकडाऊन मध्ये पर्यटन क्षेत्र पूर्णपणे ठप्प होते. पण आता परिस्थिती निवळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पर्यटन स्थळे ही खुली होत आहेत. लवकर सर्व गोष्टी सुरळीत होऊन लोक पुन्हा आपल्या आवडीनुसार ट्रॅव्हलिंगसाठी बाहेर पडतील. हीच गरज ओळखून ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ पर्यटन क्षेत्रातील सर्व सोयी-सुविधा यामध्ये फ्लाईट बुकिंग, हॉटेल बुकिंग, इंटरनॅशनल व डोमेस्टिक पॅकेजेस,पासपोर्ट, रेल्वे,कार, क्रुज बुकिंग यासह सर्व सुविधा तुम्हाला परवडतील अशा तुमच्या बजेटनुसार उपलब्ध करून देईल आणि पर्यटकांना फक्त प्रवासाचा निव्वळ आनंद घेता येईल असे, ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ चे संचालक शिवांगी चिकोडीकर व आदित्य मोरे यांनी विशद केले. सायंदैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार शुभांगी तावरे, अक्षय थोरवत,महेश पाटेकर, आनंद चिकोडीकर,मयूर चिकोडीकर, सीमा पवार,सुरेश कुलकर्णी, स्मिता जोशी,मधुरा कुलकर्णी,विजया चिकोडीकर, कमल ढेकणे,अर्चना वाशीकर, गजाजन वाशीकर, आदी उपस्थित होते.

लाच घेणार नाही लाच देणार नाही प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

0

लाच घेणार नाही लाच देणार नाही
प्रामाणिक आणि पारदर्शीपणे काम करेन
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) :  जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन, अशी सत्यनिष्ठा प्रतिज्ञा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आज घेतली.*
आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी या प्रतिज्ञेसह राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, तहसिलदार अर्चना शेटे, संतोष कणसे, रंजना बिचकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, सर्व व्यक्ती चांगल्या असतात. एखाद्याचीच प्रवृत्ती मोहाला बळी पडते आणि त्यामुळे त्या विभागाला दोष येतो. कोणत्याही आमिषाला अथवा मोहाला अजिबात बळी पडू नका. प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे आपली कार्ये पार पाडा. घेतलेली प्रतिज्ञा अंमलात आणा, असे मार्गर्शन त्यांनी केले.
सत्यनिष्ठा प्रतिज्ञा
आपल्या देशाची आर्थिक, राजनितीक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे, असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सर्व भागधारक जसे की, सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्रातील यांनी एकत्रित येवून काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहे.
प्रत्येक नागरिकाने सावध रहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकाबाबत वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरूध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.
अंतत: मी शपथ घेतो की,
जीवनाच्या सर्व क्षेत्रात सत्यता आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही, लाच देणार नाही सर्व कार्य प्रामाणिपणे आणि पारदर्शीपणे जनहितामध्ये काम करेन, व्यक्तीगत वागणुकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईल.

लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

0

लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

‍कोल्हापूर/प्रतिनिधी : मी सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करण्याबरोबरच लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, अशी शपथ महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली.दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ महापौर सौ. निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप आयुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त चेतन कोंडे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावार, अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाची घेण्यात आलेली शपथ अशी – मी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करेन.जनहितामध्ये कार्य करेन. व्यक्तिगत वागणूकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन आणि भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन.राज्यात दरवर्षी 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त शासनाच्या आदेशानुसार भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ आज महापालिकेत घेण्यात आली. आपल्या देशाची आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरीक आणि खाजगी क्षेत्राने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरीकाने सावध रहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकांबाबत वचनबघ्द असायला हवे आणि भ्रष्टाचारा विरुध्दच्या लढयात साथ दयायला पहिजे.

महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिराचा ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी प्रयोग

0

महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिराचा ऑनलाईन शिक्षणाचा यशस्वी प्रयोग

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिरातील शिक्षकांनी विध्यार्थ्याबरोबर गुगल मीट, वेबेक्स सारख्या माध्यमातून संवाद साधून ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग यशस्वी केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘शाळा बंद शिक्षण सुरु ही मोहिम कोल्हापूर महापालिकेच्या शिक्षण समितीने यशस्वीपणे राबविली. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या यशवंतराव विद्यामंदिरात ऑनलाईन शिक्षणावर भर देऊन शिक्षणाचा पाया घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे विध्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महापालिकेच्या पहिली ते सातवीचे अध्यापन करणारे शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणात सक्रीय पुढाकार घेतला. शासनाने तयार केलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेच्या आधारे अभ्यासाचे महिनानिहाय नियोजन करुन विध्यार्थ्यांचा अभ्यास घेऊन नियोजनानुसार अभ्यासक्रम पूर्ण केला. विध्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाला उपस्थिती वाढावी यासाठी आनलाईन चित्रकला, भाषण, निबंध, हस्तकला इत्यादी स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शिक्षकांनी तयार केलेल्या विविध व्हिडीओचा प्रभावी वापर करुन अध्यापन झालेल्या घटकावर आनलाईन टेस्टही घेतली जाते. यासाठी विविध ॲप, पीडीफ यांचा उपयोग केला जातो. शाळेचे मुख्याध्यापक सुनील गणबावले हे दर आठवड्यालाआनलाईनअध्यापना संदर्भात अढावा घेऊन मार्गदर्शन करतात. शाळेतील सर्व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत असून सुद्धा विध्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षक प्रयत्न करत आहेत.
नूतन महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे, शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रथमिक शिक्षण प्रशासनाधिकारी एस.के. यादव आणि शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांच्या प्रेरणेतून ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम अखंडपणे सुरु राहावा यासाठी मुख्याध्यापक सुनील गणबावले, शिक्षक संजयकुमार देसाई, सुनील रावते, निलेश पोवार, सदाशिव पोवार, सौ वैशाली पाटील, सौ निर्मला ठाणगे, सौ सुजाता पोवार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. करत आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिक्षकाबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे योगदान आहे.