Tuesday, July 1, 2025
spot_img
Home Blog Page 319

चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक कर्जदाराला मिळणार परत -केडीसीसी बँकेच्या  संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

0

चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक कर्जदाराला मिळणार परत -केडीसीसी बँकेच्या  संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत झाला महत्त्वाचा निर्णय

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात भरलेले चक्रवाढव्याज व नियमित कर्जदारांनी भरलेले सरळव्याज या दोन्ही कर्ज खात्यावरील फरक परताव्यापोटी कर्जदारांना मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला. दरम्यान या बैठकीत शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच देण्याचा महत्त्वाचा निर्णय बँकेने घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना संसर्गाच्या महामारीच्या काळात शैक्षणिक कर्ज, छोट्यामोठ्या व्यवसायांसाठी घेतलेली कर्जे, व्यक्तिगत कर्ज इत्यादी कर्जांचे मासिक हप्ते भरणे कर्जदारांसाठी अडचणीचे होऊन बसले होते. या काळात कर्जाचे नियमित हप्ते भरणारे कर्जदार आणि कर्जाचे हप्ते नियमित भरून न शकलेले कर्जदार अशा दोन्ही कर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या कर्जदारांनी नियमित हप्ते भरलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये यादृष्टीने त्यांच्या कर्ज खात्यावर चक्रवाढ व्याज किती झाले असते तेवढी रक्कम परताव्यापोटी कर्ज खात्यावर जमा होणार आहे. यामध्ये छोट्या-मोठ्या व्यवसायांसाठीची कर्ज, व्यक्तिगत कर्ज, शैक्षणिक कर्ज अश्या ज्या कर्जांवर बँकेने मासिक व्याज आकारणी केली आहे, अशा कर्ज खात्यांवर बँक पाच नोव्हेंबरपर्यंत परताव्याची ही रक्कम जमा करणार आहे. संपूर्ण जिल्हाभरातील याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल.
या बैठकीला माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पवार, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास आदी संचालक उपस्थित होते.

चौकट…….
शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच……
शिक्षक संघटनांसह विविध नोकरदार व पगारदार खातेदाराकडून विमा सुरक्षाकवच लागू करण्याची मागणी बँकेकडे होत होती. त्या अनुषंगाने शिक्षकांसह पगारदार खातेदारांनाही विमासुरक्षा कवच लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केडीसीसी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला.

कागलमध्ये आज पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

0

कागलमध्ये आज पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन-ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

कागल/प्रतिनिधी :कागलमध्ये आज रविवारी (ता.१) पोस्ट कोविड केअर सेंटरचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी व नामवंत फुफ्फुस रोग तज्ञ डॉ. अजय केणी यांचे मार्गदर्शन होणार आहे. आरटीओ चेक पोस्टच्या गोडाऊन क्रमांक चारमध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती नगराध्यक्ष सौ. माणिक रमेश माळी यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोना महामारीमध्ये संभाव्य धोका ओळखून घ्यावयाची खबरदारी, बाधित झाल्यास उपचार व कोरोनामुक्तीनंतर घ्यावयाची दक्षता या विषयावर ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केनी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत. दरम्यान; कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांवर आवश्यक उपचार व त्यांच्या समुपदेशनासाठी कागल येथे पोस्ट कोवीड सेंटर सुरु करणार असल्याचेही नगराध्यक्षा सौ. माळी यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या संसर्गामध्ये अहोरात्र, अविरत व निस्पृह सेवा देणारे ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केनी यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्हाभर कोरोना नंतरचे जीवन या विषयावर व्याख्याने देऊन जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झाली असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कागलमध्ये त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच इतर सर्वच नागरिकांनी त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. माळी यांनी केले आहे. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी, नगरसेवक व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

       गोकुळ दूध संघ व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीकडून दूध उत्‍पादक शेतक-यास दिलासा                                                                                                                                                      

0

गोकुळ दूध संघ व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीकडून दूध उत्‍पादक शेतक-यास दिलासा

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनी लि., यांचे संयुक्‍त विद्यमाने फार्मर्स विमा पॅकेज पॉलिसी दिली जाते. त्‍यामध्‍ये दोन दुभती जनावरे, दूध उत्‍पादक शेतकरी (पती-पत्‍नी), राहते घर, वासरु संगोपन योजने अंतर्गत असणारी दोन वासरे व बायोगॅस यांना विमा सुरक्षा दिली जाते.
दि न्‍यू इन्डिया एश्‍योरंन्‍स कंपनीमार्फत देणेत येणारी किसान विमा पॉलिसी ही दोन प्रकारे दिली जाते.
त्‍यातील रुपये ७७० इतक्‍या किमतीस दिल्‍या जाणा-या पॉलिसीमध्‍ये  रुपये ४६२ हे दूध उत्‍पादकांनी भरावयाचे असून त्‍यात समान दहा हप्‍ते करुन दूध बिलातूनघेणेची सवलत दिली आहे.उर्वरीत रक्‍कम रुपये १५४ दूध संस्‍थेमार्फत व रुपये १५४ हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जातात तर दुसरी पॉलिसी रुपये १६०० इतक्‍या किमतीस दिली जाते त्‍यापैकी  रुपये ९६० हे दूध उत्‍पादकांनी भरावयाचे असूनत्‍यातही समान दहा हप्‍ते केले आहेत. उर्वरीत रक्‍कम रुपये३२० दूध संस्‍थेमार्फत व रुपये३२० हे गोकुळ दूध संघामार्फत भरले जात असून पॉलिसी अंतर्गत दोन दुभत्‍या जनावरांकरीता ७७० रुपयाच्‍या पॉलिसी करीता २० हजार रुपयेतर १६०० रुपयाच्‍या पॉलिसीकरीता ४० हजार रुपये, पती-पत्‍नीस अपघाती विमा कवच १ लाख रुपये,  राहत्‍या घरास १ लाख रुपये, दोन वासरां करीता प्रत्‍येकी रुपये ५ हजार व गोबर गॅसकरीता रुपये २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो.
सध्‍या कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावामुळे सर्वञ लॉकडाऊन असतानासुध्‍दा माहे एप्रिल २०२० पासून आजअखेर ६० लाख रुपयांची नुकसान भरपाई या पॉलिस अंतर्गत देण्‍याचे काम गोकुळ दूध संघ व दि न्‍यु इंडिया एश्‍योरन्‍स कंपनीने केले आहे.
या योजनेत सहभाग घेतलेले  यशवंत सहकारी दूध  संस्‍था पुनाळ, ता.पन्‍हाळा संस्‍थेचे दूध उत्‍पादक शेतकरी कै.विलास मारुती पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला तसेच दत्‍त सहकारी दूध सांगरुळ,ता.करवीर  दुध संस्‍थेचे दूध उत्‍पादक शेतकरी कै. तानाजी शिवाजी वाघवेकर यांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यु झाल्‍यामुळे या फार्मर्स विमा पॅकेज योजनेतुन प्रत्‍येकी रुपये एक लाख रुपयाचा अपघाती विमा मिळाला असून हनुमान दूध संस्‍था मौजे वडगांव, ता.हातकणंगले या दूध संस्‍थेतील १३ दूध उत्‍पादकशेतक-यांच्‍या जनावरांचा मृत्‍यु झाल्‍यामुळे प्रत्‍येकी ४० हजार रुपये प्रमाणे ५ लाख २० हजार  रुपये, साईबाबा दूध संस्‍था चौधरवाडी,ता.गगनबावडा २ दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या जनावरांचा मृत्‍यु झाल्‍यामुळे १ लाख रुपये असा ८ लाख २० हजार रुपये विमा रक्‍कमेच्या धनादेशाचे संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये सभेचे अध्‍यक्ष गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक मा.श्री.अरुण नरके यांच्‍या हस्‍ते व इतर संचालक मंडळांच्‍या उपस्थितीत वितरण करणेत आले.
यावेळी दि न्‍यू इन्डिया एश्‍योरंन्‍स कंपनी व उपस्थित दूध संस्था मार्फत गोकुळने राबविलेल्‍या या योजनेबद्दल कौतुक व्‍यक्‍त करुन संघाच्या सहकार्याबद्दल सभेचे अध्‍यक्ष माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक मा.श्री.अरुण नरके यांचा सत्‍कार केला.
यावेळी विमा रकमेचा धनादेश दूध संस्था प्रतिनिधीना सुपूर्द करताना सभेचे अध्‍यक्ष माजी चेअरमन व जेष्‍ठ मा.श्री.अरुण नरके, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक सर्व श्री.रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, रामराज देसाई-कुपेकर,बाळासो खाडे, आमदार राजेश पाटील, पी .डी.धुंदरे, उदय पाटील, सत्यजित पाटील, विजय तथा बाबा देसाई, विलास कांबळे,अमरीशसिंह घाटगे, संचालिका श्रीमती जयश्री पाटील-चुयेकर(माई), कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम .पाटील,दूध संस्थाचे प्रतिनिधी, दि न्‍यू इन्डिया एश्‍योरंन्‍स कंपनीचे वरिष्ठ मंडल प्रबंधक जी.भुवनेश्वरी, के.वाय.पाटील, पी.एम.कालेकर, कानेटकर, शुभम पुनवकर,  व इतर मान्यवर उपस्थित होते.

गटनेते शारंगधर देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पुराने पडलेली ३ घरे दिली बांधून – पूरग्रस्तांना दिल्या मान्यवरांच्या हस्ते चाव्या

0

गटनेते शारंगधर देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पुराने पडलेली ३ घरे दिली बांधून – पूरग्रस्तांना दिल्या मान्यवरांच्या हस्ते चाव्या

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेतील कॉग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करता २०१९ च्या पुरामध्ये लक्ष्मीपूरी कामगार चाळ येथील पडलेली तीन घरे बांधून दिली. या नविन बांधण्यात आलेल्या तीन घरांच्या चाव्या संबंधितांना देण्याचा लोकार्पन सोहळा आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर सौ.निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, गणी आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाढदिवसाचा निधी पूरग्रस्तांची घरे उभारण्यासाठी दरवर्षी ६ सप्टेंबर रोजी गटनेते शारंगधर देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात कार्यकर्ते साजरा करतात. परंतू सन २०१९ मध्ये कोल्हापूर शहरात महापूराने थैमान घातले होते. कोल्हापूरातील बऱ्याच नागरिकांना महापूराचा फटका बसला होता अशा वेळेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे निश्चीत केले होते. त्याप्रमाणे श्री. वसंतराव ज.देशमुख हायस्कूल, तेजस मुक्त विद्यालय, सन्मित्र विद्यालय व देशमुख इंग्लिश मिडीयम या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक तसेच शारंगधर देशमुख वाढदिवस समिती व समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करुन जमा झालेल्या निधीतून लक्ष्मीपुरी येथील तीन पूरग्रस्त कुटुंबांची पडलेली घरे बांधण्यात आली. ही घरे आज जयश्री जावीद, अनिता पंडत, किरण कांबळे यांना आज मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
आजरेकर फौंडेशनच्यावतीने डॉ.आंबेडकर भवन इमारत व हायमास्क दिव्यांची उभारणी
यावेळी आजरेकर फौंडेशनच्यावतीने लक्ष्मीपूरी येथील रिलायन्स मॉल जवळील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला क्रिंडा व सांस्कृतीक भवनची इमारत आजरेकर फौंडेशनने स्वखर्चाने नुतनीकरण करुन दिली आहे. तसेच याठिकाणी महापौर सौ. निलोफर आजरेकर यांच्या निधीतून हायमास्क दिवा बसविण्यात आला आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला क्रिंडा व सांस्कृतीक भवनच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीचे व हायमास्क दिव्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी सर्व मान्यवरांचे आजरेकर फौंडेशनच्या वतीने अध्यक्ष आश्पाक आजरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रास्ताविकात महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी गटनेते शारंगधर देशमुख यांनी आपला वाढदिवस साजरा न करता आपल्या भागामध्ये पुरग्रस्तांना मदत केल्याबददल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रभागामध्ये पुराचा मोठयाप्रमाणात फटका बसला होता. यावेळी महापालिकेने पुर कालावधीत फार चांगले काम केले आहे. प्रभागामध्ये रस्ते, गटर्स, ड्रेनेज लाईन व क्रॉसड्रेन अशी बरिचशी कामे पुर्णत्वास आली. भागातील नागरिकांनी आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे.
गटनेते शारंगधर देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले, २०१९ साली ज्यावेळी मोठया प्रमाणात महापुर आला त्यावेळी आम्ही सर्व नगरसेवक रात्रदिवस लोकांच्या मदतीला होतो. २०१९ साली मोठया प्रमाणात पुर आलेने मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला, आमच्या देशमुख शाळेतील स्टाफ, विघ्यार्थी, विघ्यार्थीनी, कार्यकर्ते व भागातील मंडळे, मित्रपरिवार यांच्या सहकार्याने पुरामघ्ये पडझड झालेली तीन घरे मी बांधू शकलो. ज्यावेळी सहकार्याची व दातृत्वाची साथ मिळते त्यावेळी आपण काहितरी यशस्वीरित्या करु शकतो, असेही ते म्हणाले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, शारंगधर देशमुख यांनी ही घरे बांधून उल्लेखनीय काम केले आहे. सर्व सदस्यांनी पुरावेळी प्रामाणीकपणे काम केले. महापौर सौ.निलोफर आजरेकर या महिला असून सुध्दा त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले. त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. त्या कायम कामात राहील्या. आपण सर्वजन गेले सात महिने कोरोनाशी लढा देत आहोत. अजुनही कोरोना पुर्णत: गेलेला नाही. त्यामुळे सर्वानी मास्क लावावा, सोशल डिस्टन्स पाळावे, सर्वानी काळजी घ्यावी, शहराच्या विकासासाठी सर्वानी कुटूंब म्हणून एकत्रीत येवून काम करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, जेथे जेथे अडचण येते तेथे शारंगधर देशमुख मदत कार्यात पुढेच असतात. ते कधीही काम करण्याची संधी सोडत नाहीत. चालू वर्षी आपण सर्व मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुर नियंत्रीत ठेवू शकलो. पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका यांच्या मध्ये समन्वय राहिल्याने पुराची लेव्हल आपण नियत्रीत करु शकलो. शहराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी आवश्यकती सर्व मदत आम्ही करु स्वच्छ सुंदर व कोंडाळामुक्त करुया.
यावेळी देशमुख हायस्कूलचे व्ही. एस. पटकुरे, पी. एस. जाधव, तेजस मुक्त विघालयाचे डी.व्ही.पाटोळे, एस. व्ही. चिचेवाडे, सन्मित्र विघालयाचे एस. व्ही. भोसले, देशमुख इंग्लीश मेडियम सुरेश कांबळे, बेसमेंन्ट कटटाग्रुपने मदत केल्याबद्दल व देवराज बोटींग क्लब यांनी पुरामध्ये बोटी उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आजरेकर फौडेंशनचे अध्यक्ष अशपाक आजरेकर यांनी आभार मानले व ते म्हणाले की, महापालिकेची असलेली कामगार चाळ इमारत बांधण्याचा आमचा मानस असून येत्या दोन ते तीन महिन्यात महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करु, तसेच प्रभागातील ९५ टक्के कामे पुर्ण करु शकलो याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संजय कदम, संजय तोरस्कर, विकी कांबळे, विकास माजगावकर, सदानंद दिघे, समाधान कांबळे, श्रीकांत पंडत, विनोद पंडत व भागातील नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची “पंखाविना भरारी,तयार होत आहेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेण पणत्यांसह भेटवस्तू

0

जिल्हा परिषदेच्या मतिमंद शाळांमधील विद्यार्थ्यांची “पंखाविना भरारी,तयार होत आहेत आकर्षक आकाश कंदील, पणत्या, उटणे, मेण पणत्यांसह भेटवस्तू

कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग, मतिमंद, गतिमंद मुलांच्या शाळांमध्ये दिवाळीसाठी विशेष मुले आकर्षक आकाश कंदील, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार करण्यात गुंतली आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनेटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलंपिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते ते दाखवून दिले आहे.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी माहिती दिली. या शाळेतील उद्योग केंद्रात १८ वर्षापुढील ५६ मुले आहेत. अत्यंत सुंदर पध्दतीने गणेश मूर्ती तयार करतात. वेगवेगळी फुले तयार करतात. दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. फाईल तयार करण्यात येतात शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षीत असणाऱ्या या मुलांना आमच्या संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते. या वस्तूंची खरेदी करावी असेही त्या म्हणाल्या. संपर्क- नवीन न्यायालयाच्या मागे, कसबा बावडा, कोल्हापूर. प्रमोद भिसे- ७२७६०५१४७२
जिज्ञासा विकास मंदिर बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदीलची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मेणपणत्या मुलं सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचं पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पध्दतीचं प्रशिक्षण दिलं जातं. मुलांसाठी व्यायामशाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं. या मुलांच्या सुंदर कलाकृती खरेदी करून आपल्या दिवाळीबरोबरच या मुलांच्या दिवाळीचा आनंदही व्दिगुणीत करावा. संपर्क- रघुनंदन हॉल, क्रशर चौक, कोल्हापूर. स्मिता दीक्षित- ९८५००६०९०३
चेतना अपंगमती विकास संस्थेचे चेतना विकास मंदिर -कृष्णात चौगुले व्‍यवस्थापकीय अधीक्षक- कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. मुलींसाठी चेतना बजार सुरू केले. तेलाचा घाणा सुरू आहे. ५० हजार पणत्या, १ हजार डझन आकाश कंदील, ५ हजार लक्ष्‍मीपुजन पुडे दिवाळीच्या निमित्ताने विक्री करतो. १३ ते १४ लाखाची उलाढाल यामधून होत असते. यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य आम्ही मुलांकडून घरातून करून घेतले आहे. घरातून २५ हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. २०० डझन आकाश कंदील घरातून तयार करून आलेले आहेत. चिमण्यांची घरटी बनवली आहेत. यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनेटायझरच्या बाटलीचाही आम्ही समावेश केला आहे.
मुख्याध्यापिका उज्वला खेबुडकर – अमित सुतार, केदार देसाई, आशिष सावेकर, ओंकार राणे आणि प्राजक्ता पाटील या खेळाडूंनी स्पेशल ऑलंपिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी सांकेतिक भाषेत सादर केलेल्या राष्ट्रगीतात शाळेतील ८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. गोविंद नेहलानी दिग्दर्शित वुई केअर फिल्म फेस्ट यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या चित्रफितीतही चेतनाचा सहभाग राहिला आहे. संपर्क- कुष्ठधाम शेंडापार्क, कोल्हापूर, ०२३१-२६९०३०६/०७
स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय कागल-तृप्ती गायकवाड- मुलांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे काम दिले जाते. एकूण २५ विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. वेगवेगळ्या सणानिमित्त साहित्य निर्मिती केली जाते. रक्षाबंधनला राख्या तयार केल्या जातात. दिवाळी सणासाठी आकाश कंदील, पणत्या, नक्षीदार मेणपणत्या, सुंदर फुले सद्या तयार करण्यात येत आहेत. मतिमंद मुलं देखील उत्तम पध्दतीने काम करतात हे त्यांच्या वस्तू निर्मितीमधून स्पष्ट झाले आहे. यामधून त्यांना विद्या वेतन मिळते. संपर्क- तृप्ती गायकवाड- ९५४५१५९३७४.
सन्मती मतिमंद विकास केंद्र इचलकरंजी- व्यवसाय अधीक्षक किशोरी शेडबाळे- लिफाफे तयार करणे, बुके तयार करणे, बॉक्स फाईल तयार करणे, पणत्या रंगवणे, गिफ्ट बॉक्स, लक्ष्मीपुजनचा पुडा, रंगीबेरंगी पणत्या आदींचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेमार्फत काही विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. या वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. संपर्क- किशोरी शेडबाळे ९०९६२५०९५२.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ही विशेष मुले पाठीमागे नाहीत हे त्यांनी बनवलेल्या वस्तूंमधून दिसून येते. गरज आहे ती त्यांनी बनवलेल्या वस्तूंना खरेदी करून दिलखुलासपणे दाद देण्याची.

काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठपूराव्यामूळे थैलेसिमीया रुग्णांकरिता राज्यातील सिव्हील रुग्णांलयात औषधे झाली उपलब्ध.

0

काँग्रेसच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या पाठपूराव्यामूळे थैलेसिमीया रुग्णांकरिता राज्यातील सिव्हील रुग्णांलयात औषधे झाली उपलब्ध.

कोल्हापूरातील समवेदना मेङिकल र्फोंङेशनने केली होती मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : थैलेसिमिया, हिमोफीलिया, सिकलसेल, अॅनिमिया रक्तविकार अनुवंशिक आजार आसल्याने या रुगणांना दर १५ ते २० दिवसाला बाहेरून रक्त दयावे लागते. सतत रक्त चढविल्याने रुगणांच्या शरीरात लोहचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीरात त्याचा दूष परिणाम होऊन शरिराचे फार नुकसान होते, ते होवू नये म्हणून त्यांना लागणारी औषधे सतत घ्यावी लागतात.परंतु ही औषधे महाग असल्याने सर्वसामान्य कुटूंब त्याचा खर्च करू शकत नाहीत. त्यामुळे रुग्ण उपचारा पासून वंचित राहत होता. रुग्णांचे हाल होवू नये म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षापासून बर्कत पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समवेदना मेडिकल फौंडेशनचे पदाधिकारी व शिष्टमंडळ आरोग्य प्रशासन, लोकप्रतिनीधी यांच्याशी वारंवार संपर्क साधून थैलेसिमिया डेकेअर सेंटरसाठी प्रयत्न करीत होते या प्रयत्नाला यश आल्याने आज पासून सोलापूर सिव्हील रुग्णालयात औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत त्यामुळे पालकांच्यावर असलेला ताण- तनाव काही का असेना कमी झाला आहे. ही औषधे इतर रुग्णांच्या पर्यंत पोहचावित म्हणून आज रोजी सोलापूर सिव्हील हॉस्पीटल बी ब्लॉक येथे औषधे वाटप करण्यात आले.
यावेळी मा. आमदार प्रणितीताई शिंदे राज्याचे मेडीकल कॉलेजचे आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाणे यांनी लवकरच डे केअर सेंटर सुरू करण्यात येईल असे आशवासन दिले. तसेच बालरोग चिकित्सक डॉ. सावसकर मॅडम यांनी दर मंगळवारी दूपारी ३ ते ५ या वेळेत औषधे दीली जातील असे अवाहन केले, तर सिव्हील सर्जन डॉ.प्रदीप ढेले बोलताना म्हणाले की लवकरच सुसज्ज असे डे केअर सेंटर सुरू करण्यात येईल. तसेच बरकत पन्हाळकर यांनी रूग्णांच्या अडचणी मांडून डे केअर सेंटरची मागणी केली. तर बाबा मेस्त्री यांनी १०० बेडचे सुसज्ज रुग्णालय लवकर तयार करून जनतेला उपलब्ध करून दयावे असे मत मांडले.
सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन गुळग यांनी तर आभार सचिन गोरे यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन सैफन शेतसंदी, रमेश औताडेे, विकी गंधम, यांनी केले.
तसेच यावेळी डॉ. अग्रेजा चिटनीस,डॉ.अविनाश घोरपडे,छावा संघटनेचे योगेश पवार, अॅड. डी.एन. भडंगे, प्रभाकर आयवळे, बालाजी गेजगे, विकास कांबळे, रोहन साठे, सतीश पोतदार, पालक- रुग्ण आदी उपस्थित होते.

कोल्हापूरात  रविवारी १ नोव्हेंबरला रिपाई’च्या  (ए) कार्यकर्ता योद्ध्यांचा  होणार सन्मान

0

कोल्हापूरात  रविवारी १ नोव्हेंबरला रिपाई’च्या  (ए) कार्यकर्ता योद्ध्यांचा  होणार सन्मान

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोविड १९ च्या महामारीत आपल्या जीवाची परवा न  करता हिंमतीने लढणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोल्हापूर कार्यकर्ता योद्धयांचा व जिल्हा नूतन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष -उत्तमदादा कांबळे यांनी केले आहे.
भारत देशातच नाही तर साऱ्या जगामध्ये कोविड १९  ने थैमान घातले .सारी जनता ही जगबुडी तर नाही ना?  या विचाराने भयभीत झाली.कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात या महामारीने जनतेला दारिद्य्राच्या खाईत नेऊन डोळ्याला पाणी आणले .  डॉक्टर, पोलीस,आरोग्य कर्मचारी  याप्रमाणे अनेक  सामाजिक संस्था कार्यरत राहिल्याच पण सामाजिक विचारसरणी व  अन्यायाविरुद्ध लढणारा रिपब्लिकन पक्ष सुद्धा  मागे राहिला नाही .रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महामारीला न घाबरता आपल्या जवळील जनतेला अन्न, वस्त्र,कपडालत्ता तसेच शासन व प्रशासनाच्या आव्हानानुसार रक्तदान शिबिरे,शेणी दान अशा अनेक सुविधा देऊन स्वतःच्या जीवाची परवा न करता समाजीकतेचे भान राखून आदर्श निर्माण केला.  म्हणूनच अशा कोविड – १९ मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या बहाद्दर भीमसैनिकांचा व  नूतन जिल्हा सरचिटणीस -संजय जिरगे सर,नूतन जिल्हाउपाध्यक्ष- जानबा कांबळे व जिल्हाउपाध्यक्ष – दत्ता मिसाळ यांचा सन्मान तसेच रिपब्लिकन चळवळीला अखंडपणे अविस्तरपणे दिलेल्या योगदानाबद्दल महा.प्र.सचिव मंगलराव माळगे व महा.प्र.सहसचिव बी.के.कांबळे यांचा कृतज्ञता सन्मान  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी २.०० वाजता अक्षता मंगल कार्यालय कावळा नाका कोल्हापूर. येथे करण्यात येणार आहे.सदर सन्मान परीषदेचे उद्घाटक प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर व कार्यक्रमाचे अध्यक्ष  रिपाई’चे जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) हे भुषविणार आहेत.तरी  सर्व  पदाधिकारी  व कार्यकर्त्यांनी  हजारोंच्या संख्येने( तोंडाला मास्क लावून) हजर रहावे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी केले

शाळा निर्जंतुकीकरण करणारा ध्येयवेडा शिक्षक द्वारकानाथ भोसले : राज्यप्रमुख सुधाकर सावंत

0

शाळा निर्जंतुकीकरण करणारा ध्येयवेडा शिक्षक द्वारकानाथ भोसले : राज्यप्रमुख सुधाकर सावंत

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा निर्जंतुकीकरण करणारा ध्येयवेडा शिक्षक द्वारकानाथ भोसले यांचे महानगरपालिका शाळांना खूप मोठे योगदान आहे असे प्रतिपादन शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत यांनी केले.राज्यपाध्यक्ष उमेश देसाई यांनी द्वारकानाथ भोसले यांनी दानशूर व्यक्ती, देणगी सामाजिक संस्था यांच्या मदतीतून लाखो रुपये उभे केले व शहरातील विविध शाळांना त्यांनी शैक्षणिक साहित्य दिले त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर शहर च्या वतीने द्वारकानाथ भोसले यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच संघटनेच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक साहित्य पीपीई कीट, N 95 मास्क,सैनिटाइजर कॅन शिक्षक समितीचे राज्य प्रमुख सुधाकर सावंत राज्य उपाध्यक्ष उमेश देसाई शिक्षक समिती कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य उत्तम गुरव खाजगी शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक शहाजी घोरपडे रामदास वास्कर वहिदा मोमीन,बाबूराव माळी, अनिल साळोखे,विष्णू देसाई आदि सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक संजय पाटील यांनी केले तर आभार जयश्री आवळे यांनी मानले. मा.द्वारकानाथ भोसले सर यांनी स्वखर्चाने स्वतः पी.पी.ई. कीट परिधान करुन शाळेचे निर्जंतुकीकरण करतात कोरोनाच्या क पार्श्वभूमिवर हे निर्जंतुकीकरण अत्यावश्यक होते. भोसले सर मनपा शाळांना नेहमीच मदत करतात.अनेक शाळांना साऊंड सिस्टीम ,मुलांना वाॕटर बाॕटल्स,टिफीन बाॕक्स,शिक्षकांना डाय-या,ज्ञानरचनावादी वर्गांसाठी मदत,मार्गदर्शन,भौतिक सुविधांसाठी आर्थिक मदत इ. असे अनेक प्रकारची मदत ते शाळांना करतात. कामाचा वसा घेतलेल्या मा. भोसले सरांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड होवून त्यांना सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२० हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झालेबद्दल शिक्षक समितीच्यावतीने त्यांचे त्रिवार अभिनंदन

विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून दूर करावेत- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

0

विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून दूर करावेत- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

कोल्हापूर/प्रतिनिधी : विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या अतिरीक्त जमीनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पुर्ण करा. तसेच विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून दिलेल्या कालमर्यादेत दुर करावेत अशा सक्त सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. विमानतळ विस्तारीकरणाबाबत आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने, ६४ एकर जमीन संपादित करण्यास दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच दिला आहे. त्यामुळे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी वेग आला आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋुतूराज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकूर कावळे आदी उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग आला असून त्यामध्ये नाईट लँडिगची कामे, धावपट्टी विस्तारीकरण, बागकाम, यासह अन्य महत्वाची कामे सुरू आहेत. मात्र विस्तारीकरणासाठी येणारे अडथळे लवकरात लवकर दुर व्हावेत यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत उर्वरीत कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ऑबस्टॅकल लाईट, महावितरणचे सब स्टेशन, होर्डींग्ज काढणे, तामगाव रोड व विमानतळ रस्त्याचे रूंदीकरण करणे या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.
विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी विस्तारीकरणामध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांना दिली.
त्यानंतर विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी संबंधीत विभागांनी, येणारे अडथळे निश्चित केलेल्या कालमर्यादेत दूर करू असे आश्वासन दिले. त्यानंतर नामदार सतेज पाटील यांनी, ज्या अडचणी ज्या विभागाच्या कक्षेत येतात त्यांनी आपापसात समन्वय राखून लवकरात लवकर दूर कराव्यात अशा सुचना केल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दानुसार वेळेत काम पुर्ण केले नाही तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
त्याचबरोबर शासनाने ६४ एकर जमीन संपादित करण्यास दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच दिला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करा असा आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिला.सध्या सुरू असलेली कामे व यापुढे करण्यात येणारी उर्वरीत कामे करताना त्यांच्या दर्जाशी तडजोड करू नये. त्याशिवाय विमानतळ विस्तारीकरण प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षताही ज्या त्या अधिकाऱ्यांनी घ्यावी असे नामदार पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला महावितरणचे अंकूर कावळे, पॉवरग्रिडचे हिमांशू रावत, महापारेषणचे डी एम महाजन, ग्रामविकास अधिकारी बी डी कापसे, पीडब्ल्यूडीचे उप अभियंता डी आर भोसले, व्ही एन पाटील, सुभाष मोरे, यांच्यासह इतर सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अवलिया मोहरम उत्सव कमिटी समुहाने केल्या पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमि येथे ५०००/-शेणीदान

0

अवलिया मोहरम उत्सव कमिटी समुहाने केल्या पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमि येथे ५०००/-शेणीदान

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात व आपल्या शाहु नगरीत हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या अवलिया मोहरम उत्सव कमिटी या समुहाने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए- मिलाद या सनाचे औचित्य साधुन शुक्रवार आज ३० रोजी पंचगंगा मुक्तिधाम स्मशानभूमि येथे ५०००/-शेणीदान केल्या या साठी खालील प्रमुख पाहुणे लाभले
महापौर मा सौ, निलोफरआजरेकरसो
महापौर,माजी नगरसेवक,मा, श्री,नंदकुमार मोरे,पो,हेड,कॉन्स्टेबल,लक्ष्मीपूरी पोलिस ठाणे
मा श्री मुरलीधर रेडेकर,पो,कॉन्स्टेबल,लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे मा श्री इंद्रजीत खड़के,आरोग्य निरीक्षक,को,म,न,पा मा श्री अरविंद कांबळे, यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी अमर पंडत,सचिन कांबळे, रवि घुले,योगेश लोखंडे,महेश कदम,परवेज जामदार,सचिन पंडत,बादल बुचड़े,उद्धव माने, प्रदिप सुतार,आशिष पडवळ आणि अवलिया मोहरम उत्सव कमिटी,कोल्हापूर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.