Tuesday, July 1, 2025
spot_img
Home Blog Page 28

सिप्लाच्या उपाध्यक्षांची घोडावत विद्यापीठास भेट सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव

0

सिप्लाच्या उपाध्यक्षांची घोडावत विद्यापीठास भेट
सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव

अतिग्रे/प्रतिनिधी : कंपनी क्वालिटी अफेयर्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष संजीव आसगेकर यांनी नुकतीच घोडावत विद्यापीठास भेट दिली.यावेळी विद्यापीठाकडून सेंटर फॉर एक्सलन्स साठी प्रस्ताव ठेवण्यात आला. यासाठी सिप्ला कंपनीच्या प्रमुखांबरोबर सकारात्मक चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
यावेळी कुलसचिव डॉ. विवेक कायंदे ,विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे डीन डॉ. विवेक कुलकर्णी, औषध निर्माण शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुभाष कुंभार, विज्ञान व अलाइड हेल्थ सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. आनंद सावंत, प्रशिक्षण व प्लेसमेंटचे संचालक डॉ. नितिन पुजारी, विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्निल हिरीकुडे,बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. जीवन लव्हांडे, डी. फार्म विभागप्रमुख,डॉ. विद्याराणी खोत, टीपीओ समन्वयक प्रा. सुरज पाटील उपस्थीत होते. शैक्षणिक समन्वयक अश्विनी चकोते यांनी आसगेकर यांचे स्वागत केले.
यावेळी फार्मसी इमारतीतील अत्याधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, आणि शैक्षणिक डिजिटल साधने पाहिली. त्यांनी शिक्षकांशी संवाद साधून सिप्ला आणि विद्यापीठ यांच्यातील सहयोगाबद्दल विचारविनिमय केला. विद्यार्थ्यांसोबत सिप्ला कंपनीमधील संधींबद्दल चर्चा केली. तसेच इंटर्नशिप प्रोग्राम्स, आणि उद्योगविशिष्ट प्रमाणपत्र अभ्यासक्रम विषयक चर्चा केली. सिप्ला प्रायोजित प्लेसमेंट ड्राइव, अलुमनी मेंटॉरशिप प्रोग्राम्स आणि कौशल्य विकास कार्यशाळेच्या प्रस्तावावर चर्चा झाली. सेंटर फॉर एक्सलन्स साठी विश्वस्त विनायकजी भोसले यांच्याशी चर्चा करताना आसगेकर यांनी सिप्ला आणि घोडावत विद्यापीठ यांच्यामध्ये भविष्यात सहकार्य वाढत राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील ३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश

0

चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील
३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश

कोल्हापूर/प्रतिनिधी : देश व राज्य पातळीवरील विविध वैद्यकिय आणि अभियांत्रिकी (आयआयटी, एनआयटी, शासकीय अभियांत्रिकी व स्वायत्त कॉलेज) यामधील विविध शाखांमध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट, जेईई, एमएचटी-सीईटी, आदी स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांचे प्रवेश नुकतेच निश्चित झाले आहेत. या निश्चित झालेल्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील क्लासेस, कॉलेज व अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून समुहाच्या ३१ विद्यार्थ्यांना एमबीबीएस साठी तर ३२७ विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी, बीटस्, शासकीय अभियांत्रिकी व स्वायत्त कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे, असे समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले.मेडिकलसाठी प्रवेशप्राप्त आमचे काही विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कचरे वैभवी, क्षिरसागर सानिका, पाटील तृप्ती, अत्किरे सलोनी, शेटे शिवकीरण, बैरागी सोनल, माने सिमरन, थोरात गायत्री, कांबळे साक्षी, घनवट साक्षी, प्रज्ञासागर विशाखा, कुलकर्णी आर्यन, दुबल वैष्णवी, जसूजा दिया, पाटील निकिता, पोवार श्रद्धा, लोंढे आदिती, राजमाने दिक्षा, निकम पायल, पाटील अवधूत.

आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी व शासकीय, स्वायत्त अभियांत्रिकीच्या विविध शाखांसाठी प्रवेशप्राप्त काही विद्यार्थी पुढीलप्रमाणे – कल्याणकर माही, व्हरांंबळे प्रदिप, म्हातो नीरज, नलवडे हर्षल, शिंदे आयुष, कदम सोहम, चव्हाण अंकित, कणकेकर नेहा, मांडवे स्वप्निल, कुंभार आराध्या, गोडसे ऐनेश, गायकवाड पियुष, मोरे सिद्धी, चौगुले सिद्धी, राजमाने धिरज, लंबे लौकीक.
चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, संचालक प्रा. डॉ. भारत खराटे, सर्व शाखा व्यवस्थापक, प्राचार्य, समुहाचे पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

0

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून देत आहेत.त्या खूप पुढे गेल्या आहेत.महिलांकडे प्रचंड बुद्धी आहे त्या कर्तबगार व बुद्धिवान आहेत.त्यामुळेच त्या काहीही करू शकतात. रोटरी क्लब ऑफ गार्गिजच्या माजी अध्यक्षा श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी गेली ३५ वर्षापासून सुपारीची गणेश पूजन करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.त्यांचा मुलगा आणि सून यांनीही याचे स्वागत करून याच पद्धतीने गणेश पूजन सुपारीचे करत आहेत.
आपल्यातील आत्मविश्वास श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी समोर ठेऊन त्यांनी हे एक नवे पाऊल लग्नानंतर उचलले होते त्याला आता ३५ वर्षांचा कालावधी झालेला आहे.काळानुरूप त्यांनी स्वतःची एक नवी ओळख यातून सिद्ध करून दाखविली आहे.
त्या रोटरी क्लब आर्गीच्या २०२४ च्या प्रेसिडेंट आहेत. तर एस एन घाडगे अँड सन्सची डीलरशिप सांभाळत आहेत. एक महिला ही डीलरशिप सांभाळत आहे हे समाजाच्या दृष्टीने महिलांसाठी उत्तम उदाहरण आहे. ३५ वर्षापासून त्या त्यांच्या मुलासोबत उत्तमपणे ही डीलरशिप सांभाळत असून आज ७२ वर्ष असणाऱ्या कल्पना घाटगे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन्सची उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे पदवी घेतली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी कंपनीत १९७४ साली ई सी आय एल कंपनीत त्यांनी नोकरी केली आहे. संगणक तयार करणारी ही कंपनी होती.नोकरी करत असताना सुरुवातीचा काळ त्यांनी हैदराबाद येथे घालविला आहे. त्यामुळे संगणक सुरू झाला त्यावेळी संगणकाची त्यांना माहिती नोकरीच्या निमित्ताने मिळाली. कोल्हापूरच्या के. आय. टी कॉलेजमध्येही सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना इले्ट्रॉनिक्स आणि टेली कम्यूनिकेशन विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला खूप आवडते.
१९७६ ला लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी सुपारीच्या रूपात गणेशाची पूजा केली होती ती आज तागायत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने परंपरा चालू ठेवलेली आहे.घरगुती गणेश विसर्जन दिवशी विधिवत पद्धतीने त्या बादलीमध्ये या सुपारी गणेशाचे विसर्जन करतात आणि नंतर झाडामध्ये सुपारी ठेवतात.माझ्या घरच्यांनी मला या गणेश पूजनाला कायमच सहकार्य केले आहे असे त्यांनी बोलून दाखविले आहे.सुपारी पुजना बरोबरच घरात गंगा गौरीचेही पूजन त्या करतात.पर्यावरणाचा विचार करून त्यांनी ३५ वर्षापूर्वी हे पाऊल उचलले होते त्याला त्यांचे सर्व कुटुंब सहकार्य करत आहेत. एक विधायक भावनेने घाटगे कुटुंब चालत असून त्यांचा हा विचार समाजाला दिशा देणारा असाच आहे.

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

0

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून देत आहेत.त्या खूप पुढे गेल्या आहेत.महिलांकडे प्रचंड बुद्धी आहे त्या कर्तबगार व बुद्धिवान आहेत.त्यामुळेच त्या काहीही करू शकतात. रोटरी क्लब ऑफ गार्गिजच्या माजी अध्यक्षा श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी गेली ३५ वर्षापासून सुपारीची गणेश पूजन करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.त्यांचा मुलगा आणि सून यांनीही याचे स्वागत करून याच पद्धतीने गणेश पूजन सुपारीचे करत आहेत.
आपल्यातील आत्मविश्वास श्रीमती कल्पना दिलीप घाटगे यांनी समोर ठेऊन त्यांनी हे एक नवे पाऊल लग्नानंतर उचलले होते त्याला आता ३५ वर्षांचा कालावधी झालेला आहे.काळानुरूप त्यांनी स्वतःची एक नवी ओळख यातून सिद्ध करून दाखविली आहे.
त्या रोटरी क्लब आर्गीच्या २०२४ च्या प्रेसिडेंट आहेत. तर एस एन घाडगे अँड सन्सची डीलरशिप सांभाळत आहेत. एक महिला ही डीलरशिप सांभाळत आहे हे समाजाच्या दृष्टीने महिलांसाठी उत्तम उदाहरण आहे. ३५ वर्षापासून त्या त्यांच्या मुलासोबत उत्तमपणे ही डीलरशिप सांभाळत असून आज ७२ वर्ष असणाऱ्या कल्पना घाटगे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकामुनिकेशन्सची उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथे पदवी घेतली आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी कंपनीत १९७४ साली ई सी आय एल कंपनीत त्यांनी नोकरी केली आहे. संगणक तयार करणारी ही कंपनी होती.नोकरी करत असताना सुरुवातीचा काळ त्यांनी हैदराबाद येथे घालविला आहे. त्यामुळे संगणक सुरू झाला त्यावेळी संगणकाची त्यांना माहिती नोकरीच्या निमित्ताने मिळाली. कोल्हापूरच्या के. आय. टी कॉलेजमध्येही सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना इले्ट्रॉनिक्स आणि टेली कम्यूनिकेशन विषयावर मार्गदर्शन केले आहे. त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला खूप आवडते.
१९७६ ला लग्न झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी सुपारीच्या रूपात गणेशाची पूजा केली होती की आज तागायत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने परंपरा चालू ठेवलेली आहे. माझ्या घरच्यांनी मला कायमच सहकार्य केले आहे असे त्यांनी बोलू. दाखविले आहे.सुपारी पुजना बरोबरच घरात गंगा गौरीचेही पूजन त्या करतात.

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

0

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

घोडावत विद्यापीठात ‘लाॅ’ विभागाचे उदघाटन

अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची आव्हाने पार करता येतात.उमेद,जिद्द,विश्वास असणारी व्यक्ती कधीच हारत नाही. प्रतिकूल परिस्थितीची झुंज देता यायला हवे तरच आई-वडिलांची इच्छा पूर्ण करता येते असे प्रतिपादन पद्मश्री,सरकारी वकील,ॲड.उज्वल निकम यांनी केले. संजय घोडावत विद्यापीठात लाॅ विभागाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले,समाजात वकिलांना जंटलमेन म्हणून ओळखले जाते. तो लॉजिकल थिंकिंग करत असतो. चांगलं काय आणि वाईट काय याचं वर्गीकरण करत असतो हे कौशल्य आपल्यात निर्माण होण्यासाठी लॉ चे शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सायबर लॉ,इंडस्ट्री लॉ अशा विशेष शाखांवर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावे. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी उपस्थित होते. १९९१ पासून या भागातील विकासाचा साक्षीदार असल्याचे सांगताना त्यांनी संजय घोडावत यांनी माळरानावर फुलवलेल्या शैक्षणिक नंदनवनाचे कौतुक केले. कायद्याचे शिक्षण देणारे स्कूल या कार्यक्षेत्रात निर्माण होत असल्याचा आनंद आहे. समाजासाठी उत्तम वकील येथून घडावेत अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
चेअरमन संजय घोडावत यांनी मान्यवरांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी उपस्थित विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे आणि लॉ विभागाच्या संचालिका ॲड. डॉ.अंजली पाटील यांनी हा विभाग सुरू करण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले.यावेळी कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सर्जेराव खोत, उपाध्यक्ष ॲड. उमेश मनगावे,सचिव ॲड. निशिकांत पाटोळे, महिला प्रतिनिधी ॲड. सोनाली शेठ उपस्थित होत्या. तसेच सर्व डीन,प्राध्यापक, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केले तर सर्वांचे आभार ॲड. डॉ.अंजली पाटील यांनी मानले.

नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना गोकुळ कडून एक लाखाचा धनादेश प्रदान

0

नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना गोकुळ कडून एक लाखाचा धनादेश प्रदान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नेमबाजी मध्ये कांस्यपदक मिळवले बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत १ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते या रक्कमेचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक यांच्या उपस्थितीमध्ये स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे व आई अनिता कुसाळे यांच्याकडे बामणी, ता.कागल येथे गोकुळच्या वतीने शनिवार दि.२४/०८/२०२४ इ.रोजी आयोजित कागल तालुका संपर्क सभेमध्ये प्रदान करण्यात आला.
यावेळी नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की, स्वप्नील चे हे यश अभिमानास्पद असून भविष्यात स्वप्निल यशाची अनेक शिखरे पादक्रांत करून देशाचे नाव उज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले असून भविष्यात ही कार्य चालू राहील असे मनोगत व्यक्त केले व गोकुळ परिवारामार्फत स्वप्निल ला शुभेच्छा दिल्या.यावेळी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे म्हणाले की, स्वप्निल ला मिळालेले हे यश त्याचे प्रामाणिक कष्ट, मित्र मंडळींचे सहकार्य, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच हितचिंतकांचे आशीर्वाद यामुळेच मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले व गोकुळ परिवाराचे ऋण व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व संघाचे अधिकारी आदी. तसेच दूध संस्थांचे प्रतिनिधी आधी उपस्थित होते.

घोडावत विद्यापीठात एमबीए; आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु

0

घोडावत विद्यापीठात एमबीए; आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामुळे करिअरच्या अनेक संधी खुल्या होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रो. उद्धव भोसले यांनी दिली.सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य, आर्थिक पुनप्राप्ती, आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.कुलगुरू प्रो. भोसले यांनी सांगितले की, हा अभ्यासक्रम ब्रिटिश कौन्सिलच्या ‘गोइंग ग्लोबल पार्टनरशिप ग्रांट’ द्वारे निधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सवलतीच्या शुल्कात उपलब्ध होईल. तसेच, हा अभ्यासक्रम भारत सरकारच्या आपत्ती-लवचिक पायाभूत सुविधा गठबंधन (CDRI) ने मंजूर केला आहे. सरकारी कार्यालये, संबंधित उद्योग तज्ञ आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांनी या अभ्यासक्रमाला पाठिंबा दिला आहे. UGC च्या नवीन धोरणांनुसार, हा अभ्यासक्रम इतर नियमित पीजी किंवा पीएचडी अभ्यासक्रमासोबत एकाच वेळी करता येईल.याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्लंड मधील टीसाईड विद्यापीठात किंवा भारतातील सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये संपूर्ण सेमिस्टर इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, घोडावत विद्यापीठाने या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक लवचिक ठेवले असून, हायब्रिड शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. आठवड्याच्या शेवटी अभ्याससत्रे आयोजित केली जातील, ज्यामुळे विद्यार्थी आपल्या नियमित कामकाजाबरोबर हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. हा अभ्यासक्रम NEP 2020 नुसार बनवण्यात आला आहे .यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा सरकारी, निमसरकारी, खाजगी किंवा इतर कोणत्याही संस्थेमध्ये कार्यरत असणारे व्यावसायिक प्रवेश घेऊ शकतात.अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी अभ्यासक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.कुलसचिव विवेक कायंदे यांनी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन केले आहे.

लोहपुरुष केएससी ट्रायथलॉन, डूएथलॉन पावर्ड बाय रगेडियन स्पर्धा येत्या २२ सप्टेंबरला आयोजित,

0

लोहपुरुष केएससी ट्रायथलॉन, डूएथलॉन पावर्ड बाय रगेडियन स्पर्धा येत्या २२ सप्टेंबरला आयोजित, देश विदेशातील ५०० हून अधिक स्पर्धकांचा असणार सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर ही क्रिडानगरी जगभर प्रसिद्ध आहे.या नगरीत अनेक खेळाडू घडलेले आहेत.शिवाय अनेक खेळाडू कोल्हापूरचे नाव उंचावत आहेत.या क्रीडानगरीत विविध कलेला राजाश्रय दिला गेलेला आहे.स्पर्धकांमध्ये खेळाची उत्तेजना निर्माण व्हावी स्पर्धकांना व्यासपीठ मिळावे यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने येत्या २२ सप्टेंबर रोजी लोहपुरुष या नावाची ट्रायथलॉन आणि डूएथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे चेतन चव्हाण आणि रगेडियनचे आयर्नमॅन आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब ही चॅरीटेबल ट्रस्ट असून यांच्यातर्फे विविष स्पर्धा घेतल्या जातात.                                            रगेडीयन आणि केएससीच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते यातीलच सलग सहाव्या वर्षी २२सप्टेंबर रोजी ट्रायथलॉन आणि डूएथलॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेला लोह पुरुष हे नाव देण्यात आले असून राजाराम तलाव येथे सकाळी सहा वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.२ किलोमीटर पोहणे,९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग अशा तीन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत.ट्रायथलॉनमध्ये स्विमिंग,सायकलिंग आणि रनिंग या स्पर्धांचा समावेश आहे तर डूएथलॉन मध्ये केवळ रनिंग आणि सायकलिंग स्पर्धा होणार आहेत.                                                              या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने या स्पर्धा होत असून देश विदेशातील ५०० हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होत आहेत.स्पर्धेत नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना, टी-शर्ट, मेडल, टाईम चिप, सर्टिफिकेट, बॅग आणि अल्पोपहार आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.शिवाय स्पर्धेदिवशी स्पर्धकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. धमाल मस्ती या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्पर्धकांना करावयास मिळणार आहे.यावेळी पत्रकार परिषदेला डॉ.विजय कुलकर्णी, डॉ.प्रदीप पाटील, आशिष तंबाके, एस.आर.पाटील,गोरख माळी,आदित्य शिंदे,महेश शेळके आदी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्योजकता विकास मार्गदर्शन

0

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्योजकता विकास मार्गदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम झाला. कोल्हापूर आय. टी. असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, स्मॅकचे संचालक उद्योजक संजय भगत, क्रिडाईचे संचालक बांधकाम व्यवसायिक आदित्य बेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम झाला.उद्योजक संजय भगत यांनी आत्मपरीक्षण, आत्मविश्वास या जोरावर योग्य नियोजन उद्योगात आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रताप पाटील यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्या क्षेत्रात आवड आहे तिथे जास्तीत जास्त वेळ देऊन कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे नमूद केले.क्रीडाई संचालक आदित्य बेडेकर यांनी गुणवत्ता,कस्टमर रिलेशन आणि झोकून देवून काम करण्याची तयारी ठेवली तर यश निश्चित आहे असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उद्योग उभारताना येणाऱ्या अडचणी, उद्योग कसा निवडावा?, त्यासाठी भांडवल कसे उभारावे? बिझनेस मधील अपयश कसे पचवावे? उद्योजक होण्यासाठी कोणते गुण हवेत याबद्दल प्रश्न विचारले.
प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी,रजिस्ट्रार महेश रेणके, विभाग प्रमुख डॉ. पी.के.शिंदे, प्रा.शीतल साळोखे, प्रा.अक्षय करपे उपस्थित होते.ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.अजय बंगडे यांनी आभार मानले.