Tuesday, July 1, 2025
spot_img
Home Blog Page 27

डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान – संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

0

डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान – संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

 

अतिग्रे/प्रतिनिधी :अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ. पवार यांनी २०२० पासून सलग पाच वर्षे, हे स्थान कायम राखले आहे. या प्रतिष्ठेच्या यशामुळे संजय घोडावत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर अधिक उजळले आहे.
डॉ. पवार यांनी आधुनिक पदार्थ विज्ञान आणि अ‍ॅप्लाइड फिजिक्स या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले असून, जागतिक पातळीवरील ३०४,७३८ संशोधकांमध्ये ३०४१वा क्रमांक मिळवला आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि अथक परिश्रमांचे प्रतीक आहे.
याव्यतिरिक्त, भारत सरकारकडून डॉ.पवार यांना एक विशेष प्रकल्प मिळाला आहे, ज्यात कार्बन डाय-ऑक्साइडचे इंधन (इथेनॉल, मिथेनॉल) तयार करण्यासाठी वापर करण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे जागतिक ऊर्जा संकटावर मात करण्यात भारताच्या प्रयत्नांना नवा आयाम मिळणार आहे.डॉ. पवार यांनी सुपरकॅपेसिटर, पाण्याचे विघटन, सौरघट, आणि ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञान या क्षेत्रांत भरीव संशोधन केले आहे, ज्यामुळे अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांच्या विकासात मोलाची भर पडली आहे.विश्वस्थ विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनीही डॉ. पवार यांचे अभिनंदन केले आहे.

चौकट

संजय घोडावत यांनी डॉ. पवार यांचे अभिनंदन करताना सांगितले,डॉ. पवार यांचे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य सतत पुढे जात आहे, आणि त्यांचे यश आमच्या शैक्षणिक व संशोधन कार्यात भरीव योगदान देत आहे.

चौकट

कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, डॉ. पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य अधिक गतीने पुढे जाईल आणि नव्या वैज्ञानिक शोधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.डॉ. पवार यांचे हे यश त्यांचे अथक परिश्रम आणि संशोधनातील निष्ठेचे फलित आहे. त्यांचे यश नव्या संशोधकांना प्रेरणा देणारे आहे.

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा उद्या २५ सप्टेंबरला रंगणार

0

तब्बल ५ लाख रूपयांची बक्षिसे असलेल्या झिम्मा-फुगडी स्पर्धा उद्या २५ सप्टेंबरला रंगणार

रामकृष्ण मल्टीपर्पज लॉनवर स्पर्धा होणार – सौ. अरूंधती महाडिक

कोल्हापूर/प्रतिनिधी : धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठया झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा १५ व्या वर्षी होणाऱ्या स्पर्धा उद्या बुधवार दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे होत आहेत.याठिकाणी महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा आणि युवतींनाही स्पर्धेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवता यावे, याकरता १२ ते १८ वयोगटातील युवतींसाठी ५० हजार रुपये बक्षिसांची वेगळी सांघिक झिम्मा स्पर्धा घेतली जाणार आहे तरी या स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी महिलांनी भेट द्यावी असे आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी केले आहे.
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था, गेल्या १४ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करत आहे. खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. यावर्षीही होणार्‍या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा आणि पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसर्‍या क्रमांकासाठी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसर्‍या क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी ५ हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच ५०१ रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसंच १२ ते १८ वयोगटातील मुलींसाठी खास ५० हजार रुपये बक्षिसांचा वेगळा सांघिक झिम्माही आयोजित करण्यात आला आहे. सहभागी सर्व महिलांसाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय याठिकाणी करण्यात आली आहे. त्यासाठी सहजसेवा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. नेहमीच्या दिनच्रकात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील खेळामुळे शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच सांघिक भावना आणि आत्मविश्‍वासामध्ये वाढ होत असल्यामुळे, जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असतो. त्याला जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो, असे सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले. गेल्या १४ वर्षांत युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना… हा प्रबोधनात्मक उपक्रम, मोफत शेळी वाटप, मोफत आरोग्य शिबिर, मोफत हेल्मेट वाटप, वृक्षारोपण, महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण, बचत गटांना मोफत स्टॉल, मिस आणि मिसेस भागिरथी स्पर्धा, युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर, रक्तदान शिबिर, वाचनाची सवय वाढीला लागावी, यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणे असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. हजारो महिला आणि युवतींना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे, असे सौ. महाडिक यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी सुमारे ४० परीक्षक, १५ निवेदिका आणि ६० स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टिव्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थिती लावणार आहेत.

तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक गोकुळ दूध संघ चेअरमन – अरुण डोंगळे

0
  1. तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक गोकुळ दूध संघ चेअरमनअरुण डोंगळे

कोल्हापूर/प्रतिनिधी : दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर उंचवण्यास मदत झाली असून जातिवंत जनावरांची जोपासना आणि शुद्ध प्रतीचे दुध यामुळे ग्रामीण भागात गोकुळच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे. गोकुळमुळे एक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याकडे ग्रामीण भागातील तरुणांचा कल वाढण्यास मदत झाली आहे .तसेच गोकुळ दूध संघाचे पाठबळ, अनुदान योजना , सेवा सुविधा यामुळे अनेकांनी दुग्ध व्यवसायात प्रवेश केला असून अनेक तरुणांच्या आर्थिक उन्नतीसाठी दुग्धव्यवसाय हा दिशादर्शक ठरू शकतो असे मत गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले ते शिरोळ तालुक्‍यातील हेरवाड या गावातील श्री.संतूबाई सहकारी दूध संस्‍थेच्‍या वतीने अयोजीत करण्यात आलेल्या परराज्यातून जातिवंत म्‍हैशी खरेदी केलेल्या दुध उत्पादकांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .
श्री डोंगळे म्हणाले,कि गोकुळच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत श्री.संतूबाई दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी हरियाणा राज्यातून मुऱ्हा जातीच्या ५८ म्हैशी खरेदी केल्‍या हि निश्चितच अभिमानाची गोष्‍ट असून गोकुळच्‍या विविध योजनाचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घेउन म्‍हैस दूध संकलन वाढीसाठी प्रयत्‍न करावेत असे अवाहन श्री डोंगळे यांनी केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्या हस्ते श्री.संतूबाई सहकारी दूध संस्‍थेचे दूध उत्‍पादक किसन माळी,बजरंग बरगाले, शकील जमादार, दिलीप माळी,दिनकर माळी,विजय पाटील, अरविंद पाटील. यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी उपस्थित दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माळी व संस्थेचे पदाधिकारी तसेच गोकुळचे दूध संकलन अधिकारी अशोक पाटील सुहास डोंगळे राहुल राजमाने अनिल पाटील आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

0

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन २०,२१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. यामिनी प्रदर्शनाचे हे अकरावे यशस्वी वर्ष असून यावर्षी प्रदर्शनात १०० हून अधिक स्टॉल आहेत. अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा रो. योगिनी कुलकर्णी, यामिनी इव्हेंट चेयर रो.आरती पवार, को.चेयर डॉ.हेमलता कोटकर,सेक्रेटरी लक्ष्मी शिरगावकर,रोटरी सदस्य रो.सौ.साधना घाटगे, यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सर्व सदस्य उपस्थित होत्या.
या प्रदर्शनाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.यावेळी आमदार जयश्री जाधव,रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर रो.गिरीश जोशी उपस्थित असणार आहेत.
या प्रदर्शनाला डी. वायं.पी. हॉस्पिटॅलिटी, घे भरारी आणि हॉटेल सयाजी यांचे सहकार्य लाभले आहे.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक गरजूंना मदत केली आहे.विधायक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ गर्गिज कोल्हापूरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, याबरोबरच दिल्ली, बनारस, गोवा, मुंबई, पुणे बेळगाव आणि इतर विविध शहरातून स्टॉल धारक येणार आहेत. व आपले स्टॉल मांडणार आहेत.ड्रेसेस, साड्या, लहान मुलांचे कपडे, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह वस्तू, स्किन केअर प्रॉडक्ट याबरोबरच रियल ज्वेलरी व डायरेक्ट विणकारांकडून बनारसी व चंदेरी साड्या यांचा यात समावेश आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा अस्तो. त्यामुळे बचत गट व स्वयम शाळेतील वस्तू आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंग, पोलिओ मुक्तीसाठी रोटरी समूहाचा सिंहाचा वाटा आहे.महिलांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळावी यासाठी चर्चासत्र आयोजित केले जातात.सामाजिक भान ठेऊन सामजिक प्रकलप राबविण्यावर अधिक भर दिला जातो.अशा विविध उपक्रमासाठी वापरला जातो.
या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो. योगिनी कुलकर्णी, ट्रेजरर रो. आरती पवार,सेक्रेटरी लक्ष्मी शिरगावकर,रो.सौ साधना घाटगे, रो. कल्पना घाटगे, रो. शोभा तावडे, रो. ममता झंवर याचबरोबर यामिनीच्या सदस्य रो. रेणुका सप्रे, रो. दीपिका कुंभोजकर,रो प्रीती मर्दा, रो प्रीती मंत्री,रो. गिरीजा कुलकर्णी, रो.मेघना शेळके त्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम यासाठी घेतले आहेत.हे प्रदर्शन २० सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २१ व २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

0

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिका आणि पोलीस व जिल्हा प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते.याला चांगला प्रतिसाद मिळाला.यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकी वेळी सार्वजनिक मंडळांनी चारही विभागीय कार्यालय अंतर्गत १८२ घरगुती व मंडळांच्या लहान मूर्तीसह १०१५ गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी विसर्जित केल्या. या सर्व मुर्त्या महापालिकेच्या वतीने संकलित करुन इराणी खणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या आणि इराणी खन येथे सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या १०३५ मोठ्या गणेश मूर्ती व ११.१ लहान गणेश मुर्ती अशा २१३६ गणेश मूर्ती इराणी खण येथे पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक नियोजन पध्दतीने व शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले. हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, आरोग्य, पवडी, सफाई, विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी, अग्निशमन जवान, वैद्यकीय पथक, व्हाइट आर्मी, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दिवस व अहोरात्र काम केल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकांनी व्यक्त केले.
शहरातील मुख्य गणेश विसर्जन मार्गावर विविध पक्षांच्या वतीने बूथ लवण्यात आले होते.याठिकाणी मंडळांचे मानाचे श्रीफळ व पान सुपारी देऊन स्वागत पर आभार मानण्यात आले.
पापाची तिकटी टीम व क्रांतिवीर भगतसिंग येते वाईट आर्मी रेस्क्यू फ्रेंड सर्कल या मंडळांची शेवटची गणपतीची आरती पहाटे ४.१५ वाजता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते करण्यात आली. मुख्य मिरवणूक मार्गावरून येणाऱ्या शेवटच्या गणेश मुर्तीचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी व शहर पोलिस उप-अधिक्षक अजित टिके यांच्या हस्ते इराणी खन येथे आरती करण्यात आली. यावेळी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, महापालिकेचे व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इराणी खन येथे शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या शेवटच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.अनेक आकर्षक गणेश मूर्ती पाहण्यासाठी मुख्य मिवणुकित नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान महापालिकेच्यावतीने अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेश विर्सजनाचे मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांचे अध्यक्षांना पापाची तिकटी येथील स्वागत मंडपामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी व इतर अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी व रोप देऊन स्वागत करण्यात आले. पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात २८४ गणेश मंडळांची नोंद झाली असून निर्माण चौक येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात ३१३ गणेश मंडळांची नोंद झाली.

महापालिकेची सर्व यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली

महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा २५ तासाहून अधिक काळ राबली. विसर्जना पूर्वी मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी, अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते. विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी मोठे हॅलोजन लावून लाईटची व्यवस्था करण्यात आली होती. इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेटींग, वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले होते. इराणी खणीसह मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. आरोग्य विभागाकडून विसर्जन स्थळी तातडीने स्वच्छता करण्यात येत होती. मिरवणूक मार्गावर व इराणी खण येथील विसर्जनाच्या स्थळी वैद्यकीय पथके नेमण्यात आली होती. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मुर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे १० तराफे, ४ क्रेनची व ३२० हमालांची व्यवस्था करण्यात आली होती. हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना रिफ्लेक्टर जॅकेट देण्यात आले होते. महाद्वार रोडवरील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी बंदिस्त बॅरिकेट्स लावण्यात आले होते.विसर्जनादरम्यान आरोग्य विभागाकडून विसर्जनाच्या ठिकाणी आलेले ३५ मे.टन. १० डंपरद्वारे गोळा करण्यात आले. गोळा झालेले निर्माल्य उठाव करून खत प्रक्रिया करण्यास पाठविण्यात आले. मिरवणूक मार्गावर व विसर्जनाच्या ठिकाणी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागाचे २५०० कर्मचारी, ७० टँम्पो ३२० हमाल, ५ जे.सी.बी., ७ डंपर, ४ टॅक्टर, ४ पाण्याचे टँकर, २ बुम, ६ ॲम्बुलन्स व १० फलोटींगचे तराफे अशी व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी इराणी खण येथे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता रमेश कांबळे, महादेव फुलारी, आर के पाटील, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकि अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी,विद्युत अभियंता अमित दळवी, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर, वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी २५ तासाहून अधिक तास काम करून पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विसर्जन यशस्वीरित्या पार पाडले.

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

0

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे संयोजन संस्थेचे मानद सेक्रेटरी किरण कापसे व खजिनदार सूर्यकांत बदामी यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष अनिल इनामदार यांनी केले.यावेळी त्यांनी संस्थेचा वार्षिक आढावा सादर केला. तसेच नियोजित संकल्पनांचा आढावा घेतला. त्यामध्ये संस्थेच्या आवारातील वृक्षारोपण, शुद्ध पिण्याचे पाणी, क्रीडांगणाचा विकास, चिल्ड्रन पार्क, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम करणे संदर्भात इच्छा व्यक्त केली.
यापैकी संस्थेच्या आवारात १६० झाडांचे वृक्षारोपण झाले आहे. त्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटीने ‘५० ट्री गार्ड’ दिले आहे. याबद्दल उपस्थित विद्यापीठाचे विश्वस्त व सदस्य विनायक भोसले यांचे आभार मानण्यात आले.या सभेत नऊ ठराव मांडण्यात आले. जे बहुमताने मंजूर करण्यात आले. सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्थेकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग सोसायटीच्या हितासाठी व विकासासाठी व्हावा यासाठी भविष्यातील योजनांची आखणी केली जाईल असे सर्वानुमते ठरले.यावेळी संस्थापक सदस्य डॉ. श्रीमती पुष्पलता इनामदार उपस्थित होत्या. तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुधीर कुलकर्णी यांनी केले.

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

0

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर अनुद्गार काढल्याने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व स्वामी भक्तांच्या वतीने शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चाचा मार्ग दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आहे. सर्व स्वामी भक्तांनी शुक्रवारी सकाळी १०.३० पर्यंत दसरा चौक कोल्हापूर येथे सहकुटुंब, सहपरिवार मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.या पत्रकार परिषदेला अरुण गवळी, कुलदीप जाधव, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, गुरुदेव स्वामी, अमोल कोरे, प्रकाश सरनाईक आदी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी  साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे

0

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी  साऊंड सिस्टीबाबत प्रबोधन करत वाटले कापसाचे बोळे

कोल्हापूर/प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा आवाजाच्या तीव्रतेचा त्रास होऊ नये यासाठी डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान कापसाच्या बोळ्यांचे वाटप करत लोकांचे प्रबोधन केले. गेल्या १४ वर्षांपासून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.विसर्जन मिरवणूक म्हटले की मोठ्या आवाजाची गाणी, हृदयात धडकी भरवणारी साऊंड सिस्टीम असे चित्र तयार झाले आहे. आबालवृद्धांना आवाजाचा त्रास होऊ नये व विसर्जन मिरवणुकीचाही आनंद घेता यावा यासाठी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोफत कापसाचे बोळे वाटत सामाजिक बांधिलकीची जाणीव घट्ट केली.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,पृथ्वीराज पाटील यांचे उपक्रमासाठी प्रोत्साहन, तर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे सहकार्य मिळाले.अधिष्ठाता डॉ.राहुल पाटील, एन. एस. एस.प्रकल्प अधिकारी श्री योगेश चौगुले, प्रा .नीलिमा वटकर यांच्यासमवेत अथर्व माने, तनिषा मधाने, स्वप्निल माने, वैष्णवी पंजाल, अथर्व गगाने, प्रज्ञेश जामदार, सार्थक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

.

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत

0

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत

अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून टॉप २ % संशोधक यादी जाहीर

कसबा बावडा/ वार्ताहर : अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जागतिक पातळीवरील आघाडीच्या संशोधकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर आणि डीन प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी जगातील अव्वल 2 टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवले आहे. डॉ. लोखंडे यांच्या या यशामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अलाईड फिजिक्स विभागातील ख्यातनाम संशोधक म्हणून ओळख असलेल्या डॉ. सी. डी. लोखंडे यांनी संशोधन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. डॉ. लोखंडे यांचे आतापर्यंत ६५० रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. अलाईड फिजिक्समधी अव्वल संशोधकांच्या यादीत त्यांनी देशातील पहिले स्थान कायम राखले असून जागतिक पातळीवर १८६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
पदार्थ विज्ञानातील तत्वांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारातील प्रश्न सोडविणे तसेच तांत्रिक सुधारणा करणे व नवनवीन उपकरणे तयार करण्यासाठी डॉ. लोखंडे हे सातत्यपूर्ण संशोधन करत आहेत. गॅस सेन्सॉर, सुपरकॅपॅसिटर, पाण्याचे विघटन, सौर घट, उर्जा साठवणूक पद्धत आदी विषयात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे ८० हून अधिक पेटंट प्राप्त झाली आहेत. त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या पेटंट विभागासाठी वैज्ञानिक सल्लागार तसेच बनारस विश्व विद्यालयाच्या सर्वोच्च मंडळावर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी त्यांनी काम केले आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी या यशाबद्दल प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. लोखंडे यांचे यश अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद असून त्यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात अनेक संशोधक घडत आहेत. संशोधन क्षेत्रात विद्यापीठाचे योगदान आणखी वाढावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली.डी. वाय. पाटील एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी जागातिक अव्वल संशोधकांच्या यादीत स्थान मिळवल्याबद्दल डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अभिनंदन केले.

येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

0

येक नंबर’च्या टिझरमधील ‘त्या’ आवाजाने वेधले सर्वांचे लक्ष

कोल्हापूर/प्रतिनिधी : सुरुवातीलाच प्रचंड जनसमुदायाने भरलेली सभा… महाराष्टाच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची झलक… जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो, हा अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचा कणखर आवाज… उत्साह… दिसत आहे. तर दुसऱ्या क्षणी दंगल, मारामारी, जाळपोळ, धुडगूस दिसत असून ‘ठाकरे साहेब’ असा हलकासा आवाजही कानावर येत आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून हा टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात आता असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येत्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांना मिळणार आहेत. पोस्टर झळकल्यापासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. त्यात लक्षवेधी ठरली, ती पोस्टरमधील करारी नजर आणि त्यात भर टाकली आहे ती पोस्टरमधील बुलंद आवाजाने. त्यामुळे हा बायोपिक आहे का, हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. दरम्यान टिझरमध्ये धैर्य घोलपसह सायली पाटीलची झलकही दिसत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटाच्या तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला निर्मात्या आहेत. ‘येक नंबर’ला अजय-अतुल यांसारखे कमाल संगीतकार लाभले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, ”ही कथा जेव्हा मी ऐकली तेव्हा मला वाटले, मला काही सांगायची आणि काही नवीन पद्धतीने गोष्ट मांडायची संधी आहे. प्रेक्षकांना ही माझी मांडणी कशी वाटेल, या बद्दल खूप उत्सुकता आहे.’’झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणतात, ” झी स्टुडिओजने आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. कथा ही कोणत्याही चित्रपटाची आत्मा असते. या चित्रपटाची कथाच अत्यंत प्रभावी आहे आणि त्याला सर्वच कलाकारांनी उत्तम न्याय दिला आहे. हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील इतिहासात माईलस्टोन चित्रपट ठरेल.’’निर्माती तेजस्विनी पंडित म्हणतात, ” चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनेकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. टिझरला मिळणारा प्रतिसाद पाहाता चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी खात्री आहे. मराठी प्रेक्षक कथानकाला विशेष प्राधान्य देतात. ‘येक नंबर’ची कथा अतिशय कमाल असून ही कथाच या चित्रपटाचा नायक आहे. अशा प्रकारचा प्रयत्न मराठीत यापूर्वी कधीही झाल्याचे मला आठवत नाही.’’नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या वरदा साजिद नाडियाडवाला म्हणतात, ” वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करण्यासाठी मी नेहमीच खूप उत्सुक असते आणि विशेषतः मराठी भाषेत. मराठी भाषेकडे साहित्याचा मोठा खजिना आहे. आणखी एका कारणासाठी मला मराठी भाषा हृदयाच्या खूप जवळची वाटते, ते म्हणजे माझे पूर्वज हे महाराष्ट्रातील आहेत. म्हणूनच मी हा चित्रपट करण्याचे ठरवले. आणि अशा चित्रपटाचा मी भाग होतेय, याचा मला अत्यानंद आहे. ”