Saturday, June 28, 2025
spot_img
Home Blog Page 15

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे बायोमेक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत यश

0

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे बायोमेक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : कृष्णा विश्व विद्यालय, कराड येथे झालेल्या “बायोमेक इन इंडिया – २” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चच्या पीएचडी विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यावेळी पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये सोहेल बाबूलाल शेख यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या परिषदेमध्ये ३७ संस्था आणि ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध विषयावर स्पर्धा, सादरीकरण व संबंधित विषयांवर शास्त्रज्ञांच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सोहेल बाबूलाल शेख यांनी ‘युज ऑफ ए.आय. अँड रोबोटिक्स इन लाइफ सायन्स’ या पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर प्रणोती अनिल कांबळे यांनी मॉडेल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सुस्मिता सतीश पाटील यांनी ‘युज ऑफ ए.आय. अँड रोबोटिक्स इन लाइफ सायन्स’ आणि राधिका बाबासाहेब जाधव यांनी ‘ईन्टरप्रिनरशिप इन लाइफ सायन्स’ विषयावरील पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. सर्व विद्यार्थी हे मेडिकल बायोटेकनोलोंगी व स्टेम सेल आणि रिजनरेटिव मेडिसीन विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहेत. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, विभाग प्रमुख डॉ. मेघनाद जोशी, रिसर्च गाईड डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.

श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण – सैनिक गिरगाव सरपंच महादेव कांबळे यांचे प्रतिपादन

0

श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण – सैनिक गिरगाव सरपंच महादेव कांबळे यांचे प्रतिपादन

डी. वाय. पाटील अभियांत्रीकी एनएसएसचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीची भावना व सेवाभाव वृत्तीची शिकवण प्राप्त होते. या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्यही घडत असल्याचे प्रतिपादन सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी व्यक्त केले. डी. वाय. पाटील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने सैनिक गिरगाव येथे आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी उपसरपंच शुभांगी कोंडेकर, शाळा समिती अध्यक्ष विशाल जाधव, विद्या मंदिर गिरगाव च्या मुख्याध्यापिका कविता पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी प्रा. योगेश चौगुले, डॉ. गणेश पाटील, इंद्रजीत जाधव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. राहुल पाटील म्हणाले, या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो. आपण समाजाचे देणे लागतो हो भावना नेहमी ठेवावी. एनएसएसच्या माध्यमातून समाजाची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा. युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास या ब्रीदवाक्याखाली हे श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरामध्ये शिबिरार्थीनी योगासने, श्रमदान, बौद्धिक सत्र, आरोग्य शिबिर, डेंगू मलेरिया जनजागृती, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पाणी तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती केली.

विद्यामंदिर गिरगाव सीसीटीव्ही कॅमेरा भेट

विद्यामंदिर गिरगाव या शाळेला डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कडून दोन सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम भेट देण्यात आल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आपल्या आपल्या वाढदिवसाला एनएसएस विभागाला एक पुस्तक भेट देतात. बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते एमपीएससी यूपीएससीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी पुस्तके या उपक्रमातार्गत जमा झाली आहेत. त्यातील बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतील अशी 200 हून अधिक पुस्तके विद्या मंदिर गिरगाव यांना भेट देण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी

0

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या ४९ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ४९ विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली.डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी. एस. सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना करून दिली जाते. देशाच्या विविध शहरांमध्ये पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या ४९ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
यामध्ये गोवा, मुंबई , पुणे, कोल्हापूर, बेळगावमधील कॉनराड, डब्लू, सयाजी हॉटेल, हिल्टन गार्डेन, द वेस्टीन, द ललित, मुझा हॉस्पिटॅलिटी, फोर सिझन्स, या हॉटेल्समध्ये निवड झाली आहे. सदरचे प्रशिक्षण हे चार महिन्याकरिता असून या काळात विद्यार्थ्यांना हॉटेल्स मधील सर्व विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर , ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर सुरज यादव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

ज्ञानप्रबोधिनी अंध शाळेतील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन

0

ज्ञानप्रबोधिनी अंध शाळेतील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आज आयोजन

कोल्हापूर/,प्रतिनिधी : स्नेहलता, विद्या, सोनाली आणि धनश्री नाझरे अश्या चार महिला सिंगर्स मिळून ज्ञानप्रबोधिनी अंध शाळेतील मुलांसाठी काही तरी करण्याच्या सामाजिक विचारांनी एकत्र येऊन या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी ( blutooth device+ pendrive) यासाठी निधी गोळा करत आहेत.
यासाठी या चार महिलांनी चिमुकल्यांच्या मदतीसाठी तुम्ही उद्या १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब कोल्हापूर येथे सुमधुर हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा निधी दिला जाणार आहे.तरी य कार्यक्रमासाठी रसिकांनी आणि कोल्हापूरकरांनी येऊन भरघोस प्रतिसाद आणि निधी द्यावा ही अशी अपेक्षा या महिलांनी केली आहे. यासाठी संपर्क सोनाली रायकर
7304906363 यांच्याशी संपर्क साधण्याचा आहे.

कोल्हापुरात उद्या रविवारी पाच गुरु पादुकांचा दर्शन महासोहळा

0

कोल्हापुरात उद्या रविवारी पाच गुरु पादुकांचा दर्शन महासोहळा

श्री दत्त याग यज्ञ, पादुका दर्शन, सामुदायिक नामस्मरण, महाआरती, भक्तीगीते, रक्तदान शिबीर आदींचा समावेश

कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेच्यावतीने आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली दहा वर्षे कोल्हापुरातून प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्त जयंतीला कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट पर्यत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने दत्त संप्रदायातील पाच महान संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव आणि नामस्मरण महासोहळा कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, शेगावचे श्री गजानन महाराज, धनकवडीचे श्री शंकरबाबा महाराज आणि कोल्हापूरचे श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज या पाच गुरुंच्या पादुकांचा समावेश आहे.

रविवारी दुपारी ३.०० वाजता या पादुका कोल्हापुरातील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या मठात येतील. तिथून वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदुगांच्या गजरात भव्य दिंडीने पादुका पंचगंगा नदी काठावर भाविकांना दर्शनासाठी मार्गस्थ होतील. पादुका दर्शनासाठी नदी तीरावर भव्य सेट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी दुपारी ३.०० ते रात्री ९.०० पर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.

परमपूज्य श्री गणावधूत महाराज यांच्या दिव्य सानिध्यात या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, श्री क्षेत्र पैजारवाडीचे ओम चैतन्य गुरु माऊली, स्वामी भक्त मिलिंद धोंड, उद्योजक नितीन वाडीकर, कोल्हापूर महानगर पालिकेच्या माजी परिवहन सभापती सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे, पदयात्रेचे मार्गदर्शक, प्रवचनकार प्रा. कुलदीप साळोखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

गुरु सोहळ्यात दानाला जास्त महत्त्व आहे असे अनेक ग्रंथांतून सांगितले आहे. त्या अनुषंगाने
आयोजकांनी दुपारी ३ ते रात्री ७ या वेळेत कार्यक्रम स्थळी भाविकांना गुरु पादुकांच्या साक्षीने रक्तदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. सीपीआर रक्त पेढीच्यावतीने गरजू आणि गरीब लोकांना या सेवेचा लाभ होणार आहे. तसेच दुपारी २.३०, वाजता श्री दत्त याग यज्ञास प्रारंभ होऊन दु. ४.०० वाजता श्रीराम स्तोत्र पठण, सायंकाळी ४.३० वाजता कोल्हापूरातील प्रथितयश कलाकार, सुप्रसिद्ध गायक रणजीत बुगले यांचा
“भक्तीगंध” हा अभंग-भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. सायं. ५.३० वाजता पंचगंगा नदीची आणि सर्व संतांची महाआरती होईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री साई बाबा, श्री गजानन महाराज, श्री शंकर महाराज आणि श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा “सामुदायिक नामस्मरण सोहळा” संपन्न होईल. सायं. ७.०० वाजता गुरु पादुकांना शंखध्वनीने मानवंदना देऊन भव्य आतषबाजी करण्यात येणार आहे. त्यानंतर कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेतील सहा भक्तांना “स्वामी रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. रात्री सव्वा सात वाजता महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल.
या संपूर्ण सोहळ्याचे निवेदन स्वामी भक्त, प्रवचनकार श्री ओंकार नवलिहाळकर करणार आहेत.
एकाच वेळी, एकाच ठिकाणी पाच गुरुंच्या पादुका येत असल्याने कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, या अनुषंगाने चोख व्यवस्था आयोजकांच्यावतीने करण्यात येणार आहे. पादुकांसाठी दर्शन रांग, भव्य स्टेज उभारण्यात आले आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचे दर्शन घेऊन नामस्मरणात दंग होऊन जावे, असे आवाहन कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, अध्यक्ष अमोल कोरे, स्वामी भक्त संजय हसबे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला उपरोक्त आयोजकांसोबत प्रा. कुलदीप साळुंखे, श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिरचे विश्वस्त फत्तेसिंह राजमाने, रमेश चावरे,
सुभाष उमाणे-पाटील, नारायण यादव, मनोज माने, वेणूताई सुतार, कुलदीप जाधव, अजय हांडे, केदार रसाळ, रमेश माने, चेतन घोरपडे आणि सर्व स्वामी सेवक उपस्थित होते.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते ‘स ला ते स ला ना ते’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

0

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते ‘स ला ते स ला ना ते’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

७ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर/प्रतिनिधी : कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे
स ला ते स ला ना ते हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे लाँच करण्यात आला असून दमदार स्टारकास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीचे कुतूहल आता आणखी वाढवले आहे.
अतिशय बडबड करणारा, गोडबोलू तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते. या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोहचतात. हा तरुण विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो. पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पत्रकारिता, पर्यावरणाचे प्रश्न, विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत. पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते. त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो. अशाच एका जुगाडात तो कसा अडकत जातो आणि त्याच्यावर काय आपत्ती ओढवते, असं या चित्रपटाचं कथानक असल्याचं ट्रेलरवरून जाणवतं.
पत्रकारिता समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, व्यवस्था सुधारण्यासाठी असते. मात्र, पत्रकारितेतील अप्रवृत्ती, राजकारण यांचा संबंध ‘स ला ते स ला ना ते’ चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.अत्यंत लक्षवेधी, गुंतवून ठेवणारा हा ट्रेलर आहे. त्यामुळेच टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नागराज मंजुळे म्हणाले…..आजपर्यंत न हातळलेला विषय या चित्रपटात मांडलेला आहे. अतिशय रंजक आणि रहस्य्मय असा हा ट्रेलर झाला आहे. सगळ्याच कलाकरांचा अभिनय उत्तम झाला आहे. संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा.

स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत ‘स ला ते स ला ना ते’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. ‘स ला ते स ला ना ते’ हा चित्रपट विविध महोत्सवांमध्येही दाखवला गेला आहे. अभिनेता उपेंद्र लिमये, छाया कदम यांच्यासह रिचा अग्निहोत्री, साईंकित कामत, पद्मनाभ बिंड, मंगल केंकरे, वंदना वाकनीस, सुदेश म्हशीलकर, रमेश चांदणे, सिद्धीरुपा करमरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लाटून फिल्म्स आणि पीव्हीआर आयनॉक्स हे या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.

पीएनबी गृह कर्ज प्रदर्शन आणि सूर्य घर कर्ज प्रदर्शन -२०२५ ला सुरुवात उद्यापर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनास ग्राहकांना भेट देण्याचे आवाहन

0

पीएनबी गृह कर्ज प्रदर्शन आणि सूर्य घर कर्ज प्रदर्शन -२०२५ ला सुरुवात उद्यापर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनास ग्राहकांना भेट देण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : पंजाब नॅशनल बँकेने ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी रेसिडेन्सी क्लब, न्यू पॅलेस पोस्ट ऑफिस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आणि ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएनबी लोन पॉइंट, गुलमोहर रेसिडेन्सी, ग्राउंड फ्लोअर, ई वॉर्ड, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे गृह कर्ज प्रदर्शन आणि सूर्य घर प्रदर्शन आयोजित केले आहे. स्पर्धात्मक दरात गृह कर्ज देण्यासाठी बँकेने प्रसिद्ध बिल्डर्स आणि इस्टेट डेव्हलपर्ससोबत भागीदारी केली आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेले बिल्डर्स/इस्टेट डेव्हलपर्स सूरज इस्टेट विकासक,राधा कृष्ण डेव्हलपर्स,महाभारत कन्स्ट्रक्शन्स,
दत्ता डेव्हलपर्स आणि गगनगिरी डेव्हलपर्स, देशपांडे इनका
ही भागीदारी ०७ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील न्यू पॅलेसजवळील रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात औपचारिकपणे सुरू करण्यात आली, ज्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगदीश जगताप (कोल्हापूरचे आयकर उपसंचालक)सर्कल प्रमुखः श्री रंजन सिंग मुख्य कार्यालयः श्री मुकुल वर्मा, एजीएम एचओ आदींच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री. जगदीश जगताप यांनी या प्रदर्शनाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या पंजाब नॅशनल बँकेच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी असे प्रदर्शन नियमितपणे आयोजित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हटले, “आपल्या तरुणांना केवळ ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी घरांसारख्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. असे करून, आपण त्यांचे सुरक्षित आर्थिक भविष्य घडवू शकतो.आमच्या सर्कल प्रमुख श्री रंजन सिंग यांनी यावेळी”आमचे ध्येय आमच्या ग्राहकांना त्यांच्या विकसित गरजा पूर्ण करणारे नाविन्यपूर्ण आर्थिक उपाय प्रदान करणे आहे”. उच्च दर्जाचे प्रकल्प आणि ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्धतेसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध बिल्डर्स आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सशी आमचे संबंध निश्चितच आम्हाला हे ध्येय साध्य करण्यास मदत करतील.. त्यांनी बँकांच्या विविध योजना आणि उत्पादनांवर अधिक तपशीलवार माहिती दिली. त्यांनी डिजी होम लोनवर विशेष भर दिला. ही पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे जिथे लोक आमच्या पीएनबी वेबसाइटद्वारे गृहकर्ज घेऊ शकतात. एंड-टू-एंड-डिजिटल प्रक्रिया, त्वरित पात्रता तपासणी, रिअल टाइम लाओन ट्रॅकिंग, ऑटोमेटेड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इलेक्ट्रॉनिक मंजुरी पत्र, ऑटो डेबिट सुविधा आणि बरेच काही या प्रमुख वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
शेवटी, त्यांनी लोकांना व ग्राहकांना या एक्स्पोला भेट देण्यासाठी आणि बँकेने प्रदान केलेल्या विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
काही ग्राहकांनी कार्यक्रमाला संबोधित केले आणि बैंक सेवांबद्दलचे त्यांचे अनुभव उपस्थितांसोबत व्यक्त केले. इचलकरंजी शाखेतील आमच्या एका ग्राहकाने त्यांचे गृहकर्ज एका दिवसात मंजूर झाल्याचे संगताना भारावून गेले.

याचवेळी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी कोल्हापूरमधील ताराबाई पार्क येथील न्यू पॅलेस पोस्ट ऑफिसजवळील रेसिडेन्सी क्लब येथे एक एमएसएमई एक्स्पो आयोजित करत आहोत. सर्व एमएसएमई उद्योजकांना या एक्स्पोला उपस्थित राहण्यासाठी आणि नवीन संधींचा शोध घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.

ऑफरचे प्रमुख मुद्दे असे आहेत

गृहकर्ज

कर्जाची रक्कमः कमाल ५ कोटी रुपयांपर्यंत

आकर्षक व्याजदरः पीएनबी ८.४०% प्रति वर्ष आकर्षक व्याजदराने गृहकर्ज देत आहे ज्याची सुरुवात ७६२/लाख पासून होते ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे स्वप्नातील घर घेणे सोपे होते.

३१.०३.२०२५ पर्यंत आगाऊ/प्रक्रिया शुल्क आणि कागदपत्र शुल्क पूर्णपणे माफ.

३९.०३.२०२५ पर्यंत गृहकर्ज घेतल्यास कायदेशीर आणि मूल्यांकन शुल्कात ५०% सूट

वैयक्तिक गरजांसाठी गृहकर्ज घेणाऱ्यांना २५.०० लाख रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट/१ कोटी रुपयांपर्यंत मुदत कर्ज.

लवचिक परतफेड पर्यायः ग्राहक (कालावधी) पासून त्यांचे कर्ज परतफेड करण्याचा पर्याय निवडू शकतात

कोणतेही प्रीपेमेंट शुल्क नाही

पेपरलेस असेसमेंटसह सहज मंजुरीः जागेवरच तत्वतः मंजुरी

कुठूनही अर्ज करण्याचा सोपा मार्ग

. बैंकने मंजूर केलेल्या प्रकल्पांसाठी ७२ तासांच्या आत गृहकर्ज मंजूर होइल.

पीएनबी सूर्य घर कर्ज

• पीएनबी सूर्य घर योजनेअंतर्गत छत्तावरील जमिनीवर बसवलेल्या सौर पॅनेलसाठी वित्तपुरवठा.

• आकर्षक व्याजदर: ७% पासून सुरू.

हिरोची नवीन १२५ सी. सी डेस्टिनी बाजारात दाखल ग्राहकांनी एसएम घाटगे आणि युनिक शोरूमला भेट देण्याचे आवाहन

0

हिरोची नवीन १२५ सी. सी डेस्टिनी बाजारात दाखल ग्राहकांनी एसएम घाटगे आणि युनिक शोरूमला भेट देण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगातील नं १ टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांचे तर्फे नवीन १२५ सी. सी. डेस्टिनी बाजारात आणली आहे. या गाडीचे अनावरण समारंभ निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. श्री रविंद्र भागवत यांचे हस्ते कोल्हापूर इंजिनियरिंग असोसियेशन शेठ रामभाई सामाणी हॉल येथे पार पडले.ही गाडी एसएमजी घाटगे आणि युनिक शोरुम येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
या गाडीचे वैशिष्ट्ये म्हणजे १२५ सी सीचे पॉवरफुल्ल इंजिन बरोबर चांगला पिक अप व सर्वोत्तम मायलेज आहे. तसेच सदरची गाडी VX ,ZX व ZX प्लस या तीन व्हेरिएंट मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि पूर्ण मेटलमध्ये आहे.
सादर गाडीचे इंजिन १२५ सी सी असून ते ७००० rpm व १०.४ rpm देते. हिरोच्या नाविन्यपूर्ण आयडियल स्टॉप स्टार्ट तंत्रज्ञानामुळे सर्वोत्तम ५९ कि मी चे मायलेज मिळते सर्व कुटुंबासाठी डिझाईन केलेली हि स्कूटर असून प्रशस्त लेग रूम लांब कम्फर्टेबल सीट, LED प्रोजेक्ट हेड लॅम्प ,डायमंड कट ऑलोय व्हील्स बरोबर प्रीमियम इंटिरिअर्सचा समावेश आहे.आताची ही आठवी गाडी असून ही गाडी ५९ अँव्हरेज देते आणि गाडीचे वजन ११५ किलो आहे.ही गाडी एकूण ब्लॅक,रेड,ब्ल्यू,व्हाईट आणि पिंकिज अशा पाच कलर मध्ये आहे.
तरी ग्राहकांनी
तरी आजच्या या अनावरण सोहळ्याप्रसंगी एस एम घाटगे हिरोचे पार्टनर मा.श्री.मिलिंद घाटगे व युनिक हिरोचे एम डी मा.श्री.विशाल चोरडीया यांनी अधिक माहिती व टेस्ट राईडसाठी एसएमजी घाटगे आणि युनिक शोरूमला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.या गाडी विषयी बोलताना एस एम घाटगे हिरोचे पार्टनर मा.श्री.मिलिंद घाटगे आणि युनिक शोरुमचे जनरल मॅनेजर विजय जाधव व सचिन कदम यांनी बोलताना हिरो कंपनीने नव्या ढंगातील आठवी स्कूटर गाडी बाजारात आणली असून ही गाडी कोल्हापूरकरांच्या सेवेत दाखल झाली असून ग्राहकांनी आमच्या शोरूमला भेट देऊन ही गाडी पहावी असे आवाहन केले आहे.अनावर प्रसंगी सचिन कदम,नितीन गायकवाड,रोप शेख आणि या दोन्ही शोरूमचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने शल्य चिकित्सकांच्या मॅसीकॉन या वैद्यकीय परिषदेचे आयोजन

0

कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने शल्य चिकित्सकांच्या मॅसीकॉन या वैद्यकीय परिषदेचे आयोजन

कोल्हापूर /प्रतिनिधी: असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मॅसिकॉन शल्यविशारद परिषद दर वर्षी भरवली जाते. या वर्षी कोल्हापूर सर्जिकल सोसायटीने मॅसिकॉन ही परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळवला आहे.
सदर परिषद ही ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी येथे संपन्न होणार आहे. कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला आठ वेळा महाराष्ट्र राज्य आणि दोन वेळा देशपातळीवर Best Society म्हणून बहुमान मिळाला आहे.

दिनांक ६ फेब्रुवारी रोजी निरंतर अभ्यास (CME) सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे. या दिवशी विविध विषयावरील उदा. थायरॉईड, मधुमेह, मुतखडा व नवनवीन शोध या विषयावर सर्जन बोलणार आहेत. त्यामध्ये डॉ. मिलीद रूके – मधुमेह, थायरॉईड वर डॉ. निता बायर, तसेच विविध विषयावर इतर सर्जन बोलणार आहेत. त्याचे दिवशी १२ वाजता निरंतर अभ्यास (CME) चे उद्घाटन होणार आहे. उ‌द्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे व डॉ. डी. वाय. पाटीलचे कुलगुरू, डीन आणि आर, सी.एस.एम. चे डीन यांच्या उपस्थितीत होणार आहे. दिनांक ७ फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत.यासाठी अंतराष्ट्रीय स्थरावरचे डॉ. मायदेव तसेच अंतरंग हॉस्पिटलचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी इंडोस्कोपीक सर्जरी, दुर्बिणीव्दारे हर्णिया, जठराच्या, पित्ताशयाच्या व स्थुलपणवरच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात येतील. त्याचबरोवर भगेंद्र, मुळव्याध ह्या शस्त्रक्रिया देखील दाखवण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. रॉय पाटणकर झेन हॉस्पिटल, मुबई, डॉ. पल्लीवेणू, जेम हॉस्पिटल कोइंबतूर, हैद्राबाद वरून डॉ. इस्माईल, कोल्हापूर कॅन्सर सेंटरवरून डॉ. सुरज पवार हे रॉबोटीक सर्जरीचे प्रात्यक्षिक तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सदस्य विविध शस्त्रक्रिया दाखवणार आहेत.

दिनांक ७ फेब्रुवारी रोजी विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवून त्यातील नवनवीन पध्दती सांगण्यात येणार आहेत.या परिषदेचे उ‌द्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. प्रविण सुर्यवंशी यांच्या हस्ते व डॉ. संतोष अब्राहम, डॉ. संजय पाटील कुलपती डॉ. डी. वाय. पाटील तसेच महाराष्ट्र राज्य शल्यचिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अजय पुणपाळे, सचिव डॉ. सचिन नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती परिषदेचे सचिव डॉ. आनंद कामत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने डॉ. प्रविण सुर्यवंशी,डॉ. सिध्देश, मैसूर, डॉ. भवरलाल यादव, जयपूर, डॉ. अभय दळवी यांचे चर्चासत्र त्याच दिवशी होणार असून विविध विषया वरील चर्चासत्रे जसे की अन्ननलिकेचा कॅन्सर या विषयी डॉ. श्रीजेयन, केरळ, डॉ. राजनगरकर नाशीक वरून सहभाग घेणार आहेत. रक्तवाहीणीच्या आजारावर डॉ. कामेरकर, हर्णिया विषयी डॉ. राहूल मंदार मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्तानचे कॅन्सर व Accidental Trauma, मुळव्याध, भगेद्र या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याच दिवशी मानाचे जी.एम. फडतारे डॉ. सतिश धारप व्याख्यान देणार आहेत.

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी विविध विषयावरील व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डॉ. पार्थसारथी, डॉ. रेघे, डॉ. पोरवाल डॉ. पल्लीवेलू हे सहभागी होणार आहेत. तसेच विविध शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत.

दि. ९ फेब्रुवारी दुपारी ११ वाजता दुसरे मानाचे डॉ. घारपूरे व्याख्यान, कोल्हापूरचे कॅन्सर सर्जन डॉ. सुरज पवार देणार आहेत. यानंतर विविध विषयावरील बेस्ट पेपर पी.जी. डॉक्टर्स प्रस्तुत करणार आहेत.

सदर परिषदेसाठी परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक पाटील, परिषदेचे सचिव डॉ. आनंद कामत, सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. वैभव मुधाळे,परिषदेचे संयोजक डॉ. प्रताप वरूटे, सह सचिव डॉ. बसवराज कडलगे, डॉ. कौस्तुभ कुलकर्णी, डॉ. सौरभ गांधी, डॉ. मानसिंग अडनाईक, खजानीस डॉ. मधूर जोशी, डॉ. सागर कुरूणकर, डॉ. देवेंद्र होशिंग , डॉ अनिकेत पाटील, सर्व आयोजन समिती सदस्य उपस्थित होते.

काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा दक्षिण काशी म्हणून कायापालट करू – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

0

काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा दक्षिण काशी म्हणून कायापालट करू – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

सहपालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर :सर्वप्रथम घेतले देवीचे दर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : “उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने मला ही जबाबदारी मिळाली असून, नगरविकासासह कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित विविध खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असून कोल्हापूर आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे,” असे कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.
सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मिसाळ यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे तसेच मंदीरातील मातृलिंग व श्री दत्तांचे दर्शन घेतले. त्यानंतर नर्सरी बागेतील समाधी स्थळी जाऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.
यानंतर भाजप कार्यालयात त्यांच्या सहपालकमंत्री म्हणून निवडीसाठी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या १०० दिवसांच्या कामाच्या नियोजनात कोल्हापूरच्या प्रश्नांचा समावेश केला आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य दिले जाईल आणि ती लवकर मार्गी लागतील.”
“कोल्हापूरातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सर्वानुमते अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवल्यास मंजुरी मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही,” अशी ग्वाही मिसाळ यांनी दिली.”भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. त्या त्या भागात सक्षम कार्यकर्ते असतील, तर बाहेरून किंवा इतर पक्षातून नेते मागवण्याची गरज भासणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“कोल्हापूरच्या विकासासाठी प्रत्येक महिन्यातून एक दिवस मी खास राखून ठेवणार आहे. तसेच, कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांसह माझ्याकडे यावे,” असे आवाहन त्यांनी केले. आम्ही हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू , असे त्या म्हणाल्या.भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये सह पालकमंत्री म्हणून आपली झालेली नियुक्ती बद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्त्यांना शासकीय कमिट्या, महामंडळ यामध्ये न्याय मिळावा अशी मागणी याप्रसंगी केली. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी खंडपीठ आयटी पार्क जोतिबा तीर्थक्षेत्र आराखडा असे विषय प्रामुख्याने लवकरात लवकर पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली
संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी भाजपा सदस्य नोंदणीचा आढावा घेत १९ फेब्रुवारी पर्यंत मिळालेल्या सदस्य नोंदणीच्या मुदत वाढीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त क्षमतेने ही नोंदणी व जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राहूल चिकोडे, अशोक देसाई, डॉ राजवर्धन, डॉ स्वाती पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.