Saturday, June 28, 2025
spot_img
Home Blog Page 12

सिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश आबीटकर

0

सिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश आबीटकर

अदृश्य काडर्सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मुळेच कणेरी मठाचा कायापालट : पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे उद्गार

आरोग्य मंत्री आबीटकर यांच्या हस्ते न्युरो मायक्रोस्कोपचे लोकार्पण

कोल्हापूर/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथील न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात करून आज पर्यंत अनेक विक्रम नोंदवले आहेत.अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे. न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय श्री प्रकाशराव आबिटकर यांच्या शुभहस्ते झाले महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे हा सोहळा पार पडला.
या प्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या सकारात्मक विचारसरणीतून कणेरी मठाचा कायापालट झालेला आहे. त्यांच्या प्रेरणेने कणेरीमठ अधिकच विकसित होत चाललेला आहे. लहानपणीचा कणेरीमठ आणि आत्ताचा कणेरीमठ यामध्ये मोठे बदल झाले असून या बदलांमध्ये अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचा अधिकचा वाटा असल्याचे नमूद केले.यावेळी बोलताना मा. मंत्री आबिटकर पुढे म्हणाले, “पूर्वी मठावर शिवरात्रीला दर्शनाला आजूबाजूचे भाविक यायचे पण आता देशभरातून लाखो लोकांची पाऊले मठाकडे वळत आहेत. परमपूज्य स्वामीजींचे कार्य देशभरात विस्तारलेले आहे, याचा प्रत्यय आम्हाला वेळोवेळी येतो. अध्यात्माला सामाजिक कार्याची जोड दिल्यामुळे मठ सामाजिक कार्यासाठी अधिक ओळखला जातो. स्वामीजींच्या सारख्या कर्मयोगी संतांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले तर कोल्हापूरचे नव्हे तर राज्यभरात कार्याचा आदर्श घालून देता येईल. स्वामीजींच्या सामाजिक कार्यात आम्हाला सहभागी होऊन सेवा करण्याची ग्वाही आबिटकर यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, “ रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या मूल्यांवर गेली १५ वर्षाच्या सिद्धगिरी हॉस्पिटलची वाटचाल सुरु असून धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये मुंबई ते बेंगलोर दरम्यान सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध करून देणारे हे प्रमुख हॉस्पिटल आहे आणि आता जे ZEISS PENTERO 800 S या उपकरणाचे भारतातील पहिली स्थापना कणेरी सारख्या एका ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात होत असल्याचा आनंद आहे. या उपकरणामुळे कमी वेळात आणि सहजपणे मेंदूवरील शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे. अंदाजे साडेतीन कोटी रुपये किमतीच्या या मायक्रोस्कोप मध्ये ऑपरेटिंग सर्जन आणि त्यांचे सहाय्यक यांना एकाच वेळी मायक्रोस्कोप पाहणे शक्य होणार आहे. इतकी अत्याधुनिक प्रणाली रुग्णांना कोणत्याही अतिरिक्त शुल्क न आकारता सिद्धगिरी हॉस्पिटल येथे निरो विभागात उपलब्ध होत आहे. या प्रणाली सोबतच न्यूरो नेवीगेशन सिस्टम, न्यूरो NIM – 3, न्यूरो मॉनिटरिंग सिस्टीम CUSA DRIL आणि अत्याधुनिक न्यूरो Anastheshia मशीन यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल येथील न्यूरो शस्त्रक्रिया विभाग सुसज्ज आहे यासोबतच पूर्णवेळ न्यूरो भूलतज्ञ, न्यूरो पॅथॉलॉजिस्ट, CT, MRI स्वतंत्र न्यूरो आय सी यु या सुविधांमुळे सिद्धगिरी येथील न्यूरो विभाग राष्ट्रीय स्तरावर नावा रूपास येत आहे. या सुविधा ना नफा ना तोटा या तत्त्वावरती वाजवी दरात रुग्णांसाठी उपलब्ध आहेत तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे.आवाहन केले.
यावेळी त्यांनी मायक्रोस्कोपचा उपयोग मेंदू आणि मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया सहजपणे करणे शक्य होणार आहे अशा प्रकारच्या या मशीनमध्ये 4K – 3D कॅमेरा सिस्टीम मुळे अतिशय सुस्पष्ट दृष्टी आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार आहे अशी माहिती यावेळी दिली. यावेळी सिद्धगिरी मठावर भरविण्यात आलेल्या पशु प्रदर्शनाचे उद्घाटन नामदार प्रकाश आबीटकर यांची हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रास्ताविक विश्वस्त उदय सावंत यांनी केले. यावेळी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी,माणिक पाटील चूयेकर उपस्थित होते.यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गोकुळ दुध संघ संचालक श्री. नंदकुमार ढेगे, विवेक राव पाटील, जालंदर पाटील, शरद सावंत, राजन पाठारे, संतोष पाटील, बाळकृष्ण विचारे, डॉ.वर्षा पाटील, डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ. तनिष पाटील, डॉ. शीतल गवळी, डॉ. भाग्यश्री पालकर, विक्रम पाटील, विवेक सिद्ध, संजय पाटील, डॉ. संदीप पाटील, बापू कोंडेकर, माणिक पाटील चुयेकर, नामदेव बामणे, दिवाकर पाटील यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून आलेले हजारो भाविक उपस्थित होते.

अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल आज शिवरात्रीला होणार लोकार्पण

0

अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल आज शिवरात्रीला होणार लोकार्पण

कोल्हापूर/प्रतिनिधी : कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,न्युरोसर्जरी विभागाने अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया ग्रामीण भागात अशा जटील शस्त्रक्रिया करण्यासाठी आता अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच सिद्धगिरी हॉस्पिटल येथे दाखल झाला आहे.न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे हा सोहळा बुधवार ता. २६ रोजी सकाळी १० वा.पार पडणार आहे अशी माहिती
या मशिनरीमुळे मेंदूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेची गरज असणाऱ्या रुग्णांना लाभ होणार आहे. अशी माहिती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींजींनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
सतरा वर्षाच्या सिद्धगिरी हॉस्पिटलची वाटचाल सुरु असून धर्मादाय श्रेणीतील रुग्णालयांमध्ये मुंबई ते बेंगलोर दरम्यान सर्व सोयीसुविधा एकाच छताखाली रुग्णांना उपलब्ध करून देणारे हे प्रमुख हॉस्पिटल आहे. आता ZEISS PENTERO 800 S या अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोपची भारतातील पहिली स्थापना कणेरी सारख्या एका ग्रामीण धर्मादाय रुग्णालयात होत असल्याचा आनंद न्युरो सर्जन आणि सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी व्यक्त केला. ते म्हणाले. मायक्रोस्कोपचा उपयोग मेंदू आणि मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया सहजपणे करणे शक्य होणार आहे अशा प्रकारच्या या मशीनमध्ये 4K – 3D कॅमेरा सिस्टीम मुळे अतिशय सुस्पष्ट दृष्टी आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार आहे अशी माहिती यावेळी दिली.
यासोबतच पूर्णवेळ न्यूरो भूलतज्ञ,न्यूरो पॅथॉलॉजिस्ट,CT, MRI स्वतंत्र न्यूरो आय सी यु या सुविधांमुळे सिद्धगिरी येथील न्यूरो विभाग राष्ट्रीय स्तरावर नावारूपास येत आहे. या सुविधा ना नफा ना तोटा या तत्त्वावरती वाजवी दरात रुग्णांसाठी उपलब्ध आहेत तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन न्यूरो भूलतज्ञ डॉ.प्रकाश भरमगौडर यांनी केले.यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस डॉ. स्वप्नील वळीवडे,डॉ. निषाद साठे, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण,अमित गावडे यांच्यासह हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाशिवरात्रीसाठी प्राचीन सिद्धगिरी मठ सज्ज

0

महाशिवरात्रीसाठी प्राचीन सिद्धगिरी मठ सज्ज

कोल्हापुर/प्रतिनिधी : कोल्हापूर (करवीर) हे नाव अनेक पुराण-ग्रंथामध्ये उल्लेखित असणारे एक प्राचीन व संपन्न नगर म्हणुन विख्यात आहे. या जिल्ह्याला धार्मीक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रतिष्ठेची पार्श्वभूमी आहे. “दक्षिण काशी ” असणा-या या कोल्हापुरच्या लौकिकात भर टाकणारा योगी व सिध्दपुरुषांच्या पवित्र वास्तव्याने पुनित झालेला एक प्राचीन मठ ही या पवित्र भूमीत आहे तो म्हणजे ” श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ”!!
महाराष्ट्राच्या संतभूमीत भारतीय संस्कृती वारसा जपणारा मठ म्हणून कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिध्दगिरी मठ विख्यात आहे. श्री काडसिध्देश्वर सांप्रदायाचे मूळ स्थान म्हणुन प्रसिध्द पावलेला “श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ” हा सांप्रत कोल्हापूर शहरापासुन दक्षिणेला निसर्गरम्य परिसरात वसलेला आहे.श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठ अत्यंत पुरातन, धार्मीक,योगीक व अध्यात्मिक पीठ आहे. याची ओळख “जगद्गुरु काडसिध्देश्वर संस्थान मठ” अशी आहे. या मठाच्या जवळच कणेरी गाव आहे, म्हणूनच मठाला “कणेरी मठ” असेही म्हणतात. संशोधित व प्राप्त ऎतहासिक संदर्भानुसार “श्रीक्षेत्र सिध्दगिरी मठाला” १३५० वर्षांपेक्षा अधिक प्राचीन पंरपरा लाभली आहे. अश्या शेकडो वर्षांची पंरपरा असणा-या प्राचीन मठाचे अधिपती पुज्यश्री काडसिध्देश्वर स्वामींजींच्या आधीपत्याखाली अनेक सामाजिक उपक्रमाची जोड दिल्यामुळे मठाचा लौकिक देशभर पसरलेला आहे.
मठावर असणाऱ्या प्राचीन शिवमंदिराचा लौकिक सर्वदूर असल्यामुळे या मठावरील मंदिरात दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येणार असल्यामुळे त्यांच्या साठी पूरक असे नियोजन श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठमहासंस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक २६ ते २८ या कालावधीत प्रवचन, भजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुकुल विद्यार्थी यांचे सादरीकरण असे कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. यावेळी तिन्ही दिवस सर्वांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे भारतात पहिल्यांदा दाखल झालेल्या न्युरो मायक्रोस्कोपचा लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शिवरात्रीला होणार असून सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीने तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महासंस्थान मार्फत करण्यात आले आहे.

जिल्हा न्यायालयामध्ये ताण व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

जिल्हा न्यायालयामध्ये ताण व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य यासंदर्भात मार्गदर्शन शिबीर संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी): दि.२५.०२.२०२५ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हा न्यायालयीन कर्मचारी व जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज सभागृहात ताण व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य यासंदर्भात वैद्यकिय शिबीर घेणेत आले.
शिबीरामध्ये डॉ. गोजिरा जगताप- कारेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने न्यायाधीश, वकील वर्ग तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या सत्रामध्ये डॉ. गोजिरा जगताप- कारेकर यांनी उपस्थितांची वैयक्तिक तपासणी व मार्गदर्शन केले. तसचे दुस-या सत्राामध्ये सामुहीक मार्गदर्शन व अत्यंत उपयुक्त अशा हेल्थ टिप्स दिल्या. कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश क्र.२ श्री. डी.व्ही. कश्यप, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. वाय. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री. एस. एस. इंगळे, सर्व जिल्हा न्यायाधीश, सर्व वरीष्ठ स्तर न्यायाधीश, सर्व कनिष्ठ स्तर न्यायाधीश, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सर्जेराव खोत व किमीनल बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. डी. आर. कवाळे, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. श्रीकांत संकपाळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव श्री. एस. एस. इंगळे व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सचिन हुपरीकर यांनी केले.

गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी सर्वपक्षीय सोहळा विविध उपक्रमाने साजरा करणार आमदार सतेज पाटील

0

गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा अमृतमहोत्सवी सर्वपक्षीय सोहळा विविध उपक्रमाने साजरा करणार आमदार सतेज पाटील

सर्वपक्षीय पदाधिकारी यांचा बैठकीत निर्णय

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करण्याबाबत आज सर्वपक्षीय पदाधिकाऱ्याची बैठक गोकुळ च्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये पार पडली.यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले कि, विश्वास पाटील (आबाजी) यांनी त्यांच्या आयुष्यातील ५० वर्षात शिरोली दुमालाचे डे. सरपंच ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन असा या प्रवासात सहकार, समाजकारण व राजकारण यामध्ये अमुल्य योगदान दिले आहे. सर्व सामान्य लोकांशी नाळ जोडलेल्या तसेच गेली ४ दशके गोकुळ दूध संघ, कुंभी कासारी साखर कारखाना कुडित्रे, रयत सेवा कृषी उद्योग सहकारी संघ, कोल्हापूर या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करवीर तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाची गंगा गावोगावी पोचविण्याचे काम केले असून अशा अजातशत्रू व्यक्तिमत्वाचा ७५ वा वाढदिवस एप्रिल महिन्यात होत असून हा भव्य असा सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव सोहळा घेऊ असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले असून जिल्यात तसेच करवीर तालुक्यात सहकारी दूध संस्थांचे जाळे विणण्याचे भरीव काम विश्वास पाटील (आबाजी) यांनी केले आहे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमिताने विविध सामाजिक उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करून असे मनोगत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये विश्वास पाटील (आबाजी) अमृतमहोत्सवी गौरव समिती मान.अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील तंज्ञ मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रम, दुध उत्पादकांना प्रोत्साहनसाठी जास्तीत जास्त दूध देणारी गाय व म्हैस या संबंधीची ‘आबाजीश्री’ स्पर्धा, युवकांसाठी योग शिबिरे, कुस्ती स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे ठरले तसेच मान. विश्वास पाटील यांच्या जीवनावर आधारित गौरव अंक गौरव समिती मार्फत स्वनिधीतून प्रकाशित करून दि.१३ एप्रिल २०२५ इ.रोजी माननीय विश्वास पाटील (आबाजी) यांच्या जन्म गावी शिरोली दु. ता.करवीर येथे महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मान्यवर यांच्या हस्ते भव्य असा सर्वपक्षीय अमृतमहोत्सवी गौरव सोहळा घेण्याचे सर्वानुमते ठरले.
याबैठकी वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील साहेब (सडोलीकर), केरबा भाऊ पाटील (कोथळी) बाबासाहेब देवकर (गाडेगोंडवाडी), श्रीमती उदयानीदेवी साळोखे (वाशी), सुनिल पाटील (वडणगे) एस.डी.जरग (महे), अमर पाटील (शिंगणापूर), युवराज गवळी (पाचगाव) यांनी मनोगते व सूचना व्यक्त केली.या बैठकीचे स्वागत गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, तर आभार शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.यावेळी उपस्थित आमदार सतेज पाटील गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, कर्णसिंह गायकवाड, किसन चौगले, अभिजित तायशेटे, नंदकुमार ढेंगे, रणजितसिंह पाटील, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, उदयसिंह पाटील (कौलवकर), यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, शेकापचे क्रांती पाटील, गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे, एम.आर.पाटील कुरुकलीकर, सदाशिव चरापले, कृष्णात पाटील राशिवडेकर, कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक किशोर पाटील, बाजीराव शेलार, विलास पाटील, शिवसेना (उभाठा) गटाचे बाजीराव पाटील शियेकर, शशिकांत खोत (कणेरीवाडी), प्रदीप झांबरे (गडमुडशिंगी), सागर पाटील (निगवे खा.), सुयोग वाडकर (खेबवडे), शंकर पाटील (गोकुळ शिरगाव), मोहन सालपे (क.बावडा), अर्जुन इंगळे (कणेरी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुकर जांभळे (बालिंगा), शेतकरी संघटनेचे दादूमामा कामीरे, बुद्धिराज पाटील (महे), भगवान लोंढे (सांगरूळ), शेतकरी संघ संचालक जी.डी.पाटील (पाडळी), कृष्णात चाबूक, दिलीप खाडे (सांगरूळ), माजी जि.प.सदस्य पांडुरंग काशीद (यवलूज), एकनाथ पाटील (इस्पुर्ली), करवीर माजी प.स.सदस्य दत्तात्रय मुळीक, गोकुळ दूध संघाचे संचालक, भोगावती साखर कारखाना संचालक, कुंभी कासारी कारखाना संचालक, कोल्हापूर कृषी उत्पादन बाजार समितीचे सदस्य, रयत सेवा कृषी उद्योग संघाचे सदस्य, आजी माजी जि.प. व प.स.पदाधिकारी तसेच विश्वास पाटील यांच्या वर प्रेम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डी. वाय. पाटील फार्मसीच्या* सिमरन, अपेक्षाचे यश

0

डी. वाय. पाटील फार्मसीच्या* सिमरन, अपेक्षाचे यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या कु. सिमरन जमीर पाटवेगार आणि अपेक्षा चित्रे यांनी दोन वेगवेगळ्या स्पर्धामध्ये यश मिळवले आहे. उत्कृष्ट संशोधन कार्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संमेलन ” पायोनिअर २०२५” मध्ये सिमरनने ‘सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार’ पटकावला असून अपेक्षाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोल्हापूर येथे आयोजित “पायोनिअर २०२५” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभरातील १५० हून संशोधक आणि विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या. कु. सिमरन जमीर पाटवेगार हीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग फॉर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी ऑफ अस्पिरिन’ हा प्रकल्प सादर केला. या अभिनव प्रकल्पाच्या सादरीकरणातून सिमरनने परीक्षकांची मने जिंकली आणि ‘सर्वोत्कृष्ट प्रकल्प पुरस्कार’ प्राप्त केला.
दरम्यान, महाविद्यालयाच्या प्रतिभावान आणि प्रभावी वक्तृत्व असलेल्या कु. अपेक्षा चित्रे हिने १७ व्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. गौरिशंकर एज्युकेशन सोसायटीचे सातारा कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा आणि सातारा कॉलेज ऑफ फार्मसी माजी विद्यार्थी संघटना यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “सोशल मीडिया आणि आजची युवा पिढी” या विषयावर प्रभावी भाषण सादर करून, कु. अपेक्षा चित्रे हिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण शैलीने, सखोल विचारांने आणि उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. या यशाबद्दल सिमरन आणि अपेक्षा यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” अंतर्गत उद्योग सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक, देविदास गोरे ग्लोबल कम्युनिटी केअर इन्स्पायर सेफ्टी फाउंडेशन, मुंबई हे होते. यावेळी संजय घोडावत इइन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. अजय बी. कोंगे, कॉम्प्युटर विभागाचे विभाग प्रमुख, प्रा. सागर चव्हाण, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग प्रमुख, प्राध्यापिका रईसा मुल्ला, इलेक्ट्रिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. नितीन पाटील, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. योगेश पोवार सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी उद्योग सुरक्षा अनुरोग्य या कार्यक्रमाचे आयोजनाचे उद्देश आणि महत्त्व सांगून प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत केले. संचालक देविदास गोरे यांनी उद्योग सुरक्षा पद्धती आरोग्य मानके आणि विविध उद्योगांमध्ये सुरक्षित कार्य करण्याच्या पद्धती नियमावली सुरक्षित वातावरण व त्याचे महत्त्व सांगून इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवनात सुरक्षा आणि आरोग्याची घ्यावयाची काळजी त्यावर उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये सुरू असलेला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त “ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी” या कोर्सची प्रवेश प्रक्रिया, कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कोर्समध्ये असणाऱ्या विविध अभ्यासक्रमाचे नियोजन, कोर्सेसची उपयुक्तता याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित भोसले यांनी केले.संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शना खाली उद्योग सुरक्षा आणि आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे १ मार्च २०२५ रोजी ‘मिलेट (तृणधान्य) व फळ महोत्सव’ २०२५ चे आयोजन

0

व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे १ मार्च २०२५ रोजी ‘मिलेट (तृणधान्य) व फळ महोत्सव’ २०२५ चे आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत कोल्हापूर शहरात दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पने अंतर्गत विविध फळ महोत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतक-यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवांचा प्रमुख उद्देश असतो.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून जाहिर केलेले होते. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांचे वतीने दि.०१ ते ०५ मार्च, २०२५ या कालावधीमध्ये ‘मिलेट व फळ महोत्सव-२०२५’ चे ‘व्हो. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी, कोल्हापूर’ येथे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मिलेट व फळ महोत्सवाचे उद्धघाटन शनिवार दि. ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. मा. श्री. अमोल येडगे सो. (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. श्री. सुनिल फुलारी सो. (भा.पो.से) विशेष पोलिस महानिरिक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, मा. के. मंजुलक्ष्मी (भा.प्र.से.) आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर, मा. श्री. एस. कार्तिकेन सो. (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर, मा. श्री. महेंद्र पंडीत सो. (भा.पो.से) पोलीस अधिक्षक, कोल्हापूर, मा. श्री. संजय कदम, कार्यकारी संचालक, कृषि पणन मंडळ, मा. श्री. विनायक कोकरे, सरव्यवस्थापक, कृषि पणन मंडळ, मा.श्री. महेश कदम. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, मा. श्री. निळकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, मा. श्री. उमेश पाटील विभागीय कृषि सहसंचालक, मा. श्री. जालिंदर पांगारे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, तृणधान्य प्रक्रियेमध्ये काम करणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या व सांगली जिल्ह्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये ४० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून, ग्राहकांना अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासुन तयार करण्यात आलेला ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपुर्ण अशी असंख्य प्रकारची उत्पादने व द्राक्षे थेट उत्पादकांकडुन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मिलेट महोत्सवामध्ये दि. ०१ ते ०५ मार्च २०२५ या कालावधीत मिलेट उत्पादन, मुल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्व या विषयी नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने, मिलेट आधारित महिलांसाठी पाककृति स्पर्धा, खरेदीदार-विक्रेते संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमास करवीर वासियांनी उपस्थित राहुन मिलेट व फळ महोत्सवास भेट देण्याचे आवाहन कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे

*पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी तीसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी*

0

*पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी तीसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी*

*प्रदर्शनाच्या तीन दिवसात १५ कोटीच्या आसपास उलाढाल*

*३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा, बारा किलो वजनाचा दीड वर्षाचा टर्की कोंबडा*

*हरियाणातील विधायक नावाचा रेडा,चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण आणि आप्पाचीवाडी येथील पाच वर्षाचा शंभू बैल (वळू)*साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण*

*भीमा कृषी पशू प्रदर्शनाच आज शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*

*कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर,सहकार मंत्री ना.श्री.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवारी होणार समारोप कार्यक्रम*

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून तीन दिवसात १५ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे. आज रविवारच्या दिवशी खाद्य पदार्थ खाण्यासाठी ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर यांनी मेरी बेदर मैदानावर गर्दी केली होती.प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व.कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी केली होती.

भागीरथी महिला संस्थेमार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकर गाव तामगाव भागीरथी महिला बचत गटात मार्फत आजची भाकरी वाटप करण्यात आले.यावेळी मंगल ताई महादेवराव महाडिक, मंगल ताई महाडिक, साधना महाडिक,सौ अरुंधती महाडिक,अंजलीताई मोहिते,आशा जैन, भागीरथी बचत गट महिला सभा सद उपस्थित होते.सायंकाळी गाथा महाराष्ट्राची मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम झाला.आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार माधवराव माळी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली.

आज सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर,सहकार मंत्री श्री.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील उपस्थित असणार आहेत.यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या सह प्रमुख उपस्थिती आमदार.चंद्रदीप नरके,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार
शिवाजीराव पाटील,आमदार अशोकराव माने उपस्थित असणार आहेत.

कागलमधील हैदर अली बर्ड ब्रिडिंग भीमा अँग्रो फार्म मधील पशू पक्षी
याठिकाणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.यात ३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,*जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा,* टर्की कोंबडा दीड वर्षाचा बारा किलो वजनाचा आहे.* पांढरे ससे, आफ्रिकन बर्ड सिल्की कोंबड्या, चिनी कोंबडी, सोनाली कोंबडी, गिरीराज कोंबडी, परशियन मांजर ची पिल्ले कबूतर लव बर्ड कोकोटोल बर्ड,अमेरिकन बिल्टम जातीचे बोकड तीन वर्ष आठ महिने आणि चार वर्षाची १८ इंचाचे बोकड, कोलंबियन ब्रम्हा एक वर्षाचा कोंबडा त्याचे साडेचार किलो वजन आहे.गीज बदक,व्हाईट पिक अँन बदक, इंडियन रनर बदक, मस्कवि बदक आकर्षण ठरत आहेत जे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा आणि चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण, *आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे बैल (वळू)*,पाच वर्षाची देवणी गाय, साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू,*आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण ठरत आहेत.*
*अर्जंनि येथील सात किलो वजनाची मैलोडी जातीचे कलिंगड,* शिवाय रेशीम कोष, शंकरवाडी कागल येथील चार किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड, कडेगाव येथील ८६०३२ या वाणाच्या उत्पन्नापेक्षाही ज्यादा उत्पन्न देणारा १३००७ ऊसाची नवीन वाण आकर्षण ठरत आहे. पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय नावाचा हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती भीमा कृषी प्रदर्शनात मिळत आहे. व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येत आहेत.

*पीक स्पर्धा निकाल*
*फुले*

१)जयदीप दशरथ पाटील (रा.शिंगणापूर शेवंती)

२)विनायक आनंदा कांबळे (रा.पाडळी खुर्द जरबेरा)

३)शशिकांत शेवाळे (रा. शंकरशेंदुर झेंडू)

*धान्यपिके*

१)राजू देऊ बने (रा तारदाळ ज्वारी)

२)प्रशांत करणे (रा.गडहिंग्लज ज्वारी)

३)चेतन लोखंडे(रा. अरळ गुंडी भात तांदूळ)

*कडधान्य पिके*

१)संजय भक्ती (रा.भडगाव हरभरा)

२)सौ सुरेखा सुतार (रा. आरशी घेवडा)
३)ओंकार अनिल पाटील (रा.गिरगाव वाटाणा)

१)अमोल बळवंत पाटील (रा. शिरोली ऊस)
१)रोहन प्रमोद चौगुले (रा. यळगुळ केळी)
२)महादेव शामराव पाटील (रा. चिखली लिंबू)
३)कुंडलीक कृष्णा डाफळे (रा. हंबरवाडी पपई )
४)अनिल संभाजी भाचे (रा.सावर्डे स्ट्रॉबेरी)

*भाजीपाला*

१)प्रदीप येलगुंडा खोत (वांगी)

२)अविनाश मारुती जाधव (ढोबळी मिरची)

३)आनंदा पावले (मिरची)

४)अजित थोरात (मिरची)

*बोलवर्गीय भाजीपाला*

नंदिनी दिनकर देसाई (कलिंगड)

निवास पाटील (काकडी)

अथर्व चौगुले (कोहळा)

*विधायक नावाचा रेडा खास आकर्षण पाहण्यासाठी लहान मुलांसह लोकांची गर्दी*

*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.गोलू २ रेड्याचा हा मुलगा असून या रेड्याचे वजन जवळजवळ दीड टन आहे. हा विधायक १४ फूट लांब आणि साडे साडेपाच फूट उंच आहेत्या रेड्याची किंमत २५ करोड रुपये असून प्रतिदिन २० किलो दूध २० किलो फीड आणि ३० किलो चारा आणि भुसा खातो.त्याचे राहणीमान ऋतुमानानुसार असते गर्मीमध्ये त्याला एसी आणि पंख्याची आवश्यकता असते.त्याच्या अंघोळीसाठी खास स्विमिंग पूल पानिपत येथे बांधण्यात आलेला आहे या रेड्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न बीज प्रक्रियेतून प्राप्त होते. सर्वांनाच बघण्यासाठी आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी मिळते.विधायक रेड्याने महेंद्रगड, रोहतक,मेरठ उत्तर प्रदेश या तीन ठिकाणी गोलू टू म्हणजेच आपल्या वडिलाला स्पर्धेमध्ये हरविलेले आहे. २०१९ मध्ये सरकारने याला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे.असा हा विधायक नावाचा रेडा २०२५ च्या भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.*

*चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण*

*चायना येथून आणण्यात आलेला कवठे महांकाळ येथील राकेश कोळेकर यांचे तीन वर्षाचे सुलतान नावाचे चायना झिंग जातीचे बोकड हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.३० किलो वजनाचे हे बोकड असून त्याच्या अंगावर पूर्ण पांढऱ्या रंगाचे केस आहेत.त्याची लांबी ५ फूट,उंची १ फूट ८ इंच,आणि शिंगे १ फूट ४ इंच आहे.*

*फुलशेतीची माहिती*

*वाळवे खुर्द येथील शंभर टक्के हेकरासाठी चार लाख रुपये अनुदान रेशीम उद्योगासाठी कोश उद्योगासाठी शासनाकडून दिले जात आहेत दिले जाते या रेशीम कोशसाठी वर्षातून चार बॅचेस निघतात एका बॅचमध्ये १०० किलो कोष निघतो एका किलोचा दर ६०० रुपये असतो हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व्यवसाय आहे.याचे मार्गदर्शन मिळत आहे.याचबरोबर ४ किलोचा मुळा हेरले येथील अमोल चौगुले यांचा पावणेसात किलोचा केळीचा घड, तेराशे सात उसाचे पाडगाव येथील वाण अर्जंनि येथील सात किलो मैलोडी जातीचे कलिंगड,६.८०० किलो वजनाचा कोहळा,पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.*

*जनावरे आकर्षण*

*भीमा फार्म मधील पांढरे घोडे, पुंगनूर जातीची चार वर्षाची अडीच फूट तीन गाई* *नांदेड येथील अजय विश्वनाथ जाधव यांचा राम आणि रावण नाव असणारे साडेपाच वर्ष असणाते लाल कंधारी वळू खास आकर्षण ठरत आहेत याचबरोबर चेतक सहा वर्षाचा घोडा, बेळगाव येथील सुजित शिवकुमार देशपांडे फार्म मधील मैशी आणि घोडे पंढरपुरी जातीचा रेडा हासेगाव वाडी लातूर येथील पाच वर्षाची देवणी गाय, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू बैल आकर्षण ठरत आहे तो सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे.कोगील बुद्रुक येथील साडेतीन वर्ष वय असलेला सहाफूट उंची असलेल्या सोन्या नावाचा बैल आकर्षण आहे. शिवाय लातूर येथील तीन वर्षे वयाचा सहा फूट उंची असलेला देवणी जातीचा बैल (वळू) आकर्षण ठरत आहे*

या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रदर्शन पर्वणी ठरत आहे. ताव मारण्यासाठी नागरिक,शेतकरी कुटुंबासह याठिकाणी गर्दी करत आहेत.शेतकऱ्यांना आजही भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.

*कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने भीमा कृषी प्रदर्शनात मांडण्यात आलेले प्रोजेक्ट खालीलप्रमाणे*

ऊस उत्पादन वाढीसाठी सुपर केनर्सरी द्वारे ऊस रोप तयार करणे,
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गतसामूहिक शेततळे प्लास्टिक आच्छादन हरितगृह कांदाचाळ रायपनिंग चेंबर शीतगृह पॅक हाऊस शेडनेट हाऊस फलोत्पादन यांत्रिकीकरण,
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड बांधावर फळबाग लागवड गांडूळ युनिट नाडेफ कंपोस्ट युनिट,पौष्टिक तृणधान्य ज्वारी नाचणी राजीगरा बाजरी वरई याच्या आहारातील महत्त्व,वैयक्तिक शेततळे क्षारपड जमीन सुधारणा माती नमुना काढणे,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान,महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.

*सहभागी कंपन्या*

विला पंप, पॉप्युलर एग्रीकल्चर इम्प्लिमेंट, समृद्धी ट्रॅक्टर अँड मशिनरीजे, लक्ष्मी पंप, टाटा सोलर, तालोड फूड्स,चितळे डेअरी, कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन ,गोविंद मिल्क प्रॉडक्ट, वनिता ऍग्रो केम, जैन इरिगेशन लि, विजय कृषी अवजारे, स्वाती मसाले,बाहुबली प्लास्टिक, डेक्कन फार्म इक्विपमेंट, जीएनपी ऍग्रो केअर सायन्स आदी नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.या कंपन्यांची उत्पादने शेती साहित्य पाहावयास मिळत आहेत.आणि त्यांची खरेदी केली जात आहे.याचबरोबर हळद टाकली काजू तर मिल्कचे पदार्थ कापड लोणची यांची जोरदार विक्री होत आहे शेतकरी वर्ग आवश्यक साहित्य खरेदी करण्याकडे वळला आहे.

*आज झालेली व्याख्याने*

आज २३ फेब्रुवारी रोजी माजी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर डॉ. संजय आसवले यांनी किफायतशीर दुग्ध व्यवसाय कसा करावा या विषयावर बोलताना दुधाकरिता गायी व म्हैशी कोणत्या निवडाव्यात प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये याची सविस्तरपणे माहिती दिली. जनावरांचा गोठा कसा असावा आदर्श गोठ्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. जनावरांची गोठ्यातील बांधणी शेपट्याकडे शेपूट असावी. दुधाळ जनावरांची लक्षणे अधिक दूध कोणत्या गाई किंवा म्हशी पासून मिळू शकते याची गुणवत्ता आणि गुणवैशिष्ट्ये कशी असावीत ही माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
पशुखाद्य व खनिज खाद्य कोणत्या प्रकारे आणि वय व दुधाने सर किती द्यावे याची माहिती दिली. कोणत्या प्रकारच्या वैरणी आणि दुधाची निगडित खाद्य द्यावे. दैनंदिन जनावरांची निगा कशी करावी आजारी असल्यास त्याचे संगोपन कसे करावे कधी बाबी सखोलपणे मांडले.
तर डॉ. अशोक दत्तात्रय कडलग प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी बुद्रुक, पुणे हे ऊस उत्पादनातील आव्हाने, जमीन व पीक व्यवस्थापन आणि ए. आय. तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी अचूक वापर याविषयी बोलताना शेतीची आव्हाने व उपाय योजना याविषयी माहिती दिली. पिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे आणि जमिनीच्या पृथकरणांनुसार रासायनिक खते व सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक खते विद्राव्य खते पीक वाढीनुसार द्यावीत. जीवामृताचा वापर तीन ते पाच वेळा करावा. व्हिएसआय १८१२१, खुले १५०१२,१३००७,१५००६ अशा शिफारस केलेल्या ऊस वानांचा हंगाम निहाय लावण करावी. निश्चितच एकरी सात त्यांना तन पेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक व मोजकेच व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. याविषयी प्रशिक्षण व्ही एस आय पुणे येथून दिले जाईल निश्चितच त्यामुळे दीडपट उत्पादनात वाढ होऊ शकते. मार्गदर्शन केले.

*उद्या २४ फेब्रुवारी होणारे व्याख्यान*

पद्मश्री श्री. पोपटराव भागूजी पवार, माजी सरपंच, आदर्शगांव हिरवे बाजार, ता. जि. अहमदनगर हे ग्रामविकासामध्ये कृषीचे महत्व व ग्रामीण पातळीवर शेतकरी सहभाग.

*उद्या समारोप प्रसंगी दिले जाणारे पुरस्कार*

या प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.

आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची तसेच नाचणी सेंद्रिय गूळ,हळद यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळत आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाई, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीचे घोडे, विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळत आहेत. हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही प्रचंड होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू,मध, जाम,काजू,बदाम,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे
आज सायंकाळी प्रदर्शन स्थळी तोबा गर्दी लोकांनी शेतकऱ्यांनी केली होती.

प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन आज शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन.
सुजित चव्हाण
हाऊस ऑफ इव्हेंट यांनी कृषी प्रदर्शन २०२५ चे उत्कृष्ट प्रकारचे नियोजन केले आहे.या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.

*सेंद्रिय गुळाला मागणी*

प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री झाली सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला आहे.

भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल :

1) सेंद्रीय गूळ : २५०० kg
2) इंद्रायणी तांदूळ : ४५०० kg
3) आजरा घनसाळ : ३८०० kg
4)रत्नागिरी २४ तांदूळ : ३००० kg
5)सेंद्रीय हळद : ११५० kg
6)नाचणी : १०००kg
7)विविध बी बियाणे १२०० किलो

भीमा कृषी व पशु प्रदर्शन दुसऱ्या दिवशी सौ.अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झुणका भाकरीचे वाटप

0

भीमा कृषी व पशु प्रदर्शन दुसऱ्या दिवशी सौ.अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झुणका भाकरीचे वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन यांच्यामार्फत प्रदर्शन स्थळी आलेल्या शेतकरी बांधवांसाठी ५००० झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.
यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, मा. मंगल महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. विश्वराज महाडिक, मा. कृष्णराज महाडिक, सौ. मंजिरी महाडिक, मा. राजेंद्र घोरपडे, दत्तात्रय कोरे, मा. प्रदीप उलपे यांच्यासह भागीरथी महिला संस्थेचे व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.