Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याप्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी लॅब विकसित

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी लॅब विकसित

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकी लॅब विकसित

– प्रोजेक्ट्स बेस्ड लर्निंग अंतर्गत डी. वाय. पाटील साळोखेनगरच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रात्यक्षिक ज्ञानातून अभियांत्रिकीतील संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून घेत साळोखेनगर येथील मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक प्रविण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांनी ‘बेसिक मेकॅनिकल इंजिनीरिंग’ या विषयाची लॅब डेव्हलप केली आहे.
सध्याच्या बदलत्या शैक्षणिक शैली मुळे प्रॅक्टिकल नॉलेज ला खूप महत्व प्राप्त झाले आहे. हे ओळखून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळवून देण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. याच प्रयत्नातून विद्यार्थ्यानी ही लॅब डेव्हलप केली आहे. विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या आणि बेसिक मेकॅनिकल विषयाला उपयुक्त असणाऱ्या प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे. हे सर्व प्रोजेक्ट्स टाकाऊ मटेरियल वापरून व कमीत कमी खर्चात बनवण्यात आले आहेत.
प्रथम वर्षात शिकणाऱ्या सुमारे १२० विद्यार्थ्यांनी यात सहभाग होऊन १५ प्रात्यक्षिक मॉडेल्स तयार केली आहेत. गुरुवारी या प्रोजेक्ट्सचे प्रदर्शन महाविद्यालयातील पाणिनी सभागृहात भरवण्यात आले होते. यामध्ये रेफ्रिजरेशन सिस्टिम्स,सोलर वॉटर हीटर, इलेक्क्ट्रीसिटी जनरेशन,गिअर ड्राइव्ह, सोलर सेल,थर्मल पॉवर प्लांट, इंजिन चे प्रकार असे विविध प्रोजेक्ट्स चे प्रात्यक्षिक सादर केले.
प्राचार्य सुरेश माने यांनी महाविद्यालयात घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्याना तांत्रिक ज्ञान मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते असे सांगितले.प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत तयार केलेल्या प्रोजेक्ट्समुळे अभियंत्रिकीच्या प्रथम वर्षातच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळालेच पण त्याचबरोबर अभियांत्रिकीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित होण्यासाठी सुद्धा मदत झाली, अशी माहिती प्रा. प्रवीण देसाई यांनी दिली.
कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील, अधिष्ठाता सर्व विभागप्रमुख यांनी प्रात्यक्षिकांची पाहणी करून कौतुक केले. या उपक्रमास प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. रुतीकेश गुरव, प्रा. योगेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments